Skip to main content

लेख

जाहीर विचारणा आणि आवाहन

लेखक घाटावरचे भट यांनी बुधवार, 24/12/2008 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम मंडळी, मिसळपाववर सध्या नमस्ते सदा वत्सले मातृभूमे........ लैच फार्मात आहे. हा लेख लिहायच्या टैमाला हा धागा उघडून बरोब्बर ७ दिवस आणि ६ मिनिटं झालेली आहेत, त्याची ३१६६ वाचनं झालेली आहेत आणि त्यावर १४३ प्रतिसाद आहेत. आता गम्मत अशी आहे की माझा इतिहास थोडासा कच्चा आहे (आणि संस्थळांचा, विशेषतः मिपाचा इतिहास तर बिल्कूल झीरो) म्हणून मला तुमची मदत हवीये.

घरटे -२ : सत्यकथेवर आधारित!!

लेखक चेतन१२३प यांनी मंगळवार, 23/12/2008 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
त्यावेळी मी नुकताच सायनरला राहायला आलो होतो. अंजली अजून पाळण्यात होती. नवीन बांधकामाचे व्रण अजून शिल्लक होते. दिवाळीमध्ये रंगकाम केल्यामुळे येणाऱ्या एका वेगळ्याच सुगंधाची अनुभुती तेथे येत होती. नवीन वस्ती, नवीन लोक असल्यामुळे आमची अवस्था गोंधळल्यागत होती. अंजलीच्या आईच्या मदतीने लवकरच सर्वत्र ओळख झाली. जवळपास राहणारे जवळपास लोक मध्यमवर्गीय असल्याने माझ्या खिशाला हिच्या मागण्यांची प्रेमळ "उब" मिळणार नाही या उद्देशाने मी मनोमन खूश होतो. कारण, इतरांजवळ आहे पण आमच्याजवळ नाही अशी एखादीच उंची वस्तू ती शेजारी बघू शकत होती. सायनरमध्ये मी आनंदी होतो.

!! चांडाळ चौकडी !!

लेखक अनिल हटेला यांनी मंगळवार, 23/12/2008 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी !! मिपा म्हणजे आमचा पडीक अड्डा झालाये...बॉस किवा कलीग असोत,सारखे विचारत असतात की काय करत असतोस दिवसभर ह्या साइटवर....(हे लोक अमराठी असण्याचा फायदा की मी नेमका काय करतोये ते कुणालाच कळत नाय ..शिवाय सगळ देवनागरी ह्या लोकाना वाचता येतं पण समजत काहीच नाय....) तर मंडळी प्रत्येकाच्या आयुष्यात काही खास मित्र असतात..तसे आम्हाला ही ४ चांगले मित्र लाभले.सारे आमच्या ग्रुपला आवर्जुन चांडाळ चौकडी म्हणत...आणी नावाप्रमाणेच आम्ही होतोही (आहे म्हणनं जास्त सयुक्तीक ठरेन) तर ह्या मित्राशी आज तुमची ओळख करून द्यावी म्हटलं.. १)राजेश पाटीलः हे माननीय महोदय ९वी फेल..पण शिक्षका

घरटे -१ : सत्यकथेवर आधारित!

लेखक चेतन१२३प यांनी सोमवार, 22/12/2008 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
डिसेंबरच्या गुलाबी थंडीमध्ये सकाळचे कोवळे ऊन या जठर शरीराने खाण्यात काही औरच मजा! त्यातही लाडक्या सुनेच्या हातचा कडक, तजेलदार चहा आणि वर्तमानपत्र गॅलरीमध्ये अगदी हातामध्ये आणून मिळावे, म्हणजे माझ्यासारख्या भाद्रपदी विचार करणाऱ्या रिटायर्ड माणसाला स्वर्गसुखच म्हणा. किंबहुना त्याहूनही अधिक! तसा माझ्या सौच्या हातचा चहादेखील अगदी कडक असतो बरका! पण, सुनेच्या हातच्या चहाच्या कडकपणामध्ये "आदरणीयं श्वशुरम ।" ही भावना जाणवते तर आमच्या हिच्या हातच्या चहाच्या कडकपणामध्ये "हाताचा" कडकपणाच अधिक वाटतो.

