Skip to main content

जीवनमान

रिक्षावाले काका

लेखक अरुंधती यांनी सोमवार, 28/06/2010 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
''दीपक, खाली ये रे! '' रिक्षावाले काका रस्त्यावरून जोरदार हाळी देतात. शून्य प्रतिसाद. दोन मिनिटांनी पुन्हा एक हाक, ''ए दीपक, चल लवकर! '' दीपकच्या आईचा अस्फुट आवाज, ''हो, हो, येतोय तो! जरा थांबा! '' पुन्हा पाच मिनिटे तशीच जातात. ''ए दीपक, आरं लवकर ये रं बाबा, बाकीची पोरं खोळंबल्याती! '' रिक्षाचा हॉर्न दोन-तीनदा कर्कश्श आवाजात केकाटतो आणि रिक्षावाल्या काकांच्या हाकेची पट्टीही वर चढते. समोरच्या इमारतीत राहणाऱ्या छोट्या दीपकची रोज शाळेच्या वेळेला येणाऱ्या रिक्षाकाकांच्या हाकांना न जुमानता आपल्याच वेळेत खाली येण्याची पद्धत मला खरंच अचंबित करते.

आस “ नाविन्याची “

लेखक निरन्जन वहालेकर यांनी सोमवार, 28/06/2010 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
“मरण “ मरणापेक्षाही महाग तीन दिवसापूर्वी “सकाळ “ला लेख वाचला. मरणोत्तर अफाट खर्चा संबंधी……………….. आस “ नाविन्याची “ भोगिले आकंठ जीवना, नाविन्य काहीच आता ना राहिले, उपभोगण्या मृत्यो तुला, इतुकेच होते राहिले.

कदाचित...

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 27/06/2010 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
... भारत भिका सावकार नावाच्या कुणीतरी परवा कधीतरी आत्महत्या केली. दारूच्या नशेतच त्यानं स्वत:ला संपवलं, असं त्या बातमीत म्हटलं होतं. काय कारण असेल त्याच्या आत्महत्येमागचं? कर्जबाजारीपणा?... बेकारी?... कौटुंबिक कलह?... की नुसती व्यसनाधीनता?... ... भारत भिका सावकार हा त्या दिवशी आत्महत्या करणारा एकटा नव्हता. त्याच्या आधीच्या आठवड्यात, विदर्भात एका दिवशी, जवळपास दर तासाला एक आत्महत्या झाली होती... तरीही, एकाच वर्तमानपत्राच्या डाव्या पानावर, एका न दिसणा-या कोपर्‍यात, भारत भिका सावकारच्या आत्महत्येची बातमी छापून आली होती... भारत भिका सावकार हा कुणी प्रसिद्ध, नामवंत माणूस नसेल.

भारतीय टपाल खात्यातर्फे आता नागरिकांसाठी पोस्टल ओळखपत्र

लेखक अरुंधती यांनी रविवार, 27/06/2010 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय टपाल ऑफिस गाईडच्या ६३ व्या कलमान्वये आता पोस्टल ओळखपत्र देण्यात येणार आहे. अनेकदा लोक आपापले निवासस्थान बदलतात. त्यांना आपल्या नव्या पत्त्याचा सरकारी पुरावा सादर करणे बर्‍याचदा अवघड होऊन बसते. भारतीय टपाल खात्याने त्यावर एक उपाय शोधला आहे. टपाल खात्याकडून तुम्हाला आता तुमच्या निवासाचा पुरावा तुमच्या फोटोसहित मिळवता येतो. टपाल खाते हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्यामुळे त्यांच्याकडून मिळणारे ओळखपत्र हे ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र इत्यादींप्रमाणेच प्रमाणित ठरते.

