Skip to main content

लेख

निनावी कथा

लेखक मृणालिनी यांनी शुक्रवार, 11/10/2019 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
सुशांतला कॉलेजला पाठवण्याच्या तयारीनंतर निरजचे ऑफिसला जाण्याआधीचे शोधाशोधीचे सत्र संपवून दोघांना अनुराधाने गाडीत बसवून 'टाटा' केला आणि मग निवांतपणे ती टिव्ही लावून बसली. बातम्यांवर नेहमीचे राजकारणी पडसाद उमटत होते. या अश्या बातम्या सुरु झाल्या की तिला जबरदस्त कंटाळा येत असे. काही तरी सोबत राहिलं म्हणून तिने रेडिओ असल्यासारखा बाजूला टीव्ही चालूच राहू दिला आणि मघाशीच्या शोधाशोध सत्रात पसरलेले घर आवरण्याचा प्रपंच सुरू केला. सर्दीकरता काढलेल्या टॅब्लेटसची स्ट्रीप आवरताना तिला माईची आठवण आली. आज माई इथे असती तर नक्की म्हणाली असती, 'अगं शिंकल्यावर माणसाने घराबाहेर पडू नये. सांग सुशांताला....

आमार कोलकाता - भाग ४

लेखक अनिंद्य यांनी बुधवार, 09/10/2019 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
८५ अँमहर्स्ट स्ट्रीट, कोलकाता  चित्रसौजन्य - राजा राममोहन रॉय मेमोरियल, कोलकाता. जुन्या कोलकात्यातील एक महालसदृश्य इमारत. जॉर्जियन वास्तुशास्त्राचा सुंदर नमुना असलेल्या शहरातील थोडक्याच इमारतींपैकी एक. फ्रान्सिस मेंडीस नामक श्रीमंत कलाप्रिय माणूस इमारतीचा मूळ मालक. १८१४ साली रंगपूरहून (सध्या बांग्लादेशात असलेले शहर) आलेल्या एका भारतीय व्यक्तीने १३००० रुपयांचा घसघशीत मोबदला देऊन फ्रान्सिसकडून हे घर विकत घेतले आणि तिथे कायमचे राहायला येण्याचे ठरवले.

आहा ते सुंदर दिन हरपले

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 08/10/2019 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
आहा ते सुंदर दिन हरपले --------------------------------- निवांत क्षणी आठवणीच्या गल्लीत फेरफटका मारला स्वीट होम आठवले स्वीट होम उपाहार गृह मंडईतून आठवड्याची भाजीपाला खरेदी झाली कि कुमठेकर रोड वरील हे उपहार गृह त्याला भेट दिली नाही असा पुणेकर विरळाच इडली सांबार -साबुदाणा खिचडी -व उपमा ह्या त्या हॉटेल मधल्या फेमस डिशेस त्या काळी इडली सांबार वर शेव भुरभुरली जात असे नव्या पिढीला माहीत नसेल पण इडली सांबार च्या बाउल मध्ये दोन चमचे सायक तूप घातले जाई फोडणीत भरम साठ कोथिंबीर व तिखट असे त्यामुळे सांबार वर तर्रि चा तवंग असे हटके चवीचं सांबार खावे तर स्वीट होम मध्ये उपमा पण हटके चवीचा असे वर शेव भुरभुरली

तब्बेत : ‘त्यांची’ आणि आपली !

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 07/10/2019 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
माणूस हा एक प्राणी आहे. जीवशास्त्रानुसार प्राण्यांचे प्रजाती आणि जाती ( Genus & Species) असे वर्गीकरण करतात. त्यानुसार माणूस होमो सेपिअन्स या कुळात येतो. ‘सेपिअन’ हा लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ ‘शहाणा’ असा आहे. सुमारे २४ लाख वर्षांपूर्वी या कुळाची निर्मिती झाल्याचे मानतात. तिथून पुढे उत्क्रांती होत माणूस आजच्या अवस्थेला पोचला आहे. मानवजातीच्या या अनोख्या इतिहासाचा विस्तृत आढावा युव्हाल नोव्हा हरारी यांनी त्यांच्या बहुचर्चित ‘सेपिअन्स’ या पुस्तकात घेतला आहे. हे विद्वान जेरुसलेम इथल्या विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक आहेत.

झोल्?चच्चडी?

लेखक नूतन यांनी सोमवार, 07/10/2019 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
फोटो चढवणं माझ्यासाठी आव्हान बनलं आहे.पुन्हा एक्दा प्रयत्न करते.

आमार कोलकाता - भाग ३

लेखक अनिंद्य यांनी गुरुवार, 03/10/2019 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
लेखमालेचे यापूर्वीचे दोन भाग इथे वाचता येतील : आमार कोलकाता - भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 आमार कोलकाता - भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 आमार कोलकाता - भाग ३  हुगळी नदीचे पात्र, दक्षिणेश्वर, कोलकाता.

