Skip to main content

लेख

प्रा. डॉ. श्री. चं. पी. कर्तक आणि विस्तव वल्ल्यायण - एक परिचय

लेखक राजेश घासकडवी यांनी शुक्रवार, 20/04/2012 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
कांदा संस्थान - भारताची अग्नि ५ ही चाचणी यशस्वी होणार याचे भाकित तीन महिन्यांपूर्वीच मी केले होते असे जाहीर करून प्रा. डॉ. श्री. चं. पी. कर्तक यांनी संस्थानात खळबळ माजवलेली आहे. प्रा. डॉ. श्री. चं. पी. कर्तकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा हा वृत्तांत. "माझ्याकडे इमेल्स आहेत. आमच्या मित्रांना पाठवलेल्या." पुरावा म्हणून हातातले प्रिंटाउट फडफडवत प्रा. डॉ. श्री. चं. पी. कर्तक म्हणाले. "त्यात मी स्पष्टपणे लिहिलंय" आपला चष्मा लावत ते वाचायला लागले. 'मग, विस्तव पेटणार का पाच?' "हे माझ्या मित्राने विचारलेलं आहे.

लग्नाचा घोळ ...एफ १!!एफ १!!एफ १!!एफ १!!

लेखक प्राध्यापक यांनी मंगळवार, 17/04/2012 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
लग्नाचा घोळ ...एफ १!!एफ १!!एफ १!!एफ १ (आदरणीय यक्कू यांची माफी मागुन....) .. एक लग्न होउन सुरळीत संसार चालु असताना दुसर