ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी, शके १९३० - मंगळवार, १ जुलै २००८
सकाळी नेहमीप्रमाणे कन्सलटेशन सुरू होते. तेवढ्यात मोबाईल खणाणला. ऍड्रेस बुकातला नंबर दिसत नव्हता म्हणजे नेहमीच्या संपर्कातील व्यक्ती नसावी. आमची महत्वाच्या समस्येबद्दल जातकांबरोबर चर्चा चालू होती म्हणून कट केला. लगेच पुन्हा फोन. पुन्हा कट. तिसर्यांदा फोन आल्यावर पर्याय नव्हता. कोणीतरी भयंकर संकटात असेल तरच असे दोनदा फोन कट केल्यावर तिसर्यांदा फोन करतं. फोन उचलला. समोरून ते गृहस्थ किंचाळले,
"अहो पंत, फोन काय कट करताय सारखा. मी कितीवेळ ट्राय करतोय. एक तर इथे पावसामुळे पाणी साचलाय. घरचा फोन बंद आहे.