Skip to main content

लेख

युगांतर - आरंभ अंताचा भाग १९

लेखक मृणालिनी यांनी शनिवार, 03/08/2019 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १९ हस्तिनापुरात पंडु स्वयंवर जिंकून कुंती सोबत आला. गुलाबपाकळ्यांच्या वर्षावात महालात त्यांनी प्रवेश केला. "तातश्री!" "महाराज पंडु! स्वागत आहे महाराणी कुंती" पंडु आणि कुंतीने भीष्मांना नमस्कार केला. "अनुज..." हास्य मुखाने धृतराष्ट्र आवाजाच्या दिशेने येत होता. पंडूने जाऊन त्याला मिठी मारली. "मला खात्री होती. तु स्वयंवर जिंकणार!" कुंतीने पुढे जाऊन नमस्कार केला. "आयुष्यमान भवं!" मागून गांधारी पुढे आली. "महाराज, तुमची भ्रातृजाया.... गांधारनरेश यांच्या कन्या, गांधारी." भीष्मांनी परिचय करून दिला. पंडुला आनंद झाला. पण गांधारीच्या डोळ्यांवरची पट्टी पाहून त्याला आश्चर्य वाटलं.

युगांतर- आरंभ अंताचा भाग 18

लेखक मृणालिनी यांनी शुक्रवार, 02/08/2019 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
हस्तिनापुरात अंबालिकापुत्र पंडुचा राज्याभिषेक झाला आणि राजगादी सजली. भीष्माचार्य मनातून निश्चिंत झाले. धृतराष्ट्र शूरत्वाचं, पांडू धर्माचं आणि विदूर बुद्धीचं प्रतिक! पंडु आणि धृतराष्ट्राचे बंधुत्व त्यांच्यात कोणाला द्वेष पसरवायला जागाच देत नव्हते. दासीपुत्र विदूरची निष्ठा पाहून दोघांच्या मनात त्याच्या बद्दलही आदर वाढला होता. न्यायदानाच्या वेळी पंडु आधी विदुराचा सल्ला ऐकायचा. अंधत्व ही एक बाधा नसती तर धृतराष्ट्र जेष्ठ भाऊ असल्याच्या अधिकाराने त्यालाच राजगादी प्राप्त झाली असती, असं राहून राहून अंबिकेला वाटायचं. 'पंडु राजा म्हणल्यावर त्याच्याशी विवाह करायला कोणतीही राजकन्या होकार देईल.

'पागोळी वाचवा'-अंमलबजावणी

लेखक सुनिल प्रसादे यांनी गुरुवार, 01/08/2019 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
'पागोळी वाचवा अभियान' अंमलबजावणी करताना - 'पागोळी वाचवा अभियान' जसं जसं पुढे सरकत आहे, तसं तसं लोकांनी त्यामध्ये सांगितलेल्या गोष्टी आमलात आणण्याच्या दृष्टीने पावलं टाकायला सुरवात केली आहे. एखाद्या गोष्टीचा विचार करणं, ती समजून घेणं वेगळं आणि ती प्रत्यक्षात उतरवणं वेगळं. एखादी गोष्ट प्रत्यक्षात करायला सुरुवात केली की त्यातले बारकावे समोर येतात आणि काहीवेळा संभ्रमाच्या स्वरूपात आपल्यासमोर उभे ठाकतात. 'पागोळी वाचवा अभियान' ची अंमलबजावणी सुरू करणारे काही लोक ह्याचा अनुभव सध्या घेत आहेत.

युगांतर आरंभ अंताचा! भाग १७

लेखक मृणालिनी यांनी गुरुवार, 01/08/2019 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
निपुत्रिक कुंतीभोजला शुरसेनाची दत्तक मिळालेली कन्या एक वरदानच होतं. तिच्या साऱ्या इच्छा पुर्ण करत, संस्कारांचे बाळकडूही तिला त्याने दिले होते. कुंती भोज राजाची लाडकी कन्या म्हणून त्याच्याच नावावरून सगळे तिला कुंती म्हणू लागले. राजमहालात खेळत बागडत ती मोठी होऊ लागली. एके दिवशी राजा कुंतीभोज चिंतेत बसलेले तिने पाहिले. "काय झालं पिताश्री?" "काही नाही, कुंती. अगं दुर्वासा ऋषींकरता एक सेवक पाठवयचा आहे." "का?" "ते तपश्चर्येला बसणार आहेत." "मग त्यात काय चिंताकारक आहे? पाठवून द्या." "त्यांनी तुझ्या करता विचारले आहे." "मी जाईन की मग." "खरचं जाशील? त्यांच्या कुटीत?

राखी बैल दिवे आरसा निवत

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 01/08/2019 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे गावात राखी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी गावातला बामन राख्या बांधायला यायचा. ‘उद्याची राखीपौर्णिमा’ म्हणत घरातल्या लहान मुलांना- पुरुषांना राख्या बांधायचा. या राख्या रंगवलेल्या दोर्‍याच्या आणि लाल- पिवळ्या कापसाच्या छोट्या छोट्या गोंड्यांच्या असत. या बदल्यात त्याच्या झोळीत आई सुपड्यातून बाजरी द्यायची. एकादशीच्या आदल्या दिवशीही बामन यायचा. आणि दारातूनच ‘उद्याची एकादशी’ म्हणायचा. बर्‍याच लोकांना दुसर्‍या दिवशी एकादशी आहे, हे माहीत नसायचं. त्या काळात सगळ्याच लोकांच्या घरात भिंतीवर कॅलेंडरं नव्हती.

