Skip to main content

जीवनमान

एआयमुळे भारतातील एंट्री-लेव्हल नोकऱ्यांवर होणारा परिणाम

लेखक युयुत्सु यांनी गुरुवार, 05/06/2025 या दिवशी प्रकाशित केले.
एआयमुळे भारतातील एंट्री-लेव्हल नोकऱ्यांवर होणारा परिणाम एआयच्या प्रगतीमुळे जागतिक स्तरावर नोकरी बाजार बदलत आहे आणि भारतातही याचा मोठा प्रभाव पडतोय. तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रवेशस्तरीय नोकऱ्या विशेषतः एआय ऑटोमेशनमुळे धोक्यात आहेत. अलीकडील अहवालांवर आधारित भारतीय परिस्थितीचे विश्लेषण: १. तंत्रज्ञान क्षेत्रात फ्रेशर हायरींगमध्ये भीषण घट - २०१९ पासून भारतातील मोठ्या टेक कंपन्यांनी फ्रेशर भरती ५०% पेक्षा जास्त कमी केली आहे. नवीन भरतीत फ्रेशर्सचा वाटा आता फक्त ७% (पूर्वी १५%) आहे. - टीसीएस, इन्फोसिस सारख्या कंपन्या फ्रेशर्सची नियुक्ती मंदावल्या आहेत.

गीतारहस्य चिंतन (प्रकरण -६) आधिदैवतपक्ष व क्षेत्रक्षेत्रज्ञ‌विचार

लेखक Bhakti यांनी बुधवार, 04/06/2025 या दिवशी प्रकाशित केले.
आधिदैवतपक्ष व #क्षेत्रक्षेत्रज्ञ‌विचार मनोदेवता प्रेम, करुणा, धैर्य, परोपकार दया इ. मनोवृत्ति आपणांस कोणी दिल्या नसुन त्या निसर्गसिद्‌ध आहेत. पण मनोवृत्तित कोणती श्रेष्ठ हे न समजल्यास मनोदेवतेचे साहय होते. या मनोदेवतेची शक्ती सद्‌सद्विवेकबुद्‌धी आहे- -आधिदैवतपक्ष. या सदविवेकबुद्‌धीसच इंग्रजीत conscience म्हणतात, आधिदैवत पक्ष म्हणजे Intituitionist school होय." -वेदांतात या मनाचे वेद, स्मृति, शिष्टाचार, धृति, क्षमा हे धर्म मानले आहेत, मनाला शुद्ध वाटेल लेच करावे. वेदःस्मृतिः सदाचारः स्वस्थ च प्रियमात्मनः । एतच्चतुर्विधं प्रा..

पुस्तकं..

लेखक आजी यांनी सोमवार, 26/05/2025 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सगळेच पुस्तकाला पवित्र मानतो. समग्र जगाचं ज्ञान देणारी खिडकी मानतो. "न हि ज्ञानेनसदृशं पवित्रं इह विद्यते", म्हणजे ज्ञानाइतकं पवित्र या जगात दुसरं काही नाही. असं वचन आहे. हे ज्ञान आपल्याला पुस्तकं देतात. जेव्हा माणसाला छपाईचं तंत्र अवगत नव्हतं तेव्हा मौखिक परंपरेने ज्ञान मिळवले जात होते. आपले ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, उपनिषदे,ही मौखिक परंपरेने चालत आलेली आहेत. नंतर त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली. या ग्रंथांचे लेखक अज्ञात आहेत, म्हणून त्यांना अपौरुषेय असं म्हटलं जातं.

खगोलविश्वातील अढळ तारा: नारळीकर सर!

लेखक मार्गी यांनी बुधवार, 21/05/2025 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. डॉ. जयंत नारळीकर गेले! अनेकांना ज्यांच्यामुळे खगोलशास्त्र कळालं ते नारळीकर सर! विदेशात उच्च पदावर असूनही प्रवाहाविरुद्ध भारतामध्ये विज्ञान प्रसारासाठी आलेले नारळीकर सर! संशोधक, शिक्षक आणि विज्ञान प्रसारक! त्यांना दोनदा भेटण्याचा मला योग आला होता. त्यांची पत्रंही आली होती. त्यांच्याबद्दलच्या आठवणी शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न. तो दिवस स्पष्ट आठवतो. २२ जानेवारी १९९५! परभणीतल्या अ. भा. साहित्य संमेलनाचा शेवटचा दिवस. माझ्या एका मोठ्या मित्राने मला "प्रेषित" ही नारळीकर सरांची कादंबरी घ्यायला सांगितलं. तेव्हा माझं वय दहा होतं.

