Skip to main content

लेख

द अंडरटेकर!

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी सोमवार, 26/03/2012 04:09 या दिवशी प्रकाशित केले.
बास! शिर्षक वाचल्यावरच अनेकांचा थरकाप उडेल. अनेकांना आश्चर्य वाटेल. अनेकांना उत्साह वाटेल. आणि अनेकांना विचित्रही वाटेल. मात्र 'कोण हा अंडरटेकर?' असा प्रश्न कुणालाच पडणार नाही. रेसलींग या नावानं प्रसिद्ध असलेली कुस्ती तुम्हाला आवडत असेल अथवा नसेल, आणि डब्ल्य़ुडब्ल्य़ुएफ (किंवा आता डब्ल्य़ुडब्ल्य़ुई) अनेक वर्षांपासुन पाहिले असेल अथवा नसेल; परंतु 'अंडरटेकर' हे नाव आणि हे व्यक्तीमत्त्व याबद्दल काहिच कल्पना नाही; असा माणुस सापडणे विरळाच! आपण ज्या क्षेत्रात काम करतो, त्या क्षेत्रालाच आपल्या नावानं ओळखलं जाण्याचं सौभाग्य एखाद्याच सचिन तेंडुलकरला मिळतं आणि एखाद्याच अंडरटेकरला! मार्क विल्यम कॉलॉवे.

गुढीपाडव्याचे संवत्सर चक्र कसे चालते?

लेखक सागर यांनी शुक्रवार, 23/03/2012 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार वाचकांनो, आज गुढीपाडवा, चैत्र शुद्ध प्रतिपदा, शके १९३४, नंदननाम संवत्सराचा प्रारंभ होतो आहे. गुढीपाडव्याच्या , मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. यानिमित्ताने वाचकांना प्रत्येक शके वर्षाचे नाव कसे ठरवले जाते हे सांगायचा हा अल्पसा प्रयत्न शके १९३४ या वर्षाचे नाव आहे नंदन. तर दरवर्षी शक संवत्सराचे नेमके नाव कसे ठरवले जाते? हे पाहण्यापूर्वी हिंदू पंचांगपद्धतीत कालगणना नेमकी कशी मोजली जाते ते उलट्या क्रमाने पाहूयात, म्हणजे हा ६० नावांचा गुंता सुटायला सोपा पडेल. १ महामाया निमिष म्हणजे १००० शिवनिमिषे मानली जातात.

जलतज्ञ माधव आत्माराम चितळे

लेखक नरेंद्र गोळे यांनी गुरुवार, 22/03/2012 11:38 या दिवशी प्रकाशित केले.

आज २२-०३-२०१२. आंतरराष्ट्रीय जलविषयक जागृती दिन. त्यानिमित्ताने भारतातील विख्यात जलतज्ञ माधव आत्माराम चितळे यांच्या कार्याची आपण थोडक्यात ओळख करून घेऊ या.

शाईचा पेन

लेखक सुधांशू यांनी बुधवार, 21/03/2012 04:26 या दिवशी प्रकाशित केले.
'चला दीपक सरकार, जायच का घरी?', एक तासाच्या कंटाळवाण्या मिटिंग मधून बाहेर आल्यावर मी दीपक ला विचारल. दीपक काहीतरी काम सांगून तो मिटिंग ला आला नव्हता, लकी साला. सगळ्यांचे पुढच्या महिन्याचे टार्गेटस ठरवता ठरवता आमच्या बॉस ने आमच्या डोक्याला झिणझिण्या आणल्या होत्या. खूप बिझी दिवस होता आज. कस्टमरना पटवता पटवता नाकी नऊ येत होते, तरी पण आज मी १० कॉम्पुटर विकले होते. संध्याकाळी ५ वाजता कोणी टार्गेट मिटिंगस घेत का? पण या बॉस लोकांना सांगणार कोण? 'नाही रे थांब जरा, अजून वेळ आहे', दीपक म्हणाला.

