Skip to main content

कथा

पिनाडी पिनाडी पिनाडी………

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी शनिवार, 28/09/2024 या दिवशी प्रकाशित केले.
पबजी हा खेळ जवळपास सर्वांनाच माहीत असावा. ज्याने खेळला नाहीये त्याने देखील ह्या खेळाबद्दल ऐकले असावे. हा खेळ ऑनलाईन मल्टिप्लेअर सर्व्हायवल गेम आहे, जो लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला होता. तुम्ही आणि तुमची टीम एका मोठ्या बेटावर इतर ९६ खेळाडूंसोबत उतरता, आणि तुमचं ध्येय असतं, शेवटपर्यंत जिवंत राहणं. हे बेट एक युद्धभूमी असतं जिथे सर्वत्र शत्रू असतात, आणि जिथे तुम्हाला शस्त्रं, दारूगोळा, औषधं शोधून शत्रूंना हरवायचं असतं. हा खेळ अर्ध्या तासासाठी तुमचं जग बदलतो, एका आभासी युद्धमय जगात तुम्हास नेतो. जिथे फक्त तुमची टीम आणि शत्रू.

सरडा चेला तर नेता गुरू

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 18/09/2024 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा जंगलात राहाणाऱ्या सरड्याने शहरात जाऊन लोकांना आपले रंग बदलण्याचे कौशल्य दाखवून वाहवा मिळविण्याच्या विचार केला. सरडा जवळच्या शहरात गेला. तिथे त्याला एका सरकारी बंगल्यात डोक्यावर काळी टोपी घातलेला एक माणूस खुर्चीवर बसलेला दिसला. सरडा त्या माणसं जवळ गेला आणि म्हणाला मी जंगलात राहणारा सरडा आहे. मला रंग बदलण्याची कला अवगत आहे. मी ज्या झाडा फुलावर बसतो त्याच रंगात मिसळून जातो. सरडा म्हणाला मी तुम्हाला आपली कला दाखवतो. सरडा हिरव्या पानांवर बसला तो हिरवा झाला. सरडा लाल फुलावर बसला तो लाल झाला. अश्या रीतीने सरड्याने वेगवेगळे रंग बदलून त्या माणसाला दाखविले.

हृदयाची गोष्ट...

लेखक भम्पक यांनी बुधवार, 11/09/2024 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी खरे सांगतोय ..अस्वस्थ ..भयंकर अस्वस्थ होतो मी आणि आहे सुद्धा .पण तरीही तुम्ही मला वेडा का म्हणाल ? त्या नैराश्याने माझ्या संवेदना अजूनच तीक्ष्ण केल्या आहेत. म्हणजे नष्ट तर नाहीच पण बोथट हि नाहीच नाही.अन वरकडी म्हणजे माझी श्रवण क्षमता तर भलतीच तीव्र झालीये म्हणजे मी पृथ्वीवरचे तर सोडा अन स्वर्गातलेही सोडा ..आपण एकदम नरकातल्या सुद्धा गोष्टी ऐकू शकतो. आता मला सांगा कि मी वेडा कसा ? आता मी जी काही सगळी हकीकत तुम्हाला शांतपणे अन अगदी तपशिलाने सांगणार आहे ती जरा ऐका. आता ती कल्पना माझ्या या डोक्यात कशी जन्मली ते सांगणे अगदी अशक्य आहे.

BIV:Thought Experiment

लेखक भागो यांनी बुधवार, 14/08/2024 या दिवशी प्रकाशित केले.
BIV:Thought Experiment गेल्या तीन महिन्यापासून मला चिडचिडल्या सारखे होतंय. विस्मरण वाढलय. मधेच पंधरा वीस मिनिटं ह्या जगात आपण नाहीहोत असं वाटतं. बायको म्हणते कि डॉक्टरला का भेटत नाही? ब्लड प्रेशर चेक करून घे एकदा. माझ्या वाहिनीच्या भावालाही असाच त्रास होत होता. इत्यादी. एकदा ऑफिसमध्ये माझा डावा हात गायब झाला. गायब झाला म्हणजे असं मला वाटत होते. पॅनिक अटॅक. “हलो, अनंत, मी परब. आठवतंय?” लोक धावपळ करत होते. त्यांची दबलेल्या आवाजातली कुजबुज. मग उजव्या हाताने चाचपडत डावा हात शोधून काढला आणि घट्ट पकडून ठेवला. त्या पाच मिनिटात दरदरून घाम सुटला.

ब्रेन इन अ व्हॅट!

लेखक भागो यांनी मंगळवार, 13/08/2024 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रेन इन अ व्हॅट! क्वांटम फिजिक्सशी किंवा आईनस्टाईनशी थोडा परिचय असेल तर “थॉट एक्स्पेरीमेंट” हा काय प्रकार आहे हे नव्याने सांगायची गरज नाही. किमान “स्क्रोडिंजरचे मांजर” तरी माहित असणारच. “थॉट एक्स्पेरीमेंट” म्हणजे कल्पनेची उत्तुंग भरारी. कित्येक गोष्टी आपल्याला प्रत्यक्षात अनुभवता येत नाहीत त्याबद्दल “खयालोमे” विचार करायचा. अशा कल्पनेच्या भरारीतून आपल्याला सिद्धांतांचे पुष्टीकारण मिळू शकते. “थॉट एक्स्पेरीमेंट” हे फक्त विज्ञानापुरते मर्यादित नाहीत, तर त्यांचा तत्त्वज्ञानातही सढळ वापर केला गेला आहे. उदाहरणार्थ देकार्तचा राक्षस- Descartes Evil Demon. किंवा प्लाटोचा “गुहेतील कैदी” दृष्टांत!

BIV-१

लेखक भागो यांनी रविवार, 11/08/2024 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या तीन महिन्यापासून मला चिडचिडल्या सारखे होतंय. विस्मरण वाढलय. मधेच पंधरा वीस मिनिटं ह्या जगात आपण नाहीहोत असं वाटतं. बायको म्हणते कि डॉक्टरला का भेटत नाही? ब्लड प्रेशर चेक करून घे एकदा. माझ्या वाहिनीच्या भावालाही असाच त्रास होत होता. इत्यादी. एकदा ऑफिसमध्ये माझा डावा हात गायब झाला. गायब झाला म्हणजे असं मला वाटत होते. पॅनिक अटॅक. “हलो, अनंत, मी परब. आठवतंय?” लोक धावपळ करत होते. त्यांची दबलेल्या आवाजातली कुजबुज. मग उजव्या हाताने चाचपडत डावा हात शोधून काढला आणि घट्ट पकडून ठेवला. त्या पाच मिनिटात दरदरून घाम सुटला.

परबची अजब कहाणी---६

लेखक भागो यांनी रविवार, 28/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
परबची अजब कहाणी---६ ( भाग---१ https://www.misalpav.com/node/52354) ( भाग---२ https://www.misalpav.com/node/52356) (भाग—३ https://www.misalpav.com/node/52365) (भाग—४ https://www.misalpav.com/node/52367) (भाग—५ https://www.misalpav.com/node/52373) (माझ्या मित्रांनो मला ही मालिका इथेच संपवायला लागणार आहे.

परबची अजब कहाणी---५

लेखक भागो यांनी शुक्रवार, 26/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
परबची अजब कहाणी---५ ( भाग---१ https://www.misalpav.com/node/52354) ( भाग---२ https://www.misalpav.com/node/52356) (भाग—३ https://www.misalpav.com/node/52365) (भाग—४ https://www.misalpav.com/node/52367) फ्रेनी, मी तुम्हाला सांगितले का? नाही? माझा बिल्डींग मटिरिअल सप्लाय करायचा बिझिनेस आहे. पोटापुरतं कमावतो. एक छोटसे ऑफिस आहे. त्या ऑफिसातच माझ्याशी संपर्क साधला गेला.

कृष्णाच्या गोष्टी-८

लेखक Bhakti यांनी बुधवार, 24/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
*धर्मराज्य स्थापना देशात धर्मसाम्राज्य निर्माण व्हावे सांस्कृतिक जीवन मूल्यांची प्रतिस्थापना व्हावी. राजमंडळाने लोककरंजनात् राजा ही त्याग पूर्ण निस्वार्थ भूमिका मान्य करून राज्य करावे ,हे कृष्ण जीवनाचे ध्येय होते. ते साध्य करण्यासाठी देशातील राज्यसंस्थांचे शुद्धीकरण हाच उपाय आहे हे कृष्ण जाणत होता. हे शुद्धीकरण दोन प्रकारांनी होण्यासारखे होते. एकतर भ्रष्ट राज्यसंस्थेत शिरून आपल्या आदर्श वागणुकीने तिला पुन्हा नियंत्रित व धर्मन्मुख करणे किंवा संपूर्ण तयारी शुद्ध तत्वावर आधारलेली धर्माधिष्ठित नवी राज्यसंस्था निर्माण करणे.

परबची अजब कहाणी---४

लेखक भागो यांनी मंगळवार, 23/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
( भाग---१ https://www.misalpav.com/node/52354) ( भाग---२ https://www.misalpav.com/node/52356) (भाग—३ https://www.misalpav.com/node/52365) फनजॉब बँकेच्या खारमहाल शाखेत मी कार्जाच्या निमित्ताने गेलो होतो. तिथे हा गजानन सदावर्ते नावाचा मच्छर मॅनेजर होता. “साहेब, मला पैशाची गरज आहे, लोन पाहिजे आहे.” मी त्याला विनम्रपाने सांगितले. माझ्याकडे लक्ष न देता तो फायलीत डोकं खुपसून बसला होता. “लोन माझ्याकडून पाहिजे आहे कि बँकेकडून?