अंत्यसंस्कारांचे कार्यक्रम

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी मंगळवार, 01/10/2019 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे सुख असो की दु:ख. लग्न असो की मृत्यू. कार्यक्रम भरगच्च हवाच. खूप गर्दी हवी कार्यक्रमाला. माणसाला गर्दीशिवाय सुख साजरं करता येत नाही की दु:ख. जेवढी गर्दी तेवढा जसा मोठा आनंद; तशी जेवढी गर्दी, तेवढं प्रचंड मोठं दु:खं. माणसाला गर्दी आवडते. दु:खात सुध्दा आपल्या आजूबाजूला प्रचंड गर्दी हवीच. गर्दीने दु:खाची सुध्दा प्रतिष्ठा वाढते असा आपला समज होतोय का? या कार्यक्रम शरण समाजात माणूस संपला तरी कार्यक्रम चुकत नाहीत. दु:ख आवरून कंबर खोचून कार्यक्रम साजरे करायचे असतात. नाहीतर लोक काय म्हणतील! याला मुळी प्रेमच नव्हतं. म्हणून कार्यक्रम करत नाही. माणूस वारला.

व्हाटसअ‍ॅप चा एसएमएस मेसेज

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 28/09/2019 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
तो: हॅलो. ती: हं बोला. तो: काय गं, झोप झाली का? ती: हो आताच उठले. आज जरा जास्तच गाढ झोप लागली होती. पोस्टमनची आरोळीदेखील नाही ऐकू आली. तो: हं. ती: तुमची बहीण सकाळी येईल का दुपारी? तुम्ही पाठवलेले व्हाटसअ‍ॅप बघितले. उद्या त्यांचे जेवण बनवावे लागेल का त्यासाठी विचारते आहे. तो: सकाळी येणार आहे. पण ती दुसरीकडे उतरली आहे. आपल्याकडे आली तर येईल. मी एक एसएमएस पाठवलेला होता वाचला का? ती: हो वाचला ना. म्हणून तर विचारले की तुमची बहीण सकाळी येईल का दुपारी? तुम्ही व्हाटसअ‍ॅप केले आहे ना? तो: अग, एसएमएस चा मेसेज म्हणतोय मी.

radio ga ga

लेखक क्षितिज जयकर यांनी शुक्रवार, 27/09/2019 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
RADIO GA GA……………… ह्या लेखाचं शीर्षक जरी इंग्लिश मधून असलं तरी ते मराठीत सुद्धा तितकंच सार्थ आहे. रेडिओ गा!!!!! गा!!!!. १९८४ साली QUEEN ह्या ब्रिटिश वाद्यवृंदाने हे गाणं रचनाबद्ध केलं , ते आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा आपल्याला रेडिओ वर हमखास ऐकायला मिळतं. मला हा लेख लिहिण्यासाठी जी स्फूर्ती मिळाली ती ह्याच गीतावरून. त्यामुळे सर्वप्रथम ह्या गाण्याबद्दल थोडीशी माहिती देतो. मगाशी लिहिल्याप्रमाणे QUEEN ह्या वाद्यवृंदाचा DRUMMER (त्याला ढोल वादक म्हणणं माझ्या जीवावर येतं) रॉजर टेलर याने ते १९८३ साली प्रथम ते रचनाबद्ध केलं , आणि मग १९८४ साली ते स्वरबद्ध करून सर्वत्र प्रसिद्ध करण्यात आलं.

जाणिवांची अंतरे

लेखक हजारो ख्वाईशे ऐसी यांनी शुक्रवार, 27/09/2019 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
त्वचेच्या रंगांवरून अगदीच वेगळे ओळखे जाऊ अशा देशात मी राहतेय सध्या. आपण कितीही म्हटलं तर मनाच्या एका कोपऱ्यात आपण खरंच सामावले जाऊ का इथल्या लोकांच्यात हा प्रश्न येतोच. मुलाची शाळा इंटरनॅशनल स्कूल. त्यात जगाच्या चारी कोपऱ्यातून आलेली पिल्लं. माझ्या पिल्लासारखीच. हसरी पण नवीन जागेला बावरलेली. पण ती एकमेकांचे छान दोस्त होतात. नवऱ्याच्या ॲाफिसमध्येही तसेच पूर्ण जगभरातून आलेले लोक. पण काम करता करता त्यांचीही गट्टी होते. राहता राहिले मी. सध्या ऑफिसला जात नसल्याने माझा तो लोकांच्यात मिसळायचा मार्ग नाही. मग उरतात मला रोज भेटणारे लोक.