Skip to main content

साहित्यिक

अमरेंद्र बाहुबली आणी मिपाकरांच्या भेटी!

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी सोमवार, 24/03/2025 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
कुप्रसिद्ध मिपाकर अमरेंद्र बाहुबली ह्यांची दिल्लीवारी – एक संस्मरणीय भेट . दिल्लीला काही कामानिमित्त जाण्याचा योग आला. राजधानीत पाऊल टाकताच, मनात एक विचार आला—मिपाकर विवेककाका पटाईत ह्यांची भेट घ्यावी! पण ते व्यस्त असतील का? संदेश वाचतील का? याची खात्री नव्हती, इंडियागेट पाहून झाल्यावर मी त्यांना मिपावर मेसेज पाठवला आणि सोबतच एक ई-मेलही केला. आश्चर्य म्हणजे, दुसऱ्याच क्षणी काकांचा फोन आला!

क्रिकेटचा इसाप हरपला

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी गुरुवार, 06/02/2025 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
"एकदा काय झालं.... तर विराटाने आदेशच दिला की रे बल्लवाला - "तू माझा दास आहेस. काहीही करून तुला मल्लयुद्धात त्या जीमूताला हरवावंच लागेल!" आता आली का पंचाईत? पांडव तर होते अज्ञातवासात! आता भीमाला आलं टेन्शन!" आजोबा अगदी 'हरीतात्या' स्टाईलमध्ये आम्हाला गोष्ट सांगायचे आणि आम्ही डोळे विस्फारून ती ऐकायचो! आज लक्षात येतं की आयुष्य ह्याच गोष्टींनी घडलं. रामायण महाभारत, भक्त प्रह्लाद, छत्रपती शिवाजी, संभाजी महाराज, संताजी-धनाजी, भगतसिंह-राजगुरु-सुखदेव, सावित्रीबाई, गाडगेबाबा...ह्यांच्याच कणा कणानी बनलेलं आहे.

मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे

लेखक वामन देशमुख यांनी रविवार, 17/11/2024 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे परभणी जिल्ह्यातल्या एका लहानशा गावी, माझ्या आजोळच्या एका लग्नाला यायचं होतं. काल रात्री सिकंदराबादहून १७६६३ या रेल्वेने बसलो. आज सकाळी परभणीला आलो. तिथून आधी १७६६८ या गाडीने, नंतर एका जीपने लग्नाच्या गावी आलो. फ्रेश होऊन नाश्ता झाल्यानंतर दाढी ट्रिम् करायला बाहेर पडलो. या गावात दोन सलुन आहेत. आधी एका ठिकाणी गेलो तर तिथे दोनजण आधीच बसून होते. दुसरा दुकानात तीनजण बसून होते. परत पहिल्या दुकानात आलो. वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

दहीभात...

लेखक किल्लेदार यांनी मंगळवार, 12/11/2024 07:38 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात कुणाकडे कधीतरी दही-बुत्ती हा दहीभाताचा प्रकार ताटात पडला. दही-बुत्ती हे मूळचे दाक्षिणात्य अपत्य असले तरी पुण्यातल्या घरी वास्तव्यास आल्यामुळे साहजिकच "गोssड" झाले होते. पण “यजमान-दाक्षिण्य” दाखवून मी तो भात गोड (न) मानून कसातरी गिळला. एरवी पित्तशामक असणारा दहीभात, पित्त खवळायलाही कारणीभूत ठरू शकतो हे तो साखर परलेला दहीभात खाऊन त्या दिवशी नव्याने उमगले. हिंदुस्तानात भाषावार प्रांतरचना स्वातंत्र्यप्राप्तिनंतर झाली असली तरी "भाता-वार” प्रांतरचना जिथल्या तिथल्या खाद्यसंस्कृतीनुसार फार पूर्वीच झालेली आहे.

माचीवरला बुधा

लेखक श्रीगणेशा यांनी गुरुवार, 08/08/2024 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
माचीवरला बुधा ही गोनिदांची कादंबरी, त्यावर आधारित विजयदत्त यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट, आणि त्या चित्रपटासाठी धनंजय धुमाळ यांनी संगीतबद्ध केलेलं एक पक्ष्यांचं संगीत.

