Skip to main content

गुंतवणूक

पैशाचे झाड भाग :-२

लेखक अतरंगी यांनी मंगळवार, 24/01/2023 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
पैशाचे झाड भाग : १. https://www.misalpav.com/node/51032 हो नाही करत शेवटी ऐन वेळी कोणाचेही कॅन्सल न होता, कोणतेही विघ्न न येता, ठरल्याप्रमाणे सगळा गृप कोकण ट्रिपला निघाला. बर्‍याच दिवसांनी सगळे जण एकत्र ट्रिपला निघाल्यामुळे थट्टा मस्करीला पार ऊत आला होता. क्षणाक्षणाला हसण्याचे फवारे फुटत होते. नवे- जुने संदर्भ घेऊन एकेकावर धपाधप जोक्स पडत होते. प्रत्येक वेळेस मुले गाडीतच पेग भरायला लागली की आनंदच्या मनात धाकधूक होत होती. अजून नव्या गाडीची नवलाई संपली नव्हती. पाच जणात दोन खंबे कधी संपले पत्ता पण नाही लागला.

पैशाचे झाड- भाग १

लेखक अतरंगी यांनी सोमवार, 23/01/2023 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
"हॅलो" "बोल" " कुठे आहेस?" " घरी" "किती वेळ लागेल?" "का?" "अरे, का म्हणजे? तू येतोएस ना? सगळे थांबले आहेत?" "कोण थांबले आहेत? आणि कुठे?" विनितला कळेचना की, हा असा का बोलतोय? "अरे तू गृपवर मेसेज नाही पाहीले का?" "नाही, माझा स्मार्ट फोन बंद आहे. काय झालं? " "नित्याच्या घरी सगळे बसलोय ये लवकर.." "स्टॉक आहे की घेऊन येऊ?" "अरे तीन खंबे आहेत, सगळे आज लोळत नाहीतर झिम्मा खेळतच घरी जाणार आहेत.

बिग बुल

लेखक लॉरी टांगटूंगकर यांनी बुधवार, 17/08/2022 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट, मार्जिन कॉल ते स्कॅम १९९२. जवळपास प्रत्येक सिनेमा आणि टीव्ही सिरिजने शेअर बाजाराला सट्टा बाजार स्वरूपात दाखवलं आहे. हा सट्टा खेळून नुकसान करून ठेवल्याचे एक तरी उदाहरण प्रत्येक घरात असते. या सर्व प्रकारात, बहुतांश ठिकाणी राकेश झुनझुनवाला नाव माहीती असलं तरी कामाबद्दल फार कमी माहीती असते. नाव माहीती असल्याचं कारण म्हणजे बनलेला पैसा. कामाबद्दलची माहीती तशी कमी प्रकाशझोतात असते. बाजारातले काम आणि त्याचे महत्व मेन स्ट्रीम मध्ये फार कमी वेळा दिसते.

Calendar spread कॅलेंडर स्प्रेड आणि इतर ऑप्शन स्ट्रॅटेजीज

लेखक hrkorde यांनी रविवार, 19/09/2021 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या मे पहिल्या आठवड्यात निफ्टी 14500 असताना डबल कॅलेंडर स्प्रेड केले होते. 14500 मे कॉल व पुट सेल केले 14500 जून कॉल व पुट बाय केले. नुसतेच कॉल किंवा नुसतेच पुट जोडी केली की त्याला सिंगल स्प्रेड म्हणतात , दोन्हीपण एकदम केले की त्याला डबल स्प्रेड म्हणतात. चौघेही एकमेकांना हेज करतात, सुरुवातीला कधी 200 मायनस , कधी 800 प्लस असे होत रहाते , 2100 मायनसपण झाले होते , पण हट्टाने सुरूच ठेवले , कारण ऑप्शन झिजायला म्हणजे क्षय व्हायला वेळ लागतो . 15 दिवस गेले की करंट मंथचे ऑप्शन्स झिजू लागतात व हळूहळू प्रॉफिट दिसू लागते . ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सामान्य माणसाला 2 राक्षस छळत असतात १.

डोक्याला शॉट [सप्तमी]

लेखक गड्डा झब्बू यांनी बुधवार, 21/07/2021 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वपिठिका भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!

