Skip to main content

चित्रपट

काही सुधाराव्याशा वाटणार्‍या ( प्रसिद्ध) सिनेमांच्या कथा...

लेखक भडकमकर मास्तर यांनी बुधवार, 21/05/2008 02:56 या दिवशी प्रकाशित केले.
१. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे तो दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे १९९५ ऑक्टोबर ला आल्यापासून मग अनेक वर्षे की काय तो एका थिएटराला चालला... आम्ही १९९५ मध्ये सुट्टीत पाहिल्यानन्तर पुन्हा कॉलेज ग्रुपबरोबर परत पाहिला... इतरांना जाम आवडला...

मॅट्रिक ते मॅट्रिक्स

लेखक हेरंब यांनी शनिवार, 10/05/2008 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
"द मॅट्रिक्स" हा प्रसिद्ध इंग्रजी सिनेमा पाहिल्यावर असे मनांत आले की हा सिनेमा जर कोणी गांवाकडच्या व्यक्तिने पाहिला तर तो त्याची गोष्ट कशी सांगेल ? या कल्पनेवर ही कथा लिहिली आहे. म्या सदा येळकाढूकर, मुक्काम मुंबै !! माज्या बापाची गांवी शेती हाये. पन् म्या शिकावं अशी माज्या आयबापाची लई विच्छा. तसा म्या गेलो साळंत, पन् म्यॅट्रिकला गाडी फेल ! लई धडका मारल्या बगा पन् काईच उपेग नाय जाला. टकुर्‍याचा भुगा व्हायची येळ आलती. म्हंजी व्हायाचं काय की मला झ्वाप यायची कंदीबी, झ्वापलेला असताना काय भन्नाट सपानं यायची राव ! पर कोनाला सांगाया ग्येलं तर येडं हाय म्हनायची. शेवटी बा थकला.

बासूदांचे 'अनुभव'

लेखक भोचक यांनी सोमवार, 28/04/2008 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
बासू भट्टाचार्य एक बिनधास्त व्यक्तिमत्व होऊन गेलं. मानवी नातेसंबंध विशेषतः स्त्री-पुरूष संबंध हा त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. त्यावरच अनुभव, अविष्कार आणि गृहप्रवेश ही चित्रत्रयी त्यांनी दिली. काही वर्षांपूर्वी आलेला आस्था हा चित्रपटही त्याच साखळीतला होता, असे म्हणायला हरकत नाही. नुकतंच बासूदांचं 'अनुभव' हे आत्मकथनपर पुस्तक वाचलं. 'सकाळ'मध्ये काही वर्षांपूर्वी हे आत्मकथन सदरातून प्रसिद्ध होत होतं. पण एकत्रितरित्या पुस्तकातून वाचताना त्याचा आनंद काही औरच. फिल्मी मंडळींच्या आत्मचरित्रातून अनेक गोष्टी समजतात. याच वर्तुळात रहाणारी मंडळी कशी कचकड्याची असतात, हेही त्यातून दिसून येत असते.

शौर्य : नितांतसुंदर चित्रपट

लेखक छोटा डॉन यांनी रविवार, 27/04/2008 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच एक "इंडियन आर्मी" हा बेस असलेला नितांतसुंदर चित्रपट पाहण्याचा योग आला. सर्वसाधारणपणे हे असे चित्रपट म्हणजे रक्तरंजित, बटबटीत, टाळ्या घेणारे डायलॉग, प्रखर देशभक्तीचे सिन्स याने भरलेले म्हणजे थोडक्यात पैसावसूल असतात. पण "शौर्य" हा हटके आहे, हा कुठला युद्धपट नाही तर तो आहे बॉर्डर वर लढणार्‍या सर्वासामन्य सैनीकाची मानसिकता टिपणारा एक मस्त चित्रपट आणि तरीही पैसावसूल आणि हमखास पहावा असा .... पिक्चरची सुरवात होते साधारणता मध्यरात्री चालू असलेल्या आर्मीच्या दहशतवाद्यांना हुडकन्यासाठी चालू असणार्‍या कोंबिंग ऑपरेशनपासून.

"टिंग्या" एक ह्रद्यस्पर्श अनुभव.

लेखक प्रगती यांनी मंगळवार, 15/04/2008 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
आजच "टिंग्या" हा प्रकाश हाडवळे यांचा चित्रपट पाहिला. खेडेगावाचं व तेथिल ग्रामिण जीवनाचं नितांतसुंदर चित्रण केलं आहे. एक सरळ साधी कथा आहे टिंग्या व त्याचा बैल पतिंग्या याची, बरोबरोनी आजच्या शेतकर्‍याचं दाहक वास्तव आपल्या समोर येतं. ओतुर जवळच्या मांडवा या खेडेगावात ही कथा घडते, लावणी चे दिवस असताना अचानक टिंग्याच्या दोन बैलांपैकी एक बैल (पतिंग्या) बसतो म्हणजेच कामाला निरुपयोगी होतो.

"वळू":- मराठी महासिनेमा ...

लेखक छोटा डॉन यांनी गुरुवार, 03/04/2008 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच्या अतिशय छोट्या पुणे ट्रीप मध्ये "वळू" नावाचा अतिशय मोठा [ महान या अर्थी] सिनेमा बघण्याचा योग आला. त्याआधी "नेटवर" व वॄत्तपत्रातून याविषयी बरेच वाचले होते त्यामुळे सिनेमाबद्दल बर्‍याच अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. यामुळेच कदाचित सिनेमाला जाताना तो एकदम तद्दन बकवास निघण्याची शक्यता वाढली होती कारण पुर्वानुभव ... पण नाही "वळू" खरच झकास आहे.

दिल्ले दान... घेतले दान...

लेखक आजानुकर्ण यांनी बुधवार, 02/04/2008 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा लाडका वगैरे सुपरष्टार शेतकरी असल्याचे जाहीर झाले आणि 'सत्यमेव जयते' नुसार अखेर सत्याचा विजय झाला. (कोण रे तो भिखू म्हात्रेचा सत्या म्हणतोय? सुपरष्टारच्या कलागुणांची कदर नाही त्याला! ठेचा साल्याला!) डोक्याला मुंडासे बांधून सुपरष्टार बैल हाकणार.

"रजनीकांत" आणि काही "मुक्ताफळे ".............

लेखक छोटा डॉन यांनी बुधवार, 13/02/2008 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
* कांद्यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल पण 'रजनीकांत' कांद्याच्या डोळ्यात पाणी आणू शकतो .... * तुम्ही 'रिसायकल बिन ' मधल्या फाईल डिलिट करू शकत असाल पण तो खुद्द 'रिसायकल बिन' डिलीट करू शकतो ........ * तो तुम्हाला 'कॉर्डलेस फोन' च्या साह्याने गळफास देउ शकतो ........ * तो पीयानो वाजवून त्यामधून 'व्हायोलीन' ची सुरावट काढू शकतो ......... * तो खोलीत प्रवेश केल्यावर तेथील अंधार दूर करण्यासाठी तो लाईट चालु करत नाही , त्याऐवजी तो अंधार बंद करतो ....... * त्याला एकदा 'हार्ट-ऍटॅक' आला होता , तेव्हापासून त्याचे ह