Skip to main content

आमचे असतील लाडके (सच्याची २००वी कसोटी)

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी बुधवार, 04/09/2013 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
फार फार वर्षांपूर्वीची (पूर्णपणे काल्पनिक) गोष्ट बरंका. तेव्हा ना पृथ्वीवर कोणीच राजा नव्हता. लोकं आपाआपली कामं जबाबदारीनी करायची. सचोटी, प्रामाणिकपणा, नीतिमत्ता वगैरे प्रकार तेव्हा खरोखरच अस्तित्वात होते. पण अर्थातच हे सगळं फार दिवस टिकलं नाही. लोकं षड्रिपूंच्या आहारी जाऊ लागली. खोटं बोलू लागली, एकमेकांचा द्वेष करू लागली, चोर्‍या मार्‍या करू लागली... म्हणजे थोडक्यात "वाईट" वागू लागली. आणि तेव्हा अर्थातच माणसांचं देवांशी डायरेक्ट कनेक्शन होतं. म्हणून मग काही जाणते नेणते लोक सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले "हे चतुरानन, तुझीच ही लेकरं आता अधर्माचरण करत आहेत.

एक चविसंदर्भात प्रश्न

लेखक शिल्पा ब यांनी रविवार, 01/09/2013 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हा सगळ्यांना शेंगदाण्याची चटणी चवीला कशी असते हे माहिती असेलच. मला तुमची मतं हवी आहेत. समजा तुम्हाला कोणि छान चमचमीत शेंगदाणा चटणी दिली तर तुम्ही कशी खाल? परंपरागतपणे नाही तर तुमची कल्पनाशक्ती पणाला लाऊन सांगा. काही सजेशन खालीलप्रमाणे : sandwich + चटणी olive oil +चटणी रोटी लवाश /पिटा चिप्स क्रिमी चीज - फ़ोण्टिना वगैरे सगळयांना आगावू धन्यवाद.

जोवरी हे जग, जोवरी भाषण - २ : पार्श्वभूमी

लेखक तिरकीट यांनी रविवार, 25/08/2013 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
गीतरामायणाची मूळ संकल्पना सीताकांत लाड यांची. १९५५ साली पुणे आकाशवाणीमध्ये सहनिर्देषक म्हणून काम करत असलेल्या लाड यांनी ही कल्पना गदिमांना बोलून दाखवली. गीतकार म्हणून ग. दि. माडगुळकर आणी संगीतकार म्हणून सुधीर फडके या द्वयीची निवड करण्यात आली. तिघांच्या चर्चेतून 'गीतरामायण' हे शीर्षक ठरले. गुढीपाडव्याला सुरुवात करून आठवड्याला १ याप्रमाणे ५२ गीते पुणे आकाशवाणी वरून सादर करण्याचे ठरले.

सु शी ची दुनियादारी

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी शनिवार, 24/08/2013 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
दुनियादारी सुहास शिरवळकर यांच्या "साहित्यकृती" वर आधारित मराठी चित्रपट हि हेड लाईन वाचली आणि मनात १ शेर रुंजी घालू लागला. हजारो साल "नर्गिस अपनी बेनुरी पे रोती है बडी मुश्किल से होता है चमन में दीदावर पैदा || इथे "दुनियादारी " हि साहित्यकृती हि नर्गिस आणि झी सिनेमा आणि संजय जाधव हे दीदावर मराठी साहित्यिकांनी "सु शी" ना कधीच साहित्यिक मानले नाही सुशींचे हे दुख: कधी कधी त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत असे. काल जेव्हा "दुनियादारी " पाहत होतो तेव्हा सारखी त्यांची आठवण होत होती.(पहिला दिवस ,दुसरा खेळ) जेव्हा चित्रपट गृहाच्या बाहेर पडलो तेव्हा कान देऊन प्रतिक्रिया ऐकत होतो एक मिसरूड नुकतेच फु

मी खरच योग्य केल का?

लेखक saishwari यांनी बुधवार, 24/07/2013 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
जवळ जवळ १५ दिवस झाले मला नोकरी सोडून . पण अजूनही या बाबत मला खात्री नाही. साधारण ३ वर्षांपूर्वी मला हि नोकरी लागली होती. तो काळ मंदीचा होता. नुकत्याच पदवीधर झालेल्यांना नोकरी मिळत नव्हती. ८ महिने नाममात्र पगारावर घासल्यावर हि संधी चालून आली होती. अर्थातच मोठ्या कंपनीतली ही संधी सोडून देण अजिबातच शक्य नव्हत. मुलाखत इथे झाली असली तरी नेमणूक बाहेरच्या राज्यात होती. फक्त ३ दिवसात सगळ ठरलं होत. सुरवातीचे दिवस नवीन शिकण्यात,नवीन ठिकाणी हिंडण्यात गेले, पैशांची चटक लागली होती, सोबतचे लोक अगोदरच पुढे गेले होते त्यामुळे आपण पण त्या शर्यतीत असाव अस वाटत होत.

