Skip to main content

जीवनमान

लाचखोर लोकांनी -

लेखक विदेश यांनी रविवार, 24/07/2011 06:45 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल: रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी...) लाचखोर लोकांनी, भ्रष्ट साऱ्या मार्गांनी स्वार्थासाठी कायदाही तोडीला पायबंद घालू त्यांच्या खोडीला |धृ| नवी कोरी गाडी काळ्या पैशाची भरली ती भेसळीच्या मालाची गुंड आले तडीपार, तडीपार जोडीला |१| पायबंद घालू.. जात येत विमानानं देशात, परदेशात दलालीत डल्ला मारी देशात, मायदेशात त्यांनी मायदेशाचा टॅक्स का हो बुडविला |२| पायबंद घालू.. चीड नाही त्यांना देशद्रोहाची मिरवित शेखी स्विस बँकेची घोळघालू नाती सारी भूखंडाच्या वाढीला |३| पायबंद घालू..
काव्यरस

स्लेजिंग झिंदाबाद

लेखक मृत्युन्जय यांनी शनिवार, 23/07/2011 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक वाईट गोष्टीची सुरुवात चांगाल्यातुन होते म्हणे. उदाहरणार्थ माफिया. माफिया सुरुवातीला शेतकर्यांची संघटना होती. असहाय्य, लुबाडल्या जाणार्या शेतकर्यांनी आपल्या बांधवांच्या हितरक्षणासाठी आणि संरक्षणासाठी सुरुवातीला हत्यार हातात घेतले आणि मग रक्ताची चटक लागलेल्या बाघाप्रमाणे हळुहळु ही प्रामाणिक संघटना गुन्हेगारीकडे वळली. मूळ उद्देश विसरला गेला आणि लोकांना लुटणे हा धर्म बनला. स्लेजिंगचे थोडेफार असेच झाले. सुरुवातीला हा खेळ खेळीमेळीच्या वातावरणातच पार पाडायचा. नंतर स्लेजिंगच्या राक्षसाने उग्र रुप धारण केले. आंतरराष्ट्रीय राजकारणात उर्मटपणाचा सगळा ठेका अमेरिकेने घेतला आहे.

मी चित्रकार कसा बनलो... काही आठवणी...

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 23/07/2011 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
मी एक चित्रकार... .... अमुक एका ठिकाणी पोचायचे म्हणून नव्हे, तर निव्वळ आवड म्हणून माळरानावर, राना-वनात भटकंती करणारा, जे आवडेल, ते चित्रात, शब्दात मांडणारा एक प्रवासी.... माझं जीवन हे सुध्धा अशीच एक निरुद्देश भ्रमंती... यात जे जे काही बघता-करता आलं, ज्यात मी काही काळ का होईना, रमून गेलो, त्याचा मागोवा घेण्याचा हा एक प्रयत्न ... चांदोबा, मेणबत्ती आणि निसर्ग .... इंदूर मध्ये ३० सप्टेंबर १९५१ रोजी जन्मलो. जन्मापासून सव्वीसाव्या वर्षापर्यंत माळव्यात, इंदुरात वाढलो, पण मध्यंतरी सातवी ते नववी महाराष्ट्रात सांगली जवळच्या माधवनगरात होतो.

स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 22/07/2011 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ "येत्या २४ तासात विदर्भ, मराठवाडा आणि प. महाराष्ट्रासह कुठेकुठे मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून त्यापुढील ३६ तासात हवामानामध्ये फ़ारसा बदल संभवत नाही" अशी उद्‍घोषणा आकाशवाणी किंवा दूरदर्शनवर झाली तरी पावसाचे दर्शन होईलच याची खात्री देता येत नाही. कधीकधी २४ अथवा ३६ तासच काय ४८ अथवा ७२ तास उलटून जातात पण आकाशात कापसाच्या बोंडाएवढाही तुकडा दुर्बिनीने शोधूनही नजरेस पडत नाही.

