Skip to main content

मत

मॅजिक किंगडम!

लेखक मीली यांनी गुरुवार, 22/04/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मॅजिक किंगडम लिबर्टी स्वेयर बोटीने आम्ही मॅजिक किंगडम च्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आलो. बोटीतून दिसलेले डिस्ने चे रेसोर्ट. गजबजलेल्या मुख्य रस्त्यावरून थोडे पुढे गेलो आणि सिंड्रेला चा महाल दिसला.

अ‍ॅटमबॉम्ब, खिमा पॅटिस नि चाय

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 21/04/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यपूर्व आशिया हा संपूर्ण जगासाठी अनेक कारणांमुळे महत्त्वाचा, कुतूहलाचा नि विवादांचा ठरलेला भूप्रदेश. प्राचीन काळी जेव्हा पौर्वात्य नि पाश्चिमात्य जगाचे ऋणानुबंध मध्यपूर्वेतून खुष्कीच्या मार्गे होणार्‍या व्यापारातून जुळले, तेव्हापासून ते आज अगदी इराणवर आर्थिक निर्बंध लादणे, इराकवर युद्ध (नि लोकशाही!) लादणे, दुबईमधील समुद्रकिनार्‍यांवर उन्हात चिंब होऊन पडणे, तिथल्या बुर्ज दुबईच्या गच्चीवरून सगळ्या पृथ्वीकडे डोळे भरून पाहणे अशा येनकेनप्रकारेण जुळलेलेच राहिले आहेत.

रेड सन च्या निमित्ताने

लेखक आळश्यांचा राजा यांनी मंगळवार, 20/04/2010 या दिवशी प्रकाशित केले.
ओरीसाचे सध्याचे डी जी पी पूर्वी राज्याचे गुप्तचर प्रमुख होते. राज्याच्या नक्षलग्रस्त भागाची पाहणी करून त्यांनी एक सूचना प्रसारीत केली – रात्रीच्या वेळी गस्त घालताना किमान दोन पोलीस एकत्र असायला हवेत. एके रात्री साहेब सहज बाहेर फिरायला पडले. साध्या वेषात. भुवनेश्वरमध्येच. रात्रीचा दीड दोनचा सुमार असावा. एका पोलीसाने हटकले. बंदूक रोखली. साहेब थांबले. त्याला जवळ येऊ दिला. एका क्षणात त्याची बंदूक यांच्या हातात आली. त्याच्यावर रोखून विचारले, दुसरा कुठे आहे? तर तो दुसऱ्या गल्लीत होता. साहेब हताश झाले. सूचना बाजूला राहू देत; कॉमन सेन्स नको का?

कथा: सत्संग गुंतवणूक

लेखक वसंत वडाळकर_मालेगांव यांनी सोमवार, 19/04/2010 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळचे ५:३० झाले होते. महाराज अद्याप आले नव्हते. सत्संगी बाबांची वाट बघत होते. तोच रोल्स-राईस मधून बाबांचे आगमन झाले. सर्व सत्संगी उठून उभे राहिलेत. महाराज आसनस्थ झाले. महाराजांनी हाताने खुणावून सर्वांना बसावयास सांगीतले. सत्संग सुरू होण्यापूर्वी नामस्मरण करण्यात आले. श्रीराम जय राम जयजय राम! सर्व सत्संगी नामस्मरणात एकरूप झाले. त्यानंतर सत्संग सुरु झाला. महाराज सांगू लागले- "ह्या अनंत कोटी ब्रम्हांडात एका चैतन्याव्यतिरिक्त काही नाही. चैतन्य हेच आपले स्वरुप आहे. चैतन्य स्वरुप आपल्या मध्येच आहे. त्यामुळेच आपले चलन वलन चालू राहाते. शरिरात चैतन्य नसेल तर शरीर जड बनते.

नॉनसेन्स!

