Skip to main content

नाट्य

सुब्रमण्यपुरम् - एक थरारपट!

लेखक उपयोजक यांनी बुधवार, 25/11/2020 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या साऊथचे सिनेमे या WhatsApp समुहात लिहिलेला एक लेख मिपाकरांसाठी ---------------------------------------------------------- सिनेमाचं नाव आहे सुब्रमण्यपुरम् (Subramaniapuram) सुब्रमण्यपुरम् हा २००८ चा तमिळ सिनेमा आहे. लेखक , दिग्दर्शक , निर्माता - शशिकुमार कलाकार - जाई संपत , स्वाति , शशिकुमार संगीत - जेम्स वसंतन् हा एक अॅक्शन कम थरारपट आहे.तमिळनाडूच्या मदुराई शहरातल्या सुब्रमण्यपुरम् भागात सिनेमाची कथा घडते. सिनेमा सुरु झाल्यावर पहिल्याच दृश्यात आपल्याला दिसतं की तुरुंगातून एक गुन्हेगार शिक्षेचा काळ संपल्याने बाहेर पडतो आहे.तो बाहेर पडताच तुरुंगाच्या आवारातच एक व्यक्

रॉकस्टार

लेखक महासंग्राम यांनी बुधवार, 11/11/2020 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
मी त्याला पहिल्यांदा भेटलो २०११ साली, याच दिवशी. जनार्दन, बेजबाबदारपणाचं दुसरं नाव होता तो. फार उनाड. घर व्यवस्थित भरलेलं होतं, घरचा व्यवसाय मोठे भाऊ सांभाळत होते, तशी याच्यावर जवाबदारी नव्हती कसलीच. सकाळी सकाळी कॉलेजमध्ये जायचं, टवाळकी करायची, मित्रांच्या गराड्यात रमायचं हेच काय ते काम. तो गिटार मात्र फार छान वाजवायचा. (आयुष्यात अर्धवट सोडलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे त्याला बघून मीही गिटार शिकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.) त्याचा आवाजही छान होता, वेगळ्या धाटणीचा. पण काही केल्या आयुष्यातील कला बहरत नाही अशी तक्रार होती त्याची.

असा बालगंधर्व पुन्हा न होणे

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 14/08/2020 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या काळात बालगंधर्व माहिती नसलेला मनुष्य सापडणे जरा कठीणच. बालगंधर्व चित्रपटामुळे त्यांचं कार्य आताच्या पिढीला कळलं त्याच बरोबर त्यांचा स्वभाव कलेप्रती असणारी निष्ठा, प्रेक्षकांसाठी उच्च तेच सादर करण्याचा स्वभाव सुद्धा माहिती झाला. त्यांचे असेच काही अपरिचित प्रसंग इथे सादर करतोय.

डोक्याला शॉट [तृतीया]

लेखक गड्डा झब्बू यांनी गुरुवार, 18/06/2020 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
"हरी ओsssम" असे मोठ्या आवाजात म्हणत रवी बाबाने चिलीम धरलेली हातांची जुडी कपाळाला लावली आणि डावीकडे बसलेल्या राजाराम बुवाने पेटवून धरलेल्या माचीसच्या दोन काड्यांजवळ तिचे टोक आणून सर केली. गांजाचा एक दमदार झुरका मारून तोंडातून धुराचे लोट सोडत चिलीम शेजारी बसलेल्या रज्जुभैय्याच्या पुढ्यात धरली. "चल चली को चाम ले...साई बाबा का नाम ले" असा घोष करून रज्जुभैय्याने जोरकस दम मारून चिलीम बाजूच्या सागर संजयक्षीर कडे पास केली. सर्वज्ञानी सागरने आधी तोंडावरचा N95 मास्क काढला. मग खिशातून 80% अल्कोहोल असलेल्या सॅनीटायझरची बाटली काढून दोन्ही हातांचे निर्जंतुकीकरण केले.

व्हिडिओ अभिवाचन:-गुरुजींचे भावविश्व-प्रस्तावना व भाग १

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 18/06/2020 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
खुला-सा:- हे व्हिडिओ अभिवाचन फेसबुक वर सुरू केलेले आहे.ते इथे देत आहे. फेसबुक वर केलेले असल्यामुळे त्या हिशोबानी मनातून आलेली ही प्रस्तावना आहे. आपण मिपाकरांनी माझ्या गुरुजींचे भावविश्वला अलोट प्रतिसाद दिलात. आता या वरील प्रस्तावनेसह केलेल्या पहिल्या भागाच्या अभिवाचनासाठी आपल्या अभिप्रायांच्या प्रतीक्षेत आहे.