युगांतर - आरंभ अंताचा भाग १६

लेखक मृणालिनी यांनी बुधवार, 31/07/2019 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
हस्तिनापुर महाल. पुर्वदिशेला सुर्यदेवांचे आगमन झाले तसे महालाच्या खिडकीतून किरणांनी कक्षेत प्रवेश केला. अंबिकेला वरच्या कक्षात जाण्याची आज्ञा राजमातांनी दिली आणि तिने कक्षात प्रवेश केला. तो कक्ष एका दिव्य प्रकाशाने व्यापलेला होता. तिव्र प्रकाश असह्य होऊन तिने डोळे गच्च मिटले. सत्यवती आतुरतेने येरझाऱ्या घालत होती. "माते" महर्षी व्यासांचा आवाज ऐकून सत्यवती त्यांच्या जवळ आली. "पुत्र व्यास.... अंबिकेला....." "पुत्र होईल, माते. परंतु...." "परंतु काय?" सत्यवती मनातून घाबरली. "तो अंध असेल." सत्यवती हातपाय गळल्या सारखी व्यासांकडे बघत राहिली. "मी दिव्यशक्तीला आवाहन केले होते, माते.

'पागोळी वाचवा अभियान' शंका आणि समाधान

लेखक सुनिल प्रसादे यांनी मंगळवार, 30/07/2019 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
'पागोळी वाचवा अभियान' हळूहळू पसरत चाललंय. सुरवातीला आम्हाला आमच्या दापोली तालुक्यातूनच त्याबद्दल विचारणा होत होती, परंतु सांगायला आनंद वाटतोय की आता आमच्याकडे सावंतवाडी, कणकवली, राजापूर, रत्नागिरी, चीपळूण, म्हसळा, श्रीवर्धन,अलिबाग, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली पासून ते पुणे, नाशिक, इंदापूर, जुन्नर, नंदुरबार, शहादा, धुळे, औरंगाबाद, बुलढाणा, सेलू, परभणी, सांगली, कोल्हापूर पर्यंतच्या लोकांकडून ह्या अभियानाबद्दलची माहिती विचारली जात आहे. आतापर्यंत नऊशेपेक्षाही जास्त लोक ह्या अभियानाशी जोडले गेले असून अभियानाची माहिती घेत आहेत आणि इतरांनाही देत आहेत. दिव्याने दिवा लागत आहे.

राधी आणि मास्तर

लेखक vaibhav deshmukh यांनी मंगळवार, 30/07/2019 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
बस देवगाव फाट्यावर आली. कंडक्टरने जोरात आवाज दिला, "देवगाव फाटा कोणी आहे का"? कंडक्टरच्या आवाजाने तो डोळे चोळत उठला. हातातील पिशवी सावरत बसमधून खाली उतरला. कंडक्टरने त्याच्याकडे विचित्र नजरेने बघत दरवाजा जोरात बंद केला. बस पुढे निघून गेली. पुढे जाणार्‍या बसकडे बघत त्याने खांद्यावरची पिशवी सरळ केली. कपडे झटकले.     त्याने घड्याळात पाहिले. रात्रीचे आठ वाजून गेले होते. बस वाटेत बिघडली नसती तर आपण वेळेत गावात पोहोचलो असतो, असा विचार करत असताना त्याचे लक्ष समोरच्या पाटीवर गेले. ' देवगाव तीन किमी'. फाट्यापासून गाव आत तीन किमी होता. त्याने इकडे तिकडे नजर फिरवली.

मोदींनी मॅन व्हर्सेस वाइल्ड मध्ये जाण्याचं काय प्रयोजन असावं?

लेखक alokhande यांनी मंगळवार, 30/07/2019 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्कव्हरी हा एक जागतिक दर्जाचा चॅनल असून तो जगभर बघिताला जातो. आणि त्याच चॅनल वर जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाचे पंतप्रधान या जगप्रसिद्ध शो मध्ये जाऊन काय सांगू इच्छितात. किंवा जगभरातील देशांना कोणता संदेश देत असावेत. का हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट म्हणायचा

युगांतर - आरंभ अंताचा भाग १५

लेखक मृणालिनी यांनी मंगळवार, 30/07/2019 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
राजमाता..... अशक्य आहे हे!" "तु ही जाणतोस हे किती गरजेचे आहे." भीष्माचार्य काहीच बोलेनात. "तुझ्या प्रतिज्ञेनुसार तू हस्तिनापूर राजगादीच रक्षण करणार आहेस. हो ना?" "होय राजमाता. शब्द आहे माझा." "पण कसे भीष्म? हस्तिनापुरची राजगादी अशी रिक्त ठेवून?"' "राजमाता...." "राजवंश संपला तर राज्य विखरून जाईल. चालून येणाऱ्या शत्रूला कळले, की राजगादीला कोणी वारस नाही, ती रिकामी आहे, तर शत्रूपुढे हे हस्तिनापुर किती काळ टिकेल? सैन्य एका राजाची आज्ञा ऐकते भीष्मा. प्रजा देखील. राजघराण्याची आज्ञा नाही. ऱाजा नसेल तर कसली राजगादी आणि कसली त्या राजगादीला सांभाळण्याची प्रतिज्ञा?