Skip to main content

लेख

उपेक्षित सावरकर

लेखक भोचक यांनी गुरुवार, 26/02/2009 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
सावरकर नाव घेताच 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी आठवते त्यांची ती प्रसिद्ध गाजलेली उडी आठवते. त्यांची सशस्त्र क्रांती आठवते. मग त्यानंतरची हिंदूत्ववादी भूमिका आठवते. आणि मग फार तर जातीनिर्मुलनासाठी केलेलं काम आठवतं. कधी कधी भाषाशुद्धी चळवळ आठवते. पण समग्र सावरकर आपण समजून घेण्याचा प्रयत्न कधी केलाय? हे सगळं आणि याहूनही बरंच काही करणारी, मांडणारी एकच व्यक्ती होती. तिला वेगवेगळे आयाम होते आणि त्यातले अनेक आपल्याला पटणारे आणि न पटणारेही होते. पण म्हणून ते समजून न घेता त्याकडे दुर्लक्षच बरेच झाले. सावरकरांना समजून घेण्यात आपण कमी पडलो आणि त्यांचं मोठेपण इतरांपर्यंत पोहचविण्यातही आपल्याला अपयश आलं.

वळण !!

लेखक अनिल हटेला यांनी बुधवार, 25/02/2009 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
बराच वेळ वाजत असलेल्या डोअरबेल ने श्री ला जाग आली.डोळे चोळत आणी कोण तडमडलये हा विचार करत दरवाजा उघडला.समोर अरुण उभा. "काय बे , ११.०० वाजलेत.अजुन अंथरुणातच आहेस होय ?" "हम्म !" "आरे काय हे? आज १४ फेब्रुवारी ! सारी दुनिया आजचा दिवस एंजॉय करतीये आणी तु ?" "छोड ना यार ! चहा घेणारेस का ?

जीवनातल्या येणार्‍या कसोटीमधून अस्तीत्व कसं टिकवायचं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 25/02/2009 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
"स्त्रीयांना बहुदा विनम्र राहण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं.पण माझ्या जीवनाने माझी कसोटी भरपूर घेतली.मला वाटतं, माझ्यातला धीटपणा,आणि खंबीरपणा आणि त्याऊप्परही माझ्यात असलेला आपमतलबीपणा ह्याचा चांगल्यातर्‍हेने माझं मला त्या कसोटीतून पार पडण्यात उपयोग झाला " काण्यांच्या नलूला सर्व नेहमीच धट्टिंगण म्हणायचे.कारण मुलींपेक्षा ती मुलांतच जास्त वेळ घालवायची.पण त्यावेळी जरी सर्व असं म्हणत असले तरी ते तिचं वागणं धीटपणाचं होतं हे लक्षात येत नव्हतं.आता नलू एक मुलाची आई झाली असून आता ती एका कॉलेजमधे लेक्चरर म्हणून काम करते. एकदा मी बसच्या लाईनमधे उभा होतो.माझ्या मागे नलू आपल्या मुलाला घेऊन उभी होती.चूळ्

भावडो.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 24/02/2009 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
"काय झालां तेतेबाय?" "अगो! काय सांगतलंय कमळ्या? हेनी माकां खूपच वैताग आणलोसा.रोजचो उच्छाद.

"विविधतेतून अखंडता"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 22/02/2009 06:33 या दिवशी प्रकाशित केले.
"क्वान्टम फिझीक्स शाखेतले शास्त्रज्ञ सांगतात ते काही खोटं नाही.वारली लोकांसारखेच ते विचार करीत असावेत. "जगात असलेलं सर्व काही गतिबोधकतेने अत्यंत घनिष्ठ पातळीवर एकमेकाशी संबंध स्थापित करून असतं." प्रो.देसायांच्या एका नातीचं सर्व आयुष्य कलकत्यात गेलं.कारण भाऊसाहेबांचा एक जांवई कलकत्याचा.अर्थात ह्या कुटूंबावर बंगाली रीतीरिवाजाची बरचशी छाप पडली होती.एकदा ती माझ्या घरी राहायला आली होती.मला म्हणाली, "काका,मला सकाळी सकाळीच उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यायचं आहे." मी तिला म्हणालो, "संध्याकाळी,जुहू चौपाटीवर जाऊन आपण मावळत्या सूर्याचं दर्शन पोटभर घेऊ शकतो.पण उगवत्या सूर्याचं दर्शन तुला कलकत्या सारखं सकाळी

तालिबानीस्तान !

लेखक भोचक यांनी बुधवार, 18/02/2009 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
भारताची राजधानी दिल्लापासून दीडशे किलोमीटर पलीकडच्या प्रांतात भारतीय कायदे चालू शकणार नाहीत, असे सरकारनेच जाहीर केले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? चकीत होऊन पहायची गरज नाही. भारतात असे कधी होणार नाही. पण भारताचे कधी भले न पाहिलेल्या पाकिस्तानमध्ये मात्र असे होतेय. राजधानी इस्लामाबादपासून दीडशे किलोमीटरवर असलेल्या 'स्वात' प्रांतात आता पाकिस्तानी कायदे चालणार नाहीत. पाकिस्तानी सरकार आणि या भागात वर्चस्व असलेल्या तालिबान्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता या भागात न्यायदानाच्या प्रक्रियेसाठी 'शरीया' कायदे लागू होतील.

विक्रम - वेताळ आणि इंडिया - पाकिस्तान

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 18/02/2009 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
वेताळ: राजा, तुझ्या निर्लज्जपणाची देखिल कमाल आहे हा, कितीदा हाकलला तरी कोडग्यासारखा पुन्हा - पुन्हा येतोसच काम मागायला. विक्रम: भो वेताळा, रात्री वाईट आल्या आहेत बाबा, मोठ्या मोठ्यांची तंतरलीय. मी तर सामान्य निशाचर, पाठीवर पोट बाबा माझ्यासारख्याचं. म्हणजे तु पाठीवर आहेस तोवर तुझे प्रश्न आहेत. तुझे प्रश्न आहेत तोवर त्यावर पुस्तके लिहीली जातील...रॉयल्टी मिळते रे मला ! वेताळ: हा..हा..हा...! फ़ार जोरात नाही ना रे हसलो. कालच माझी सासु जिवंत झाली म्हणुन म्हटलं. नाहीतर वेताळीण बाई म्हणणार," बघा माझी गरीब, बिचारी (?) आई जिवंत झाली आणि हे हसताहेत. जेवायला मिळणार नाही बाबा आठवडाभर.

मिसळपाववरील पहिले वर्ष

लेखक आनंद घारे यांनी बुधवार, 18/02/2009 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
एक वर्षापूर्वी मी मिसळपावच्या हॉटेलात पहिले पाऊल ठेवले. ते कोण चालवत असे याची त्या वेळी मला कांही कल्पना नव्हती. पण आंत आल्या आल्या तात्यासाहेबांनी जुनी ओळख दाखवून मोठ्या अगत्याने "या, बसा." म्हणत माझ्याकडे खुर्ची सरकवली. आजूबाजूला बसलेल्या लोकांत कांही ओळखीचे चेहेरे आणि मुखवटे पाहून मला आपल्या माणसांत आल्यासारखे वाटले. काउंटरवर जाऊन मी थाळी भरून घेतली. जेवण तर मस्तच होते. तेंव्हापासून इकडे येत राहिलो. मधील काळात कधी मला तर कधी माझ्या संगणकाला विषाणूंची बाधा झाली, कधी मी परगांवी गेलो वगैरे कारणांमुळे अवकाशाशी जडलेले नाते राखता आले नाही.

आपण सगळे एकमेकासाठी शिक्षक आहोत.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 18/02/2009 07:57 या दिवशी प्रकाशित केले.
प्रो.देसायांच्या घरी आज आम्ही चर्चा करण्यासाठी जमलो होतो.चर्चेचा विषय होता "शिक्षक". भाऊसाहेबानी बर्‍याच विद्वानाना ह्या चर्चेसाठी बोलावलं होतं.नेहमी प्रमाणे काही लोक शिक्षक म्हणून आपला अनुभव सांगून गेले.काहीनी शिक्षक झाल्यामुळे आपल्या जीवनात काय काय समस्या आल्या त्याचे पाढे वाचले.काहीनी शिक्षक आणि मुलांमधल्या पारस्पारिक प्रभावाबद्दल मनोरंजक माहिती सांगितली.भाऊसाहेबानी आपले पण रुईया कॉलेजमधले गमतीदार अनुभव सांगितले. मात्र एका वयस्कर व्यक्तिने "शिक्षक" म्हणजे फक्त शाळेत किंवा कॉलेजमधे शिकवणारी व्यक्ति असं न मानता,मोठ्या दर्शनशास्त्राच्या दृष्टिने किंवा तत्वज्ञानाच्या दृष्टिने चर्चा करून सगळ्या