Skip to main content

चित्रपट

कंहाभारत आणि सरकार राज

लेखक अनामिक यांनी बुधवार, 09/07/2008 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
मी मिसळपाववर नवा आहे आणि थोडाफार लिहायचा प्रयत्न करणार आहे. काही चुका झाल्या तर निदर्शनास आणून देऊन योग्य मार्गदर्शन करावे. काल देवदत्त यांनी लिहिलेला पौराणिक कथांवरील लेख वाचला आणि youtube वर नव्याने सुरू झालेलं महाभारत (की कंहाभारत म्हणावं? ) पाहिलं. या मालिकेच्या दिग्दर्शकानं सरकार राजच्या रामूकडून ट्रेनिंग घेतलेलं दिसतंय. तसेच शिवाजी नागरे हे दररोज नवी लुंगी वापरत असल्याने त्यांच्या वापरलेल्या काळ्या लुंग्यांपासून कंहाभारतातल्या सगळ्याच पात्रांचे कपडे बनवलेत असा माझा ठाम विश्वास आहे. सगळ्यांना काळे कपडे घालायला लावण्यामागे दुसरे काही कारण असू शकते असं मला वाटत नाही.

अखेर धमाल्याचं 'वाजवा रे वाजवा' वाजलं! :)

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 08/07/2008 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
तर मंडळी, आज सकाळीच शिवाजीनगर स्टेशण (भें.. शुलेची ऐशीतैशी!) व परिसरात 'मुंबईहून कुणीतरी बडी असामी येणार आहे बॉ!' अशी लोकांची चर्चा चालली होती. कारण डॉक्टर दाढे आणि पेठकर आपापल्या गाड्या घेऊन महामहीम तात्यासाहेब अभ्यंकरांना प्रेमाने उतरवून घ्यायला आले होते. हां, आता आपण आपलं स्वत:ला महामहीम वगैरे म्हणून घ्यायचं, अहो पण कसला आलाय डोंबलाचा महामहीम? या दीडदमडीच्या तात्याला त्या शिवाजीनगगर फलाटावरचं कुत्रंदेखील ओळखत नव्हतं! :) तर ते असो.. ! ठरल्याप्रमाणे पेठकरशेठ, तात्या अन् डॉ प्रसाद दाढे काटा किर्र् मध्ये मिसळ खायला गेले. मिसळ बाकी खरोखरंच फसकिल्लास होती.

वळु

लेखक राजस यांनी शुक्रवार, 27/06/2008 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
वळु बर्‍याच दिवसांनी मराठी चित्रपट बघण्याचा योग आला. खरे तर मराठी चित्रपट बघायला मला आवडते. मध्यंतरीच्या काळात सचिन व महेश कोठारे चे चित्रपट छान असायचे. परंतु त्यानंतर मराठी चित्रपट एकाच साच्यात अडकला तेंव्हापासुन तो नकोसा व्हायला लागला होता. श्वास पासुन ही परिस्थीती बदलायला लागली आहे. तर बरेच दिवसांनी चित्रपट बघितला, वळु. कथानक सर्वांना माहीत झालेच असेल. एका गावात वळुने उच्छाद मांडलेला असतो त्यामुळे फॉरेस्ट ऑफीसरला बोलावणे पाठवले जाते. त्याबरोबर त्याचा भाऊ डॉक्युमेंटरी करण्यासाठी येतो. गावकर्यांना एकत्र जमवुन डॉक्युमेंटरी करताना कथानक उलगडत जाते.

'सनई चौघडे '( चित्रपट ) एक फसलेला रिऍलीटी शो......

लेखक प्रगती यांनी सोमवार, 23/06/2008 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट : " सनई चौघडे "( कांदे पोहे ) रविवार लोकसत्ता मधील चांगले परीक्षण ( कुणीही चुकवू नये असा चित्रपट ) वाचून चित्रपट बघायला गेले आणि पदरी घोर निराशा आली या चित्रपटामध्ये कुठ्ल्या गोष्टीला मेळ्च बसत नाही अशा अतार्किक घटनांची संगती आहे. या चित्रपटाद्वारे नक्की काय सांगायचं आहे त्यांनाच समजलं नाही त्यामुळे आपल्याला पण काहीच समजत नाही :( सनई चौघडे या नावामुळे आपल्याला वाटतं की लग्नामधील किंवा लग्नापुर्वी होणार्‍या गमती जमती यावर हा चित्रपट आहे, पण असं नसून "कांदे पोहे" नावाचं एक वधु - वर सुचक केंद्र असतं आणि ते मुला मुलींच्या ह्जारो अर्जामधून एकमेकांना अनुरूप अशा पाच जोड्या निवडतात, आणि त्

रेडिओ सिलोनच्या सुप्रसिद्ध निवेदिका पद्मिनी परेरा बेळगावात...