वाकुल्या दाखवणारा अदृश्य मुद्राराक्षस

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 22/06/2010 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
ही गोष्ट काही महिन्यांपूर्वीची! माझ्या अनेक मित्रमैत्रिणींनी व परिचितांनी ''तू आंतरजालावर नियमित का लिहित नाहीस?'' वगैरे उद्गार काढून मला आंतरजालीय लिखाणाच्या दिशेने ढकलल्यानंतरचा काळ होता तो! तर, आंतरजालावरील एका मराठी संकेतस्थळावर माझा एक 'अभ्यासपूर्ण' लेख प्रसिद्ध झाला. वस्तुतः त्या लेखात अभ्यासपूर्ण वगैरे फारसे काही नव्हते. बरीचशी माहिती एकत्र संकलित करून दिली होती इतकेच! त्याचे कारणही हेच होते की जेव्हा त्या विषयावर मी आंतरजालावर मराठीतून माहिती शोधायला गेले तेव्हा अतिशय थोडी माहिती हाताशी लागली.

घुबडाचे पेलेट्स

लेखक शुचि यांनी सोमवार, 21/06/2010 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
काल आम्ही फिरायला बाहेर पडलो होतो. फ्रीवेवर नेहेमीप्रमणे लहान स्कंक, रकून सारखे प्राणी मधे मधे दिसत होते चिरडले गेलेले. यावेळेला मुलगी बरोबर असल्याने माझ्यातल्या "आई"ने ज्ञान द्यायची संधी दवडली नाही. मी मुलीकरता एक पुस्तक आणलय जे की तिने अजून वाचायचय पण मी वाचून संपवलय. त्या पुस्तकात- एका कुटुंबानी एक सोनेरी गरुडाचं पिल्लू पाळलेलं होतं आणि त्यांच्यापुढे समस्या ही होती की या पिल्लाला खायला काय घालायचं? कारण शिजवलेली कोंबडी, सॉसेज, मटण वगैरे खाऊन आठवड्या दोन आठवड्यात हे शिकारी पक्षी मरतात. या पक्षांकरता आख्खा उंदीर, रकून, स्कंक, खार, कोंबडी वगैरे असं खाद्य लागतं.

मिपावर प्रसिद्ध कसे व्हावे ?

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 21/06/2010 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
डीसक्लेमर :- खालील लेखन हे मौजमजा, विरंगुळा म्हणुन केले आहे. ह्या लेखात व सार्वजनीक जिवनात काही साम्य आढळल्यास तो एक योगायोग समजावा. खालील युक्त्या ह्या गंमत म्हणुन दिल्या आहेत, त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करु नये, तोंडावर पडल्यास लेखक अथवा मिपा जबाबदार नाही. "पर्‍या , यार मिपावर कोण विचारत नाही बे आपल्याला. इतके लेखन केले, प्रतिक्रीया दिल्या पण चार सदस्य पण धड ओळखत नाहीत." आमचे मित्रवर्य उद्वेगाने म्हणत होते.

बापाचा दिवस

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 19/06/2010 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
जून महिन्याचा तिसरा रविवार अख्ख्या जगाने बापजाद्यांच्या उत्सवासाठी राखून ठेवलाय. एरव्ही बापाचा दिवस सहसा कोणताही पोट्टा 'साजरा' करतांना दिसत नाही. मात्र बापाचा 'दिवस घालायला' सगळी चिरंजीव मंडळी न चुकता हजर होतात. कारण त्याच दिवशी इस्टेटीच्या लॉटरीची सोडत असते! असो. त्यामुळे काही फादर्स डे चं महत्व कमी झालेलं नाहीये. 'पप्पा वेडुल्या' मुली आजही मोठ्या उत्साहाने आपल्या डॅड करिता काहीतरी 'हटके' भेटवस्तू खरेदी करण्यासाठी गिफ्ट आर्टिकल्सची अनेक दुकाने या दिवशी पालथी घालतांना दिसतात. मातृदिनाइतका प्रतिसाद पितृदिनाला मिळत नसतो हे मात्र खरे.