आमच्या कंपनीचे (फुग्रो) हेडऑफीस लायशेंडॅम (Leichendam) हॉलंड इथे असल्याने दरवर्षी किमान दोन तरी चकरा होतातच हॉलंडच्या. यावेळी कालच्या मे महिन्यात परत एक दौरा झाला. यावेळी वुरबर्ग येथे राहण्याची सोय केली होती कंपनीने. इथे आलो की इथली फुले कॅमेर्यात पकडणे हा माझा छंद असतो. या वेळी ठरवले होते की नेहेमीच ट्युलीप्स च्या मागे लागतो, (मग सिझन असो वा नसो, मी आपला ट्युलीप्स शोधत फिरतो वेळ मिळेल तसा) या वेळेस त्या वाटेला जायचे नाही. मग इतर फुलांच्या मागे लागलो.