Skip to main content

Accepted (2006)

लेखक आत्मशून्य यांनी बुधवार, 19/01/2011 06:11 या दिवशी प्रकाशित केले.
कथेचा नायक बार्टलबी (Bartleby Gaines) हा एक टीनेज मूलगा तूमच्या माझ्या सारखा एक सामान्य व्यक्तीमत्वाचा, थोडासा धडपड्या . जो त्याच्या मीत्रांसोबत हाय स्कूल मधून (मराठीत आफ्टर ट्वेल्थ) कोलेजला जाण्याचे मनसूबे रचत आहे. व्यक्तीमत्व सामान्यच परंतू पोरगा एकदम करामती आहे, म्हणूनच कूठे फेक आयडी (वोटर आयडी , लायसंन्स इ...) बनव अथवा आवडत्या मैत्रीणीच्या पार्टीसाठी (भलेही त्याला आमंत्रण नसेल) तीच्या घराच्या हीरवळीला पाणी घाल असे समाज ऊपयोगी उद्योग करणारा (कभी हा कभी ना चा शाहरूख म्हणाना) गूणी बाळ अभ्यासात थोsssssडा कच्चा पण व्यवहारात तसा हूश्शार.

भज्जी पार्टी

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 17/01/2011 07:15 या दिवशी प्रकाशित केले.
कधी नव्हती तशी, हवा थंडगार होती सुर्याने कापसाची रजाई ओढली होती हवेच्या झुळूका गुदगुल्या करून जाती ग्लासांनी भज्यांची ऑर्डर सोडली होती नाकाने इकडेतिकडे पाहीले थोडे हुंगून पिणारे केव्हाचेच गेले होते रंगून पेय ओरडले भजी!

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा.

लेखक ५० फक्त यांनी शुक्रवार, 14/01/2011 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना २०११ मकर संक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्त्त आमच्याकडे आमच्या सॉ. नि आज बाजरीच्या भाकरी व भाजी असा बेत केला होता. आपल्या तोंडाला पाणी सुटण्यासाठी / जळजळ होण्यासाठी खाली काही फोटो देत आहे. पहिला फोटो बाजरीची भाकरी व लोणि आणि या फोटोत त्याबरोबर भाजी पण आहे, असो संक्रांतीचं स्पेशल स्लोगन काय तर - तिळगुळ घ्या गोड गोड बोला, आणि त्याची पण सोय केलेली आहे.

आमंत्रण सहलीचं

लेखक ५० फक्त यांनी शुक्रवार, 14/01/2011 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. मिपावर आल्यानंतर काही दिवसातच माझ्या भुलेश्वरच्या सहलीचा व्रुतांत इथे टाकला होता, त्यावर ब-याच प्रतिसाद्कांनी या ठिकाणी जाण्यांत इंटरेस्ट दाखवला होता. काही मिपाकरां बरोबर खव मधुन चर्चा झाली होती, आज श्री. गणेशा बरोबर बोलुन १६.०१. २०११ रविवार रोजी सकाळी भुलेश्वरला जायचं ठरलं आहे. काही मिपाकरांना खव व व्यनितुन कळवलं आहे, तरी ही नविन मित्र मॅत्रिणि जोडायची हॉस भारी म्हणुन खुलं आमंत्रण देतो आहे. साधारण प्लॅन असा आहे, १६.०१.२०११ ला सकाळी पुण्यातुन १०च्या सुमारास निघुन भुलेश्वर येथे जाणे , अर्थात जाताना वाटेत काहीतरी खाणं होईलच.

त्री स्तरीय

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 13/01/2011 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
धकधकत्या र्‍हदयाने किंवा धपापत्या उराने त्या बालेने प्रवेश केला. तारुण्याच्या तृष्णेने तरारलेल्या नजरेने सभोवतालच्या तरुणांनी तीला तस्मात तिष्ठयामी म्हणत तेरा तोफांची सलामी द्यावी त्या प्रमाणे नजरेनेच तहे दिलसे तृप्तीची पावती दिली. तिच्या एका नजरेने तरून जावे तरुतल निवास करण्याची त्यांची तयारी होती. लाखो दिलांच्या पायघड्यांवरून ती नाजूक पदन्यास करीत त्या आसनावर स्थापन झाली. ज्याला ती धुडकावेल त्यालासुद्धा ती त्याच्याशी बोलली याचे समाधान लाभायचे . तीच्या तीव्र स्वरात देखील त्याला तेजस्वी पंचमाचा भास व्हायचा त्या मदालसेच्या मैत्रीसाठी हपापलेले ते तरून तीचा शब्द हुकूम म्हणून झेलायला तयार हो