माझी चित्तरकथा

लेखक मृत्युन्जय यांनी शुक्रवार, 16/03/2012 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
माझे आणि चित्रकलेचे नाते डॅरील कलीनन आणी शेन वॉर्नचे नाते जसे होते अगदी तसेच होते. कलीनन शेन वॉर्नला प्रचंड घाबरायचा. त्याच्या हातभर वळणार्‍या चेंडुला जास्त घाबरायचा की तोंडातुन हातभर बाहेर येउन चालणार्‍या जीभेला जास्त घाबरायचा ते नाही माहिती. पण त्याला म्हणे स्वप्नात सुद्धा शेन वॉर्न दिसायचा. त्याने त्यासाठी खास मानसोपचार घेतले. दुर्दैवाने ही गोष्ट वॉर्नीला कळाली. झाले. पुढच्या वेळेस मैदानात गाठ पडताच वॉर्नने त्याला टोमणा मारलाच "कली बाळा घाबरु नकोस. पाहिजे असल्यास तु माझ्या बेडवर झोपु शकतोस." शेन वॉर्न ने त्याचे आयुष्यभर भांडवल केले आणि जमेल तेव्हा कलीननला टोमणे मारले.

एक होता राजा....

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 13/03/2012 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
"त्याला पायतले यॉर्कर्स खेळता येत नाहीत " - इति माझा अखिल भारतीय खिलारेवाडी तरुण मित्रमंडळाच्या क्रिकेट संघाचा अघोषित कप्तान. "पण पायातला यॉर्कर म्हणजे काय? यॉर्कर फक्त पायातच टाकतात ना? डोक्यावरुन गेला तर त्याला बाउंसर म्हणतात. "- इति मी. "तेच ते. त्याला बाउंसर पण खेळता येत नाहीत" " अर्रे पण त्याला म्हणजे कोणाला" मी हताश होउन विचारले? "सौरव गांगुली.

नक्षत्रं आणि राशी

लेखक असुर यांनी मंगळवार, 13/03/2012 06:10 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, नक्षत्रं आणि राशी, असं नाव वाचून साधारण जो ग्रह होणं शक्य आहे, तसा राशीचक्राचा इथे संबंध नक्कीच आहे, पण थोडा वेगळ्या अर्थाने. एखादा खगोलावरचा लेख अल्पमती साथ देते तसा लिहावा हा प्रयत्न आहे. अगदीच कुणाला आवडलाच लेख, आणि चार दोन लोकांचा इंटरेस्ट वाढलाच खगोलशास्त्रात, तर आम्ही स्वतःला धन्युधन्यु समजून घ्यावे ही अल्पशी अपेक्षा. बाकी ज्योतिष या विभागाकडे वळायचा माझा अजून तरी धीर होत नाही बुवा. 'faith is a gift I'm yet to receive' असं कुठेतरी, कोणीसं, काहीसं म्हणून गेलं ना; तसं माझं या ज्योतिषाबाबत झालंय.

मेरे अवगुन चित ना धरो...

लेखक चैतन्य दीक्षित यांनी सोमवार, 12/03/2012 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
कोण गती जगलो हे जीवन? केली किति पापे? हरि, हरि आता सगळ्या दु:खा, शिणलो भवतापे | आयुष्याची गाडी उताराला लागली आणि मागे वळून पाहिलं तर दिसलं ते अविचारानं जगलेलं जीवन. आनंदाच्या क्षणी धुंद-मत्त होऊन तुला विसरलो, दु:ख झालं तेव्हा माझं कर्म न पाहता तुलाच विचारले की "हाच का तुझा न्याय?" सुख-दु:खांच्या लाटांमध्ये हेलकावे घेत, मन नाचवेल तसा नाचलो पण काही केल्या मला माझं वागणं तपासून पहावंसं वाटलं नाही. मी माझ्या चुका मात्र पाहिल्याच नाहीत.तुला विसरलो रे मी!