हाक फोडी चांगुणा..

लेखक आजी यांनी सोमवार, 18/05/2020 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी उठल्या उठल्याच रत्नाकर मतकरी गेल्याची बातमी कळली आणि सुन्न व्हायला झालं. कालच म्हणजे "सतरा मे"ला रात्री साडेअकराच्या सुमारास ते गेले. ज्येष्ठ साहित्यिक,नाटककार,रंगकर्मी,राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक अशी त्यांची बहुरंगी ओळख होती. सेवन हिल्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. इतके दिवस बातम्यांत ऐकू येणारा कोरोना आता परिचिताला झाला होता. मी तरुण वयात होते. एका दिवाळी अंकात त्यांची "पावसातला पाहुणा" ही कथा छापून आली होती. विलक्षण सुंदर गूढकथा होती ती! मला-आमच्या घरातल्या सर्वांनाच-आवडली होती.

मोसंबी नारंगी - एक वेगळा नाट्यानुभव

लेखक मित्रहो यांनी गुरुवार, 09/04/2020 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
फेब्रुवारी महिन्यात मोसंबी नारंगी या हिंदी नाटकाचा हेदराबादमधे प्रयोग बघितला. मराठी माणूस मोहित टाकळकरने नाटकाचे दिग्दर्शन केले होते म्हणून नाटक बघायचे ठरविले. मोहित टाकळकरच्या नाटकांबद्दल बऱ्याचदा वाचले होते तेंव्हा ती उत्सुकता देखील होती. त्याच बरोबर ती नाटके डोक्यावरुन जातात ती भिती सुद्धा होती. माझ्या सुदैवाने माझी नाटकाच्या दिग्दर्शका सोबत तेथे भेट सुद्धा झाली. तसेच व्योमकेश बक्षी फेम रजत कपूर हे देखील एक आकर्षण होतेच. नाटक उशीरा सुरु झाले. आयोजकांनी मग तिथल्या कँटिनमधे फुकटात चहा दिला. इटरनेशनल एअरलाइन्सचे विमान उशीरा सुटल्यासारखे वाटले. ते पण असेच एअरपोर्टवर लाँजमधे जेवायला देतात.

सहावि सातवित असेन..बहुतेक

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 11/03/2020 08:06 या दिवशी प्रकाशित केले.
सहावि सातवित असेन..बहुतेक उन्हाळयाच्या सुट्या चालु झाल्या होत्या.. आमचे १०-१२ मित्रांचे टोळके बाळ पुंडलीक मित्राच्या वाड्यात दंगा करायला जमले होते... वाडा चौसोपि व.मोठा. .. आत एक विठ्ठल मंदिर हि होते..सभामंडपात सारे जमलो होतो.. गप्पा चालु होत्या.. "अन आपण नाटक करु यात का?".चंद्या घाटपांडे म्हणाला.. सा~यांनी कल्पना उचलुन धरली.. पण कोणचे? .कुणालाच सुचेना शेवटी "तुच एखादे नाटुकले लिहि..असा मला आग्रह झाला.. मित्रांच्या विश्वासाचा अन अज्ञानाचा फायदा घेत मी पण हो म्हटले.. रात्री विचार करीत अश्वथाम्याच्या कथेवर एक छोटे नाटुकले लिहिले... अश्वथामा दुध मागतो ..घरची गरीबी..

गाईड

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 04/02/2020 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
गाईड १९६५ चा सिनेमा ही इतकीच या सिनेमाची ओळख नाही. गाईड हा सिनेमा आर के नारायणच्या कादंबरीवर बेतलेला सिनेमा ही पण याची ओळख होत नाही. देव आनंदची ओळख बदलणारा सिनेमा, भारतीय सिनेमाच्या इतिहासात एक स्वतःचा ठसा उमटवणारा सिनेमा. असे बरेच काही सांगता येईल याच्या बद्दल. मी जेंव्हा पहिल्यांदा हा सिनेमा पाहिला तेंव्हा राजू नावाचा कोणताही आगापीछा नसलेल्या एका तरुणाची कहाणी इतकेच काहीसे समजले होते. अर्थात एस डी बर्मन चे म्युझीक हा मोठाच प्लस पॉईंट होता. यात नेहमी दिसणारा तो उत्साही देवानंद दिसत नाही. सळसळत्या तारुण्याची नव्हाळी वागवणारी वहिदा रेहमान दिसत नाही. जी दिसतात ती पात्रे दिसतात.