चहा!

लेखक श्रीगणेशा यांनी रविवार, 30/06/2024 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
चहा, जिव्हाळ्याचा विषय. चहा तयार करणं बऱ्याच अंशी एक कला आहे. थोडंसं गणित व शास्त्रही आहे म्हणा त्यात. चवीत सातत्य राखायचे असेल, तर त्यातील प्रत्येक घटकाची भूमिका, प्रमाण, आणि वेळ समजावून घेणं गरजेचं. एखादी सुंदर संगीत रचना जर करायची असेल, तर आधी तुम्हाला संगीत वाद्यांशी, प्रत्येक सुराशी समरस व्हावं लागतं, अगदी तसंच. चहापूड (पूड=पावडर) मधील अर्क शोषण्याचं काम पाण्याचं. चहापूड टाकण्याआधीच पाणी उकळतं असणं गरजेचं. आणि चहापूड उकळत्या पाण्यात टाकल्यावर, फक्त काही मिनिटेच थांबावं, नाहीतर कडवटपणा उतरण्याची शक्यता असते.

पुस्तक परिचय: ययाति

लेखक श्रीगणेशा यांनी बुधवार, 26/06/2024 07:35 या दिवशी प्रकाशित केले.
---- ययाति ---- वि. स. खांडेकर -- ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले, मराठीतील पहिले साहित्यिक. ययाति -- वि. स. खांडेकरांनी १९५९ मधे लिहिलेली, पौराणिक संदर्भ आणि सामाजिक आशय असलेली कथा. या कादंबरीसाठी १९७४ साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. ---- अगदी ओघवतं, प्रवाही लिखाण. साधे शब्द, पण तरीही कथेतून सामाजिक आशय अगदी प्रखरपणे मांडलेला. कथेच्या शेवटी मन विषण्ण, व्यथित होतं. कथा संपते, पण वाचकाला स्वतःशी संवाद करायला भाग पाडूनच. एवढं प्रभावी लिखाण दुर्मिळच. प्रत्येक व्यक्तिरेखा अगदी भिन्न स्वभाव, आणि विचारांनी साकारलेली.

'रमलप्रतिमा (भाग २) अर्थात नवीन काही AI चित्रे ( Prompt सह)

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 17/06/2024 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीच्या सांजशकुनाच्या रमलप्रतिमा: एक नवाच उद्योग (भाग-१) दिलेल्या चित्रांनंतर गेल्या काही दिवसात आणखी बरेच प्रयोग केले, त्यापैकी काही चित्रे: चित्र १. . चित्र २. . A cinematic view of a picturesque landscape featuring an ancient castle in greek architectural style.

तांडव (ऐसी अक्षरे -१८)

लेखक Bhakti यांनी शनिवार, 08/06/2024 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
तांडव-पुस्तक परिचय लेखक-महाबळेश्वर सैल अ पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला कोचीमध्ये पोर्तुगीजांनी पाऊल टाकले. लवकरच दहा वर्षात गोव्याला मुख्य ठाण केलं. आदिलशाहीविरूद्ध अनेक दशके सुरू असतानाच आपला मुख्य हेतू धर्म परिवर्तनाचा पसारा संपूर्ण गोवा पाटणात पसरवला.

द लेडी ऑफ शालॉट : (भाग १) चित्र, कविता आणि 'आई'चा मराठी तर्जुमा.

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 03/05/2024 03:14 या दिवशी प्रकाशित केले.
. चित्रकारः John William Waterhouse. (1888) Oil on canvas (72 in × 91 in) Location: Tate Britain, London गेल्या महिन्यात लंडनमधे दहा दिवस राहून तिथली कलासंग्रहालये बघितली. लहानपणापासून पुस्तकांमधे बघितलेली अनेक उत्तमोत्तम चित्रे प्रत्यक्ष बघण्यातली मजा भरपूर अनुभवता आली.