श्रीविठ्ठल : मला उमगलेला

लेखक शरद यांनी गुरुवार, 18/07/2013 07:04 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीविठ्ठल :मला समजलेला १९७८-७९ साल असावं. डॉ.रा.चिं.ढेरे यांचे "महाराष्ट्राचा देव्हारा" हे पुस्तक हातात पडलं. त्या आधी ५-६ वर्षे त्यांचे "लोकसंस्कृतीची क्षितिजे" हे पुस्तकही घेतले होते. शहरात वाढलो, शिक्षण झाले त्यामुळे लोकसंस्कृतीशी ओळख तोंडदेखलीच. पण मी या पुस्तकाने प्रभावित झालो. त्यांची विद्वत्ता हा काही माझ्या तोकड्या ज्ञानाच्या कक्षेतला भाग नव्हता पण त्यांची शैली, भाषाप्रभुत्व, माहिती गोळा करण्याकरिता घेतलेले श्रम, नित्कर्षाला येईपर्यंत केलेली मांडणी यांनी मी प्रभावित झालो. त्यामुळे "श्रीविठ्ठल:एक महासमन्वय" या लेखाने मी भारावलोच.

चिनी साम्राज्य

लेखक तिमा यांनी शुक्रवार, 14/06/2013 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
२०५० सालातला भारत. नक्षलवादी फक्त दुर्गम भागात असायचे ते आता सर्व भारतभर पसरले होते.बहुतेक भाग त्यांनी काबीज केला होता. बरेच राजकीय नेते मारले गेले होते. उरलेले दिल्ली आणि त्याच्या जवळपासच्या भागात मिलिटरीच्या संरक्षणाखाली रहात होते. बाकीच्या देशांत त्यांचा संपर्क जवळजवळ तुटलाच होता. तरीही बाहेरच्या जगात अजून 'नक्षलीस्तान' ला मान्यता मिळाली नव्हती. शहरातल्या जनतेला अंगमेहनतीची कामे करावी लागत होती. नक्षलींनी जी शहरे काबीज केली, तेथील वस्तीत जाऊन सर्वप्रथम तिथल्या खाजगी गाड्या जाळून टाकल्या. एसयूव्ही सारखी खाजगी वाहने स्वतःच्या वापरासाठी बळजबरीने घेतली.

ट्यूब लाईट खाणे, केसाने ट्रक ओढणे वगैरे

लेखक संचित यांनी बुधवार, 22/05/2013 20:44 या दिवशी प्रकाशित केले.

तस प्रकरण नवीन नाही. इतक्यात youtube वर विडीओ पहिला आणि विषय परत आठअला. आपण उस खात नाही तेव्हढ्या सहज पणे हा मनुष्य ट्यूब लाईट खातो हे बघा https://www.youtube.com/watch?v=vQXhpqkg8WY. आपण दाताने जिभेला चावले तर २-४ दिवस दुसर काही खाणे जमत नाही. आपल्याला फक्त नासलेले दुध पिले म्हणून फूड पोइझनिन्ग होते. पण हे असले अघोरी माणस कसे काय कोण जाणे काहीही करण्याची तयारी ठेवतात, या अवलीयांच्या पोटात काय लोखंड, अलुमिनियम वितळवणाऱ्या भटया असतात कि काय कोण जाणे? तस पाहिलं तर हे लोक काहीपण पचवण्याची ताकद ठेवतात.

व्यायामाचे प्रकार

लेखक वेल्लाभट यांनी शनिवार, 11/05/2013 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
व्यायाम हा एकंदरितच आजकालचा `हॉट टॉपिक' आहे. तरूण आहात, तर तारुण्य खुलवण्यासाठी व्यायाम; मध्यमवयीन आहात, तर तारुण्य टिकवण्यासाठी व्यायाम; वृद्ध आहात, तर फिट राहण्यासाठी किंवा, पाय, गुडघे, पाठ दुखू लागली आहे, म्हणून व्यायाम; श्रीमंत आहात, मग शो-ऑफ साठी व्यायाम; गरीब आहात, तर मग असाही काबाडकष्ट करून व्यायामच; अभिनेता/अभिनेत्री व्हायचंय, तर इंडस्ट्री ट्रेंड आणि डिमांड म्हणून व्यायाम; लग्नेच्छुक आहात, तर लग्न पटकन जमावं म्हणून छान दिसण्यासाठी व्यायाम; रोज व्यायाम, अधून मधून व्यायाम, कुणी सांगितलं म्हणून व्यायाम, आपल्याला वाटलं म्हणून व्यायाम... पण याकडे बघण्याचे दृष्टिकोन वेगळे आहेत.