कामधेनु : गोमय वसते लक्ष्मी

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 17/05/2025 या दिवशी प्रकाशित केले.
गाय ही कामधेनु आहे. गायीची उत्तम रीतीने सेवा केली तर गाय आपल्या सेवकाला अन्न, वस्त्र, निवारा प्रदान करते. आपल्या धार्मिक ग्रंथात गायीच्या शरीरात 33 कोटी देवता राहतात असे म्हंटले आहे. कथा आहे, जेंव्हा लक्ष्मी मातेने गायींना विचारले, मी तुमच्या शरीरात कुठे निवास करू, तेंव्हा गायी म्हणल्या माता लक्ष्मी तुम्ही आमच्या पवित्र गोमय अर्थात गायीच्या शेणात आणि गोमूत्रात निवास करा. आपल्या देशात गौ आधारित अर्थव्यवस्था होती. आपल्या संस्कृतीत गौ दान करण्याची परंपरा होती. ऑपरेशन फ्लड काळात लाखो शेतकर्यांना सरकारने गायी प्रदान केल्या.

आव्वाज आव्वाज..

लेखक आजी यांनी मंगळवार, 13/05/2025 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या सोसायटीत सगळे बंगलेच आहेत. आपापली घरं फक्त कामवाल्यांसाठी उघडून आणि त्या कामं करून गेल्यावर ती पुन्हा बंद करून सगळ्या गृहिणी टीव्हीवर, आणि आताशा ओटीटीवर सिनेमे किंवा हिंदी भाषेतल्या कौटुंबिक मालिका बघत बसतात. पण त्या अधुनमधून बंगल्याबाहेरही पडतात. भिशी,किटी पार्टी, हळदीकुंकू,बारशी, वाढदिवस,भजन, सत्यनारायणाची पूजा, इत्यादी त्या थाटामाटात आणि एकत्र येऊन साजरे करतात. यात थोडा बदल म्हणून मी त्यांना घरपोच लायब्ररी चालू करणे, रीडर्स क्लब, साहित्य कट्टा, चांगल्या वक्त्यांची भाषणे, चांगल्या गायकांच्या गाण्याचे कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम सुचवून पाहिले पण त्याला शून्य प्रतिसाद मिळाला.

मनी छंद गुलकंद

लेखक विअर्ड विक्स यांनी सोमवार, 12/05/2025 या दिवशी प्रकाशित केले.
‘गुलकंद’ हा मराठी चित्रपट नुकताच १ मेला प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात ढवळे आणि माने या दोन्ही कुटुंबांच्या धमाल प्रेमकहाण्या रंगवण्यात आल्या आहेत. गोष्ट अशी आहे की, ढवळे घराण्यात सई ताम्हणकर (नीता) आणि समीर चौघुले (मकरंद) हे दांपत्य सुखात राहत असून त्यांची मुलगी मीनाक्षी (जुई भागवत) आहे. माने घराण्यात प्रसाद ओक (गिरीश) आणि ईशा डे (रागिणी) हे दुसरे जोडपं असून त्यांचा मुलगा ओंकार (तेजस राऊत) आहे. मीनाक्षी आणि ओंकार यांच्या प्रेमातून दोन्ही घरांची लग्न तयारी सजते; पण लग्नाच्या पहिल्या सोहळ्यात एक धक्का बसतो – प्रसाद आणि सई हे भूतकाळातले प्रेमी होते!

समईतलं तेल संपूनही उरणारं तेज

लेखक मार्गी यांनी शनिवार, 10/05/2025 या दिवशी प्रकाशित केले.
स्नेहप्रभा! प्रभा म्हणजे तेज. नुसतं तेज असेल तर त्या तेजोवलयाचा कधी कधी त्राससुद्धा होऊ शकतो. तेजामुळे दाहकता निर्माण होऊ शकते. पण तेजासोबत स्नेह असेल आणि ओलावा असेल तर ते तेज घातक ठरत नाही. स्नेह म्हणजेच तेल. जेव्हा तेजासोबत अशी आर्द्रता असेल तर ते तेज शीतल होतं. कदाचित तेजासोबत असलेल्या शीतलतेमुळे आयुष्यातल्या इतक्या दु:खाच्या आघातांनंतरही अशी व्यक्ती खंबीर राहू शकते आणि समईसारखी मंद तेवत राहू शकते! नऊ दशकांचा प्रवास केलेली माझी आजी- सौ. स्नेहप्रभा नारायणराव वेलणकर. जिचे तीन भाऊ दुसर्‍या महायुद्धात युरोप व आफ्रिकेत लढले होते! जिने इंग्रजांपासून अँड्रॉईडपर्यंतचा काळ बघितला!

एआय, एआय, तू आहेस तरी काय?

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 05/05/2025 या दिवशी प्रकाशित केले.
ए.आय. म्हणजे काय, हे खुद्द त्यालाच विचारावे असा विचार मनात आला, मग त्यासाठी चत्ग्प्त मरत्झि (chatGPT marathi) ला आवाहन केल्यावर खालील उत्तरे आली: ------------------------------------------------------- आवाहन : एक मराठी कविता लिहा, ज्यात Artificial Intelligence बद्दल सोप्या भाषेत सांगोपांग माहिती असेल.