बहरीन - मध्यपुर्वेच्या वाळवंटातील मृगजळ

लेखक सोत्रि यांनी शुक्रवार, 22/07/2011 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
व्यावसाइक कामानिमीत्त मध्यपुर्वेत, सौदी अरेबीया, रियाधला जाण्याचा योग आला.  मध्यपुर्वेत जाण्याची ही पहिलीच खेप. थोडीफार उत्सुकता होती या प्रवासाची. पण येण्यापुर्वी गुगलींग केल्यावर फारच निराशा झाली. सौदी अरेबीया, ज्या देशात मुस्लीम बांधवांची मक्का आणि मदीना ही पवित्र तीर्थक्षेत्रे आहेत, हा देश पुर्णपणॆ कुराण्यातल्या 'शरिया' तत्वांवर चालतो. शरियाच्या पुर्ण कलमांचे (कायदे) काटेकोर पालन केले जाते. गैर मुस्लीमांसाठी जाचक असे खालील मुद्दे 1. सर्व स्त्रियांनी बुरखा (अबाया) घालणे अनिर्वार्य. (हा कायदा धर्मातीत आहे) 2. सार्वजनीक ठिकाणी स्त्री आणि पुरुष  एकत्र येणे निषिद्ध 3.

प्रिय कॅटरीना,

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 21/07/2011 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय कॅटरिना, सर्वप्रथम म्हणजे तू सुरेख दिसतेस आणि माझ्यासारख्या बर्‍याच जणाना तुझं रुपडं आवडतं हे आवर्जून सांगतो. ते असो. परवा बाकी बेटा (तुला बेटा म्हणू का? आता मी चाळीशी पार केली आहे त्यामुळे तेच मला शोभून दिसेल!) :) कुठल्याश्या वृत्तवहिनीशी बोलताना तू स्वत: जन्माने अर्धी एशियन व अर्धी युरोपियन आहेस हे तू अगदी बिनदिक्कत सांगितलंस. शिवाय त्यात काही लपवण्यासारखं नाही हेही मनमोकळेपणाने सांगितलंस. पण हे बोलताना उदाहरण म्हणून तू राहूल गांधीचं नाव घेतलंस ती मात्र एक मज्जाच केलीस. त्याकरता सर्वप्रथम तुझं मनापासून अभिनंदन..!

भार गेला, शीण गेला, अवघा झाला आनंद.....

लेखक प्यारे१ यांनी बुधवार, 20/07/2011 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
अप्पा गेले. नाही विश्वास बसत अजून. अप्पा जाणं कसं शक्य आहे? अहो आत्ता उठतील आणि फिरायला जातील, भगवदगीतेतील श्लोक म्हणतील, नातू- नातींशी गप्पा मारतील, तब्बेतीची चौकशी करायला आलेल्याचीच काय चाललंय म्हणून चौकशी करतील, हसत हसत फिरकी घेतील, एखाद्या गोष्टीबद्दल सल्ला न मागता, न विचारता देतील, असे कसे जातील? नाही. खरंच अप्पा गेले. जीवन जगावं कसं आणि मरणाला स्वीकारावं कसं याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे अप्पा. पु ल देशपांडे म्हणाले होते, ज्यांच्या पायावर डोकं ठेवावं असे पाय उरले नाहीत. माझं सुदैव की असे पाय मला,आम्हाला लाभले.

दहशतवाद - मी काय करू शकतो?

लेखक निनाद यांनी शुक्रवार, 15/07/2011 06:13 या दिवशी प्रकाशित केले.
कोणताही दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संताप दाटून येतो! सरकारच्या नावाने खडे फोडले जातात, मिडियाला शिव्या घातल्या जातात, अमेरिका आणि इस्राएलचा धडा भारताने गिरवावा वगैरे मागण्या होतात, संतापाच्या भरात, 'संपवा यांना' वगैरे सारख्या कडवट प्रतिक्रिया दिल्या जातात. यातले काही घडत नाही किंवा घडू शकत नाही म्हणून मग चरफडत बसणं... पण या पलिकडे जाऊन, मी माझ्या परीने अगदी छोट्या पातळीवर दहशतवादा विरुद्ध लढण्यासाठी काय करू शकतो? याविषयी माहिती देऊ-घेऊ या.
  • तुमचा उपाय कितीही साधा सोपा असला असला तरी येथे नक्की द्या.
  • तुम्ही काय केले हे दिलेत तरी चालेल.