Skip to main content

लेख

मावळतीचा सूर्य

Published on सोमवार, 27/02/2012 प्रकाशित मुखपृष्ठ
संध्याकाळी ५ ची वेळ ... अविरत वाहणारा तो सागर, दगडांवर आपटून फुटणार्या लाटा, सूर्यप्रकाशाने चमचमणार पाणी जणू समुद्रभर पसरलेली चांदीच!! आणि तो सुर्यगोल दाह न देणारा पण तेज:पुंज्य!! हळू हळू प्रखर प्रकाश मंद मंद करत, स्वत:बरोबर आकाशभर लाली पसरवणार ते "सूर्यबिंब" मावळतीकडे झुकलेलं!! संध्येच्या सुखद मिठीत शिरणारा तो निसर्ग आणि पश्चिमेच्या क्षितिजावर विसावताना प्रकाशाचा स्त्रोत हलक्या हाताने झाकणारी ती सुंदर संध्या :) अहाहा ...

याद्या 5100

शि द फडणीस

Published on बुधवार, 22/02/2012 प्रकाशित मुखपृष्ठ
गोष्ट आहे १९३५-३६ मधली. हत्तीशी झुंज खेळण्यासाठी बनवलेल्या कोल्हापूरच्या साठमारीच्या मैदानात काही शाळकरी मुलं खेळत असतांना त्यातील एकाचा पाय घसरून तो भिंतीवरून थेट मोठाले खिळे असलेल्या दूस-या भिंतीवर जाऊन पडला. मोठाले खिळे मांडित घुसले आणि सरळ दवाखान्यात भरतीच व्हावं लागलं. दवाखान्यात विचारपूस करायला येणा-यांची रिघ लागली. 'असा कसा काय अपघात झाला?' लोकांचा परवलीचा प्रश्न! आणि विचित्र अपघाताबद्दल सांगता सांगता आधीच चिंताग्रस्त वडिलांची उडालेली तारांबळ! मात्र सोबत खेळणा-या दहा वर्षाच्या एका मुलाने शक्कल लढवली. तीन चार चित्रांच्या मालिकेतून अपघात कसा घडला हे त्याने स्पष्ट करून दाखवलं.

याद्या 5017

सैनिकी शिक्षणातून राष्ट्रनिर्माण.

Published on सोमवार, 20/02/2012 प्रकाशित मुखपृष्ठ
एका बाजुला स्वराज्य हा आपला जन्म सिद्ध अधिकार मिळविण्यासाठी घनघोर प्रयत्न चालू असताना या देशातल्या काही महान द्रष्ट्या असामींनी शेकडो वर्षांच्या आक्रमणांनी उध्वस्त झालेल्या या राष्ट्राच्या पुनर्निमाणाची तयारी स्वयंस्फुर्तीने आणि असामान्य देशभक्तीच्या जोरावर सुरु केली होती.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 4737

राजा शिवछत्रपती - भवानी तलवार आणि जीवनपट !

Published on रवीवार, 19/02/2012 प्रकाशित मुखपृष्ठ
आज शिवजयंती...छत्रपतींच्या जीवनातल्या अनेक गूढ अद्याप संशोधन चालत असलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे भवानी तलवार, शिवजयंतीच्या निमित्ताने आज हा लेख लिहावासा वाटला.खाली दिलेल्या माहितीमध्ये मिपाकर नक्कीच अभ्यासपूर्ण भर टाकतील ! पुरेसा वेळ न मिळाल्याने लेख थोडा घाईगडबडीत झाला कृपया सांभाळून घ्या ! भवानी तलवार (जगदंबा तलवार) उगम - इ.स.१५१० साली आल्फोन्सो आल्बुकर्क याने गोवा जिंकला .त्याचा सेनापती डियागो फर्नांडीस याने लगेचच सावंतवाडीवर हल्ला केला,पण हल्ला सपशेल फसला आणि पोर्तुगिजांचा दारूण पराभव खेमसावंत भोसल्यांनी केला.त्यावेळी हि पोर्तुगीज राजघराण्यातील (Imperial) तलवार खेमसावंत यांच्याकडे आली.
लेखनप्रकार

याद्या 39255

सुदर्शन पटनायक

Published on शुक्रवार, 17/02/2012 प्रकाशित मुखपृष्ठ
वाळू! केवळ या एका शब्दात आयुष्यभराचा आठव साठवता येऊ शकतो. शंख शिंपले गोळा करत आणि खोपे बनवत वाळूच्या ढिगा-यावर घालवलेलं लहानपण; समुद्रकिना-यावर तीच्याबरोबर तासनतास बसुन बांधलेलं वाळूचं घर; वाळूत उभं राहून ते घर डोळ्यात साठवत असतांना अचानक आलेल्या लाटेबरोबर त्याचं पायाखालच्या वाळूबरोबर वाहून जाणं आणि त्यानंतर झालेला हिरमोड लपवत पुन्हा नव्याने घर बांधायला घेणं! कन्याकुमारीच्या वाळवंटात उभं राहून दिसणारं भारतमातेचं तेजोमय रूप; आणि चंद्रभागेच्या वाळवंटात वारक-यांनी धरलेले रिंगण!

याद्या 4073

गुलाब फक्त देणंच...

Published on मंगळवार, 14/02/2012 प्रकाशित मुखपृष्ठ
जी जी त्याला भेटली तिला तिला तो गुलाब देत गेला. ती काही का म्हणेना पण त्याचं गुलाब देणं काही चुकलं नाही. साध्यासुध्या दिसणाऱ्या मुलींनाही त्याने आखीव रेखीव अन् आकर्षक गुलाबपुष्प सादर केले होते. त्यावेळी त्या सामान्य मुलीच्या डोळ्यांतील आश्चर्ययुक्त भाव वाचणे त्याला भारी आवडायचे. तिच्या मनी ध्यानी नसतांना मिळालेली ही सुंदर भेट तिला स्मितहास्य करायला भाग पाडायची. तसं तिच्या मनात हे असं काही घडेल याची पुसटशी शंकाही हजर नसायची. अशा अचानक वेळी त्यानं गुलाब दिला की नकळत किंवा स्त्रीसुलभ पुष्पप्रेमापोटी तिचा हात तो गुलाब घेण्यास आपोआप उद्युक्त व्हायचा.

याद्या 2632