Skip to main content

लेख

एक होती म्हातारी .............

लेखक पियुशा यांनी सोमवार, 01/11/2010 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
हाय मि पियुशा पहिलच प्रयत्न आहे माझा ,लिखनतिल चुका बद्दल साम्भालुन घ्या, एक होती म्हातारी ............. खूप खूप वर्षापूर्वी आट-पाट नगर होते , त्यात एक खावून पिवून सुखी असे कुटुंब राहत होते ,नवरा बायको आणि ४ मुले ,थोडीशीच शेती त्यावर संसार अवलंबून होता , मुले मोठी होऊ लागली तशा-तशा गरजा वाढू लागल्या ,त्यांची शाळा वही पुस्तके ,यांचा खर्चामुळे घरच्या माऊलीला शेतात मजुरी करावी लागायची ,आईबापाने जणू चंगच बांधला होता कि आपण अडाणी राहिलो पण मुलांना शिकवून मोठे साहेब करायचे , म्हणून मायबाप रात्रीचा दिवस करू लागली मुलांच्या गरजा

स्वातंत्र्योत्तर भारत

लेखक प्रमोद सावंत१ यांनी शनिवार, 30/10/2010 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाच्या विकासाठी स्वप्न प्रत्येकाने पाहिले. त्यानुसार दिशा आखण्याचा प्रयत्नदेखील नंतरच्या काळात होत गेला. पंडित नेहरूंनी धरणे, पोलाद कारखाने व उच्च अभियांत्रिकी शिक्षणसंस्थांची निर्मीती करण्यावर भर दिला. इंदिरा गांधींनीं लहान गावांपर्यंत बँका नेल्या. हरिक्रांतीचा मार्ग दाखविला. राजीव गांधीनीं संगणक, दळणवळण क्षेत्रात क्रांती केली. देश आधुनिकतेच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करू लागला. नरसिंहराव यांच्या कारकिर्दीत मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार झाला. जीवनाश्यक वस्तुंची कमी झाली. अटलबिहारी वाजपेयी यांनी ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून खेडी एकमेकांशी जोडली.

प्रिन्सीची कथा

लेखक रामदास यांनी शुक्रवार, 29/10/2010 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिन्सीची कथा एका गुलाबी हिर्‍याचा इतिहास आणि एका गोंडस राजकुमाराची शोकांतिका आहे. या कथेची सुरुवात १९४३ साली मद्रासच्या रेसकोर्सवर झाली. रेसकोर्सवर बडोद्याचे महाराज प्रतापसिंग गायकवाड आणि सितादेवी यांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात -लग्नाच्या आणाभाका -शपथा सगळं काही क्रमवार झालं . लाज शरम कुलकी मर्याद वगैरे गुंडाळून ठेवत दोघांनी लग्न करायचं ठरवलं . असं म्हणायचं कारण असं की प्रतापराव विवाहीत होते.

फुल्ल टू दबंग

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शुक्रवार, 29/10/2010 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
काल मध्यान्ह मुहूर्तावर मी छानसे देवाला आणि स्वतःला वंदन केले. त्यानंतर 'हे कसे शक्य आहे? ' 'असे कधी असते का? ' असे नको ते प्रश्न विचारणारा मेंदूचा भाग काढून बाजूला ठेवाल. त्यानंतर छानसा उजव्या हाताला रुमाल गुंडाळला आणि शर्टाचे वरचे बटण उघडे टाकून मी रिक्षावाल्यांच्या ईस्टाइलने खुर्चीत स्थानापन्नं झालो.

