कवितेचे रसग्रहण..... एक आनंदोत्सव
कवितेचे रसग्रहण.. एक आनंदोत्सव
संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे
अपूर्व:कोsपि कोषोsयं विद्यते तव भारती !
व्ययतो वृद्धीमायाति क्षयमायाति संचयात् !
विद्या वाटल्याने वाढते व स्वत:पाशीच साठवून ठेवली तर कमी होते. पण विद्याच कां ? आनंदाचेही तसेच आहे. एखादी कविता वाचल्यावर मला जर आनंद झाला तर मला वाटते हा आनंद माझ्या मित्रांनाही मिळाला पाहिजे. कवितेतून मला आनंद कसा मिळाला ते सांगावयास कविता व तिचे रसग्रहण.
मिपावर कविता-रसग्रहणाला चांगले दिवस येत आहेत असे दिसते. श्री.आदित यांनी पहिल्यांदीच लिहून चांगली सुरवात केली. असेच आणखी लेखक मिळाले तर हे दालन समृद्ध होईल.
मिसळपाव