लेखक अरुंधती यांनी शुक्रवार, 16/04/2010 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आवडत्या पुस्तकांमधील एक पुस्तक म्हणजे ''वन मिनिट नॉनसेन्स''! म्हणजेच एका मिनिटातील निरर्थकता.... अ‍ॅन्थनी डीमेल्लो ह्या लेखकाचे हे तत्त्वज्ञानाचा मोठा आवाका अतिशय छोट्याशा, दैनंदिन स्वरूपाच्या आणि काही वेळा त्यातील मिष्किल छटेमुळे हसवणार्‍या घटनांमधून पेलणारे सुरेख, चटपटीत पुस्तक! No one is exempt from talking nonsense.

बेस्ट ऑफ बेस्ट गाणी

लेखक गणपा यांनी शुक्रवार, 16/04/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या अंताक्षर्‍या (मिक्स/मराठी), शिणेमे (आवडते/नावडते) यांना उत आलाय. पब्लीक उत्साहाने भाग घेउन भरगोस प्रतिसाद बी द्येतय.. म्हनल आपुन बी हात धुन घावा ;) इथे तुम्हाला आवडणारी मराठी/हिंदि गाणी नमुद करा. पण लेको तुम्हाला खालच्या वर्गवारीतल सर्वात जास्त आवडणार एकच गाण द्यायचय बर. (इतक्या आवडणार्‍या गाण्यातुन एकच निवडाच म्हणजे कठीण आहे. पण करा प्रयत्न) या माहितीचा मला माझ्या संकलना साठी उपयोग होइलच इतर गरजुं नाही होईल. गाणी: युगुल गीत : प्रेम गीत : विरह गीत / सॅड साँग: गायकाच्या आवाजातल : गायीकेच्या आवाजातल : माझी चॉईस : युगुल गीत : तुझ्या गळा माझ्या गळा..

सूर्याची सावली...

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 07/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक समर्पित प्रचारक, धुरंधर राजकारणी आणि ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी चित्रकूट येथे निधन झाले. अखेरच्या श्वासापर्यंत समाजासाठी आयुष्य वेचणार्‍या या महान आणि दुर्मिळ जीवनव्रतीचा कौटुंबिक जिव्हाळ्यातून उतरलेला एक सुंदर लेख 'लोकमत' मध्ये प्रसिद्ध झालाय. तो हा लेख : सूर्याची सावली गाढ झोपेत असतानाच अचानक फोन वाजला, आणि झोप चाळवली. इतक्या पहाटे किंवा रात्रीबेरात्री वाजणारे फोन घेणं अलीकडे मी टाळतो. पण त्या दिवशी फोन वाजताच मला जाग आली, आणि मी फोन कानाला लावला. पलीकडे मुंबईहून माझा भाऊ होता... 'रमेश, नानाजी गेले'...

भाषावार प्रांतरचनेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग ३

लेखक सातारकर यांनी सोमवार, 04/01/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मनसे च्या वादळानंतर मी ही माहीती इतरांना (अर्थातच ज्यांना नसेल त्यांना) देण्याच्या उद्देशान हे लिहायला घेतल खरं.

२ रुपये? छे हे तर तत्त्वासाठी....

लेखक स्वानन्द यांनी शुक्रवार, 11/12/2009 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो, आपण डोंबिवली फास्ट पाहिला आहे का हो? अर्थात, आवर्जून मराठी संकेत्स्थळावर येणा-या, मनसोक्त लेखन करणार्‍या आणि तेवढीच उत्साहाने प्रतिक्रियांचा पाऑस पाडणार्‍या बहुतेक मिपाकरांनी पाहिला असावा असं ग्रुहीत धरतो. तर वरील प्रश्न विचारायचे कारण म्हणजे, त्यात दाखवलेला थंड पेयाच्या किमतीवरून झालेला प्रसंग माझ्या बाबतीत कालच घडला. हपिसात एका कठीण समस्येवर काम करत होतो. बराच वेळ डोकं घुसवून सुद्धा काही उत्तर मिळत नव्हतं. म्हणून मग जरा ताजतवानं व्हावं या विचाराने एकटाच बाहेर पडलो. कंपनीच्या गेट च्या बाहेर पडलो. जवळच दोन तीन टपर्‍या आहेत. एका टपरीतून वडापाव घेतला.