फॅक्टर इन्व्हेस्टिंग ... गुंतवणुकीचा एक वेगळा मार्ग

लेखक अमर विश्वास यांनी शनिवार, 08/05/2021 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
लेखाच्या सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करतो ... म्युच्युअल फंडावर लिहिताना मला १२ वर्षांचा अनुभव होता. फॅक्टर इन्व्हेस्टिंग ही माझ्यासाठी सुरुवात आहे. त्यामुळे हे "संकल्पना" (Concept) य स्वरूपात आहे. मिपा वरच्या तज्ञ आणि अनुभवी लोकांचे प्रतिसाद मला या स्ट्रॅटेजी मध्ये मदत करतील म्हणूनच हा लेखनप्रपंच _____________________________________________________________________________________________________________________________ सुरुवात ......

म्युच्युअल फंड्स .... हमखास कोट्याधीश होण्याचा मार्ग (भाग - ४ अंतिम)

लेखक अमर विश्वास यांनी बुधवार, 21/04/2021 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या गुंतवणुकीच्या प्रवासातले म्युच्युअल फंड हे महत्वाचे स्थानक आहे. सिप च्या माध्यमातून गेली बारा वर्षे गुंतवणूक करण्याचे फायदे मी अनुभवतो आहे. हेच अनुभव तुमच्या समोर मांडण्याची संधी ह्या निमित्ताने मिळाली. मी इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्ट नाही. या लेखमालेतील माहितीचा कोणाला फायदा झाला तर आनंदच आहे.

Index Investing भाग २

लेखक अतरंगी यांनी रविवार, 18/04/2021 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १:- http://misalpav.com/node/48675 आपण जेव्हा आपल्या स्वकमाईचे पैसे जास्त परताव्याच्या अपेक्षेने गुंतवत असतो तेव्हा सर्वात आधी त्यातले फायदे आणि तोटे समजून घ्यायला हवेत. आपण ज्यात पैसे गुंतवत आहोत त्यात काय, किती आणि कोणत्या प्रकारची रिस्क आहे हे समजून घ्यायला हवे. या भागात आपण Index Investing चे आणि वेगवेगळ्या ईंडेक्सचे फायदे/ तोटे पाहू. १. Broad Based Indices:- ह्यात प्रामुख्याने Nifty 50, Sensex, Nifty next 50 सारख्या ईंडेक्स येतात. याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे यातील कंपन्या फक्त मार्केट कॅप वर ईंडेक्स मधे असतात.

म्युच्युअल फंड्स .... हमखास कोट्याधीश होण्याचा मार्ग (भाग - ३)

लेखक अमर विश्वास यांनी शनिवार, 17/04/2021 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या भागात आपण इक्विटी फंडांचे काही प्रकार पहिले ... या भागात इक्विटी फंडाचे अजून काही प्रकार आणि डेट व इतर फंडाबद्दल बोलूया ______________________________________________________________________________________________________________________________ १. सेक्टर फंडस् : नावाप्रमाणेच हे फंड्स एकाच सेक्टर मधल्या कंपन्यांच्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करतात . जसे pharma, banks , natural resources, manufacturing इत्यादी . जर एखादा सेक्टर भविष्यात जास्त प्रगती करेल असे वाटत असेल तर असे फंड फायद्याचे असतात. पण दीर्घ मुदतीत एकच सेक्टर सातत्याने प्रगती करेल हे अवघड वाटते.

Index Investing भाग १

लेखक अतरंगी यांनी शनिवार, 17/04/2021 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
गुंतवणूक हा तसे पहायला गेले तर फार मोठी व्याप्ती असलेला आणि व्यक्तिसापेक्ष विषय आहे. गुंतवणूक कधी, कुठे, किती करावी याविषयी आंतरजालावर मुबलक प्रमाणात लेखन आहे. आजही अनेक जण स्वतःच्या ज्ञानानुसार याविषयी लिहित असतात. गुंतवणूक करण्यासाठी अनेक पर्याय आहेत, त्यातील एक म्हणजे कंपन्यांचे समभाग म्हणजेच शेअर्स आणि म्युच्युअल फंड्स. आजमितीला भारतात ५०४४ कंपन्यांचे शेअर्स लिस्टेड आहेत आणि हजार एक म्युच्युअल फंड आहेत. यात नक्की कोणत्या शेअर्स/फंड मधे गुंतवणूक करावी आणि किती हे ठरवणे हा फार अभ्यासाचा आणि क्लिष्ट विषय आहे.