हारापरी हौतात्म्य हे ज्यांच्या गळा साजे

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 19/12/2008 02:43 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक ९ ऑगस्ट १९२५ रोजी ’८ डाऊन’ गाडीवर लखनौ पासोन सुमारे चौदा मैल अंतरावर काकोरी ते आलमनगर दरम्यान सायंकाळी साडेसातच्या सुमारास हिंदुस्थान प्रजासत्ताक संघटनेच्या १० धाडसी शिलेदारांनी दरोडा घालुन सरकारी तिजोरी लुटली आणि साम्राज्य हादरले. हा घाला गाडीतुन वाहुन नेल्या जाणाऱ्या तिजोरीवर नव्हता तर ब्रिटीश साम्राज्यावर होता. या धाडसी क्रांतीकारकांनी जणु सरकारी खजिना लुटुन सरकारला आव्हान दिले होते. हा दरोडा अत्यंत विचार्पूर्वक ठरविलेला व सुनियोजित होता. एकदा हुतात्मा पंडीत रामप्रसाद बिस्मिल शाहजहानपूरहुन लखनौला जात असताना वाटेत त्यांनी या गाडीत सरकारी खजीना चढवताना पाहिला.

गांधीवाद आणि मराठी साहित्य !

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी गुरुवार, 18/12/2008 07:23 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाववर सध्या वेगवेगळे 'वाद' गाजत आहेत. दहशतवाद, गांधीवाद, अवांतरवाद इत्यादी इत्यादी. सध्या या विचारांनी मिसळपाववरील जनजीवन ढवळून निघाले आहे आणि त्याचा परिणाम मिपावर वावरणार्‍या मंडळींवर होतो, या सर्व विचारांचा परिणाम येथे वावरणार्‍यावर झाला नाही तर नवल वाटावे. आम्हालाही साहित्यातील गांधीविचारांनी शीळ घातली. गांधीविचारांच्या चर्चेवरुन असे दिसते की भारतीय समाजमनावर म. गांधीच्या विचारांचा परिणाम झालेला आहे आणि ती एक मोठी घटना मानलीच पाहिजे. भारतीय स्वातंत्र्याला नवचैतन्य देण्याचे श्रेय म. गांधीजींनीचा द्यावे लागेल. म. गांधींनी आपली नीतिमुल्य निश्चित केली होती.

कपॅसिटर आणि इन्व्हर्टर

लेखक आनंद घारे यांनी रविवार, 14/12/2008 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
या महत्वाच्या विषयावर झालेली चर्चा वाचून चाळीस वर्षांपूर्वी शिकलेल्या विजेसंबंधीच्या ज्ञानावरला गंज थोडा झटकला गेला. त्यातल्या क्लिष्ट गणिताचा संदर्भ टाळून या विषयीची माहिती सोप्या शब्दात देण्याचा हा एक अल्प प्रयत्न आहे. ते करतांना तपशीलात कांही तांत्रिक त्रुटी आल्या असल्या तरी या विषयाचा मुख्य गाभा शक्य तो शाबूत ठेवण्याचा प्रयत्न मी या लेखात केला आहे. आपल्या घरी जो वीजपुरवठा असतो तो एसी (आल्टर्नेटिंग करंट) या प्रकारचा म्हणजे आलटून पालटून दोन्ही दिशांना वाहणारा असतो.

बंगालच्या वाघिणी

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 14/12/2008 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्री शक्तिचे प्रतिक असलेल्या देवीची अनेक रुपे आहेत, अनेक अवतार आहेत. मात्र बंगालच्या मुला मुलींना भावलेले देवीचे रुप म्हणजे कालिमाता किंवा दुर्गामाता - हातात शस्त्र घेऊन दैत्याचा वध करणारे हाती शस्त्र धारण केलेले रौद्र रुप. मात्र क्रांतिपर्वात याच देवींचे बालिकारुप पाहायला मिळाले. सरकारी अधिकाऱ्यांनी वा मानकऱ्यांनी उन्मत्त होऊन जनतेवर अत्याचार करायचे हा जणु इंग्रजांचा शिरस्ताच होता. हिंदुस्थानात यायचे ते सत्ता आणि वैभव उपभोगायलाच, जणु आपल्या आजवरच्या कर्तबगारीचा राणीने केलेला सन्मान! मात्र विसाव्या शतकात क्रांतिपर्व उजाडले आणि चित्र पालटले.