लेख
'क्लाउड कंप्युटिंग' - म्हणजे काय रे भाऊ ?
ढग किंवा क्लाउड ह्याला कवींनी, 'काळा काळा पिंजलेला कापूस' असे आपल्याला लहानपणीच समजावलेले असते. तरूणपणी दादा कोंडक्यांनी 'ढगाला कळ लागल्यावर काय होते' ते समजावून सांगितले. तर अंडरवर्ल्डवाल्यांनी गेम केल्यावर माणूस 'ढगात' जातो हे समजावून सांगितले. इतके, इतक्या जणांनी ढगाबद्दल समजावले तरीही 'क्लाउड' कंप्युटिंग ही काय भानगड आहे हा प्रश्न पडतोच. :)
संगणक विश्वात झालेली क्रांती ही, 'संपुर्ण जगासाठी चार संगणक खुप झाले' असे म्हणणार्या IBM च्या एके काळच्या सिनीयर मॅनेजमेंटच्या मतापासून सुरू होऊन आज ती 'क्लाउड कंप्युटिंग'पाशी येऊन पोहोचली आहे.
याद्या
15899
पाटलांचे सेतुबंधन
आपल्या मराठीत खास वल्ली लोकांना त्यांच्या स्वभाव आणि कर्तबगारी नुसार हमखास विशिष्ट विशेषणे मिळालेले आपण पाहतो. अगदी पंचयतीच्या निवडणूकीत पडलेले आमचे लोकनेते मा ना रा रा श्री शरदचंद्रजी शिंदे-पटिलसाहेब यांच्यासारख्या मान्यवर मंडळी पासून ते गल्लीतल्या बेरक्या बबन्या पर्यंत. अशीच एक वल्ली म्हणजे आमच्या गावचा मुकुंदा. "लय भारी गाडी" हे बिरूद त्याला तसं कोवळ्या वयातच मिळालं होतं. पुढं शिकून पुण्यात नोकरीला लागल्यावर त्याला "अगदी हरहुन्नरी व्यक्तिमत्व बरं का हो" अशी पदवी आपसूकच मिळाली होती. आणि आता त्याला इथे अंग्लदेशात versatile, multifaceted, अशा काही-बाही विशेषणांनी संबोधलं जातं.
याद्या
4633
पाऊली यांचा वगळ सिद्धांत
पाऊली यांचा वगळ सिद्धांत
(अर्थात पाऊलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल)
त्या काळी एन्रिको फर्मी, वुल्फगँग पाऊली ह्या ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञाच्या, अलीकडील एका संशोधनाबाबत विचार करत होते. पाऊली एकेकाळी मॅक्स बॉर्न ह्यांचे सहकारी होते. केंद्रकाभोवती फिरणाऱ्या आण्विक विजकांच्या हालचालींचा अभ्यास करत असतांना, पाऊलींनी असे निरीक्षण केलेले होते की, एका कक्षेत केवळ एकच विजक असतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, कुठलेही दोन विजक एकाच कक्षेचा अवलंब करत नाहीत.
फर्मींना हे समजले की, ही घटना प्रत्येक अणूत, याआधी लक्षात न आलेली आणखी एखादी व्यवस्था अस्तित्वात असल्याचे सूचित करत आहे.
याद्या
16149
ऑपरेशन एंटेबी
२७ जुन १९७६, दुपारी साडेबाराला 'एअर फ्रांसचे' उड्डाण संख्या A १३९ हे एअरबस ३०० विमान ग्रीस मधिल अथेन्स विमानतळाहून पॅरीसला जाण्याकरीता उडाले. इज्राइल मधिल 'तेल अवीव' येथून निघालेल्या या विमानात २४८ प्रवासी व १२ हवाई कर्मचारी होते. विमानात मुख्यतः इज्राईल, फ्रांस, ग्रीक, अमेरीका, इंग्लंड तसेच इतर देशातील नागरीक प्रवास करीत होते. विमान अवकाशात झेपावताच अवघ्या काही वेळातच विमानाला २ पॅलेस्तीनी आणि २ जर्मन अतिरेक्यांनी अपह्रुत केले. पैकी २ अतिरेकी 'Popular Front for the Liberation of Palestine – External Operations' आणि उर्वरीत २ 'German Revolutionary Cells' या संघटनांशी संबंधीत होते.
याद्या
24840
नशिक -पुणे प्रवास एक मस्त(?) अनुभव
मित्रहो ,
परवा काही कामानिमीत्त नाशिक वरुन पुण्याला येण झालं, त्याचा हा वृत्तांत ....
प्रवास म्हणल की कधी कधी कंटाळवाना असतो तर कधी कधी एखादा मस्त अनुभव देउन जातो.तुम्ही कुठ आणी कोणाबरोबर प्रवास करताय यावर बरच काही ठरतं.शिवाय प्रवास आपण कशानं करतोय यावरही बरच काही ठरत असतं.
असो,बरच विषयांतर झालं ,मुळ मुद्यावर येतो ,नमनालाच घडीभर तेल नको घालायला.
पुण्यात लवकर पोहचायचं म्हणून पहाटे ४ वाजता चा मोबाइल मधे अलार्म लावला होता,तरी आवरता आवरता ६वाजले मग घरी नाष्टा करायचा विचार बाजुला सारला आणी गाडी काढली ,५ मिनीटाच्या आत हायवे ला लागलो, अर्थातच सकाळी रस्त्यावर फारशी वाहनं नव्हती ,एप्रील चा महीन
याद्या
4025
जंगल घडवणारा माणूस: जादव पायेंग
जंगल! परमेश्वराने अगदी मुक्तहस्ताने सृष्टीसौंदर्याची उधळण केलेलं वसुंधरेचं हिरवं लेणं! जंगल म्हटलं की वाघोबाच्या डरकाळीपासुन ते टारझनच्या आरोळीपर्यंतच्या आठवणी मनात घर न करतील तरच नवल. अवघ्या जीवसृष्टीला आकार देणा-या या जंगलातूनच मानवजातीला जिवंत राहण्याचे तंत्र, जीवन सुखी करण्यासाठीचे यंत्र, आणि जीवनाचं सार्थक करण्याचे मंत्र गवसलेत. जंगलाकडून हे सगळं घेत असतांना आपण जंगालाचंही काहीतरी देणं लागतो हे मात्र आपण सामान्य माणसं सोयिस्करपणे विसरतो.
जादव पायेंग मात्र विसरभोळा नाही. सोयिस्करपणे विसरणे तर त्याच्या गावीही नाही.
याद्या
47802
मिसळपाव