Skip to main content

लेख

ज्योतिष हे शास्त्रच ! ...आणि आता मान्यताप्राप्त शास्त्र. डॉक्टर .प्रा. संजय होनकळसे .

लेखक dr sanjay honkalse यांनी सोमवार, 30/08/2010 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
">ज्योतिष हे शास्त्रच ! ... आणि आता मान्यताप्राप्त शास्त्र. डॉक्टर .प्रा. संजय होनकळसे . M.A.;M.Phil.;M.D.;M.Com.LL.B.D.B.M.;D.H.E. drsanjayhonkalse@gmail.com http://drsanjayhonkalse.tripod.com ज्योतिष शास्त्र हे प्राचीन शास्त्र असून त्याची उत्पत्ती ही भारतात व ब्याबिलोन संस्कृतीत झाला आहे.

खासदारांची पगारवाढ : ग्यानबाची मुलाखत

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 26/08/2010 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
खासदारांची पगारवाढ : ग्यानबाची मुलाखत सध्या खासदारांच्या पगारवाढीचा मुद्दा देशात सर्वदूर गाजतोय. खासदारांच्या पगारवाढीबद्दल सर्वसामान्य जनतेत विशेषत: शेतकरी वर्गात प्रचंड रोष असणारच, असे गृहीत धरून आलेली संधी "कॅश" करायला हवी, अशा उद्देशाने एका संपादकाने मला मेल केली. त्यातील मजकूर असा.

निद्रेची चिरफाड

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी बुधवार, 25/08/2010 07:51 या दिवशी प्रकाशित केले.
निद्रादेवीची कुंडली मांडून तिला समजून घेणं फारसं अवघड नाहिये. ती आपल्यावर का बरे रुसलीये याचीही उत्तरे मग शोधता येतात. पूर्वीची माणसं उशाला दगड घेऊनही प्रगाढ झोपत असत असे म्हणतात. याउलट आजच्या सिमेंटच्या जंगलात दगड सापडणे दुरापास्त झाल्यामुळे की काय कोण जाणे, माणसांना मऊ उशा अंगाखाली घेऊनही 'म्हणावी तशी' झोप लागत नसते. किंबहुना अशी तक्रार नेहमी कानावर येते. त्यामुळेच निद्रेची चिरफाड करण्याचे योजिले आहे. तर ती निद्रादेवी एकटी नसून त्या दोन जुळ्या बहिणी असतात. भिन्न स्वभावाच्या, विरोधी आचरणाच्या. रात्रभर त्या फेर धरुन कधी झिम्मा, कधी लपाछपी तर कधी खोखो खेळतात.

ते हृदय कसे आईचे......

लेखक पैसा यांनी रविवार, 22/08/2010 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
आमची मनी, म्हणजे मनीमावशी. अर्थात वाघाची मावशी. मासे खाणे आणि झोपा काढणे हा तिचा अत्यंत आवडता उद्योग. तिचा जन्मच आमच्या घरात झाला. त्यामुळे घरातील सर्वांची अतिशय लाडकी. आहे तशी गुणी. कधी कोणाला नख लावत नाही. की चावत नाही. तिला पहिल्यांदा पिल्लं झाली तेव्हा तिने मला रात्रभर सोबत बसवून ठेवलं होतं, एवढा माणसांवर विश्वास ठेवते. खूपच मायाळू, म्हणजे मधेच मांडीवर येऊन बसेल आणि रोज सकाळी पोळी भरवून घेईल. खूप लाड करून घेते. तिची पिल्लं लहान असतानाची ही हकीकत. एकदा रात्री एक मोठा बोका चोरपावलांनी घरात घुसला. आम्ही सगळेजण झोपेत होतो. मनीने सरळ त्याच्यावर हल्ला चढवला. आवाज ऐकून आम्ही सगळे जागे झालो.

राजीव'जींना ६६व्या जयन्तीनिमित्त विनम्र अभिवादन! ..... WE STILL MISS YOU..~~ RAJEEV'JI! LOVE YOU!

लेखक मृगनयनी यांनी शुक्रवार, 20/08/2010 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~ आज २० ऑगस्ट, २०१० राजीव'जी, तुमच्या ६६व्या जन्मदिनानिमित्त तुम्हाला विनम्र अभिवादन! आज तुम्ही असता.... तर देशाचे चित्र कदाचित वेगळे असते! ...... WE MISS YOU!

हा कुठला बरे आजार/विकार?

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 20/08/2010 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
हा कुठला बरे आजार/विकार? वाचनाच्या बाबतीत ग्यानबा फ़ार अभागी मनुष्य आहे. अभागी या अर्थाने की साहित्यिक क्षेत्रात विपुल साहित्य उपलब्ध असूनही ते जास्तीत जास्त वाचण्याचे भाग्य त्याला फ़ारसे लाभले नाही. कधी आर्थीक स्थितीमुळे पुस्तके विकत न घेऊ शकल्यामुळे तर कधी भौगोलीक स्थितीमुळे पुस्तके अनुपलब्ध असल्यामुळे असे घडले असावे. पण हे सत्य असले तरी मात्र पुर्णसत्य नाही. खरे हे आहे की त्याला एक आजार आहे. आणि तो आजार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याला वाचायला खूप आवडतं, खूपखूप आवडतं. विषयाचेही बंधन नाही, काहीही आवडतं.