शिवराज्याभिषेक-३३४ वा वर्धापन दिन !
"आज सकाळपासूनच आपला "बा" लंय जोमांत हाय !" असं मनांत येताच बजाबा आपल्या बापाला म्हणजे श्रीपतीला म्हणाला,"आंज लगीन घाई लागलिया जनू बा तुंज्या मांगं?काई इशेस?"
श्रीपती आपल्या कल्ल्यापर्यंत पोचलेल्या आकडेबाज मिशीवर पालथा हात फिरवंत म्हणाला,"आरं , काल बाजारला ग्येलो व्हतो तवाधरंनंच मांजा जीव आबाळायेवढा जांलाय बग !आरं , आपला धनी 'शिवाजी राजा आता दोन रोजांतच आबिषेक करुन घ्येत परत्यक्षात राजा हुनार हाय' अशी खबंर दिली बग सवता हंबीरमामा मोहित्यानं मला ! आन् त्ये आईकल्यापासनं मांजं काळीज सुपायेवढं जांलया बग !
मिसळपाव