लेखक अविनाश ओगले यांनी रविवार, 22/06/2008 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
रेडिओ सिलोनच्या सुप्रसिद्ध निवेदिका पद्मिनी परेरा बेळगावात... आजची संध्याकाळ बेळगावकरांच्या आयुष्यातील एक अनोखी, अविस्मरणीय संध्याकाळ ठरली आहे. रेडिओ सिलोनच्या सुप्रसिद्ध निवेदिका पद्मिनी परेरा यांनी आज बेळगावमध्ये एक कार्यक्रम सादर केला. बेळगावात सध्या वास्तव्यास असलेले जुन्या चित्रपट गीतांचे रसिक संग्राहक विजय नाफडे यांनी हा योग जुळवून आणला. त्यांनी निवडलेली तीस जुनी गाणी पद्मिनी परेरा यांच्या अप्रतिम निवेदनासह रसिकांनी छोट्या पडद्यावर पाहिली.

'हाल ए दिल'ः हालच हाल

लेखक विकीपियु यांनी शनिवार, 21/06/2008 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या चित्रसृष्टीवर नेहमीच असा आरोप केला जातो की आपले दिग्दर्शक हॉलिवूडपटांमधून उचलेगिरी करत असतात. मात्र त्यांनी तो खोटा ठरविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आता हॉलिवूडपटांमधून नव्हे तर हिंदी चित्रपटांतूनच चोरी केली जाऊ लागली आहे. या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या 'हाल-ए-दिल'चे हाल यापेक्षा वेगळे नाहीतच. दिग्दर्शकाने 'जब वी मेट' या चित्रपटाची कथा अगदी सराईतपणे चोरली आहे. शेखर सुमनाचा मुलगा अध्ययन सुमन या चित्रपटातून इंडस्ट्रीमध्ये करिअरची सुरुवात करीत आहे. या व्यतिरिक्त चित्रपटात काहीही नवीन नाही.

सिंहासन !

लेखक संदीप चित्रे यांनी शुक्रवार, 20/06/2008 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
'सिंहासन' मी दहावीच्या बोर्डाची परीक्षा चालू असताना पहिल्यांदा पाहिलाय ! विजय तेंडुलकर गेले आणि 'सिंहासन' आठवला. “....तर नव्या मुख्यमंत्र्याला सचिवालयासमोर मी जोड्यानं मारीन !” हे म्हणणारा डिकास्टा आठवला !! पाठोपाठ आठवायला लागले -- 'तें'च्या क्लासिक्समधले प्रसंग. सामना, सिंहासन, अर्धसत्यमधले प्रसंग !! घाशीराम कोतवालमधले प्रसंग !!! खरंतर सामना,सिंहासन पहिल्यांदा झळकले तेव्हा मी खूप लहान होतो. 'घाशीराम...' पहिल्यांदा रंगमंचावर आले तेव्हा तर दोनेक वर्षांचाच होतो.

बॉलिवूड मधले हिरो - भाग

लेखक सुचेल तसं यांनी शुक्रवार, 13/06/2008 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट हे गेल्या कित्येक वर्षांपासुन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. सगळ्यात पहिला चित्रपट कोणता पाहिला हे काही एवढं आठवत नाही. पण जेवढया वेगाने अभ्यासातला रस संपत गेला तेवढयाच, किंबहुना जरा जास्तच, वेगाने चित्रपटातला रस वाढत गेला. माझ्या आधीच्या पिढीला देव-राज-दिलीप ह्या त्रिकुटाचं आकर्षण होतं पण मला मात्र ते काही विशेष वाटले नाहीत. देव आनंदचा पाहिलेला अव्वल नंबर आणि न पाहिलेले सेंसॉर, लव @ टाईम्स स्क्वेअर हे चित्रपट त्याच्याविषयीचा आदर वाढवायला पुरेसे होते. राज कपूर बद्दल तर काही बोलायलाच नको. त्याचा संगम हा चार तासांचा चित्रपट मी प्रत्येक वेळी दोनच तास पाहू शकलो. राम तेरी गंगा..

मराठी कलाकारांनी दिल्ली दणाणून सोडली!

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 11/06/2008 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
५४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधे मराठी कलाकारांनी आपली ठसठशीत मोहोर उमटवली. वाचा सविस्तर बातमी इ-सकाळला. मधुर भांडारकर, दिलिप प्रभावळकर, स्वानंद किरकिरे, अमोल पालेकर, नीना कुलकर्णी, आरती अंकलीकर, अशोक पत्की, अनिल पलांडे इ. प्रतिभाशाली मराठी कलाकारांचे हार्दिक अभिनंदन!! चतुरंग