एक राजकारणी संत : समर्थ रामदास

लेखक पारा यांनी गुरुवार, 28/10/2010 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
मी सध्याच काही आठवड्यांपूर्वी सज्जनगडावर गेलो होतो. तिथली एकूण शिस्त आणि व्यवस्था पाहून मी प्रभावित झालो. तिथल्या एका पुस्तकांच्या दुकानांतून मी हे पुस्तक निवडलं. 'एक राजकारणी संत : समर्थ रामदास'. हे पुस्तक म्हणजे एक व्याख्यानमाला आहे, रा. शं. वाळिंबे ह्याच्या ओघवत्या शैलीत. एकूण सात दिवस ही व्याख्यानमाला चालली, त्यात त्यांनी रामदासांच्या आयुष्यामधल्या अनेक पैलूंचं व्यवस्थित विवरण करून सांगितलं. हे पुस्तक वाचून मला ही पटलं की समर्थ रामदास खरोखर समर्थ का आहेत ते. आणि ते इतर संतमंडळींपासून कसे पूर्णतया वेगळे ठरतात.

आंधळी कोशिंबीर

लेखक प्रमोद सावंत१ यांनी गुरुवार, 28/10/2010 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
सुमारे १००० वर्षांपूर्वी अरबी राष्ट्रांमध्येच जगाची वैचारिक प्रगती झाली. बगदाद व कैरॊ ही जागतिक संस्कृतीची केंद्रस्थाने बनली . नंतरच्या १००० हजार वर्षांत त्या प्रदेशांची अधोगती झाली. भ्रष्टाचार, बेजबाबदारपणा, संपत्तीचे ऒंगळ प्रदर्शन, आपापसातील भांडण, लढाया यामुळे अरब राष्ट्रे पारतंत्र्यात गेली. स्वतंत्र झाल्यावरही काही वर्षे तेथील नेते आंधळी कोशिंबीर खेळत होते. आता त्यांनी डोळ्यांवरची पट्टी काढली आहे. आपल्या समाजाचे भवितव्य शिक्षणावर अवलंबून आहे, हे त्यांना उमगले आहे. त्यामुळे या देशात स्वत: राष्ट्राध्यक्ष व त्यांची पत्नी शिक्षण क्षेत्रात जातीने लक्ष देतात, भरपूर पैसा ऒततात.

आंधळी कोशिंबीर

लेखक प्रमोद सावंत१ यांनी गुरुवार, 28/10/2010 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
सुमारे १००० वर्षांपूर्वी अरबी राष्ट्रांमध्येच जगाची वैचारिक प्रगती झाली. बगदाद व कैरॊ ही जागतिक संस्कृतीची केंद्रस्थाने बनली . नंतरच्या १००० हजार वर्षांत त्या प्रदेशांची अधोगती झाली. भ्रष्टाचार, बेजबाबदारपणा, संपत्तीचे ऒंगळ प्रदर्शन, आपापसातील भांडण, लढाया यामुळे अरब राष्ट्रे पारतंत्र्यात गेली. स्वतंत्र झाल्यावरही काही वर्षे तेथील नेते आंधळी कोशिंबीर खेळत होते. आता त्यांनी डोळ्यांवरची पट्टी काढली आहे. आपल्या समाजाचे भवितव्य शिक्षणावर अवलंबून आहे, हे त्यांना उमगले आहे. त्यामुळे या देशात स्वत: राष्ट्राध्यक्ष व त्यांची पत्नी शिक्षण क्षेत्रात जातीने लक्ष देतात, भरपूर पैसा ऒततात.

भाषिक संपत्ती

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 26/10/2010 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
भाषिक संपत्ती - लहानपणापासुन आवडता असलेल्या विषयावर लिहायला घ्यावे असा विचार केला त्यावेळेस याहुन जास्त समर्पक शीर्षक नाही सुचले. सध्या शिव्या (किंवा मराठीत ज्याला आपण स्लँग म्हणतो) मर्दानगीचे प्रतिक आहेत असे मौलिक ज्ञान मला नुकतेच मिळाले आहे. त्यामुळे या संपत्तीचे मोलही प्रचंड वाढले आहे. असे म्हणतात की कुठल्याही भाषेवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर प्रथम त्या भाषेतल्या शिव्या शिकुन घ्याव्यात. आमच्यासाठी ही प्रक्रिया फार लवकर सुरु झाली. मायबोलीतल्या काही "मर्दानी" शब्दांवर आम्ही खुप लवकर प्रभुत्व मिळवले. कोल्हापुरात असताना (माझा लेख सुपरहिट्ट होणार.