तहान
कथा आणि व्यथा
******************************
तहान
त्यादिवशी दुपारी सहज मी खिडकीत उभा होतो. समोरच्या पटागंणात काही बि-हाड उतरली होती. ऊन मी म्हणत होतं. त्या पटांगणावर नावाला पण झाड नव्हतं. नुसतं याडपाट बाभळी होत्या.त्याला पानं नव्हती राहिली.लेकर बाळं सारी ऊन्हात तळत होती.
गडी माणसं पालं ठोकत होती. सारे चार पाच पालं असतीलं.त्यात काही लेकरं वाळया ही होत्या.ती लहान लहान पिल्लं नुसती केकत होती. येडया बाभळीच्या झाडावर गोधडी टाकून सावली केली आणि त्या तिथचं बसून लेकरं पाजू लागल्या. बाकी पाच सहा लेकरं नुसती हुंदडत होती. उघडी नागडी पळत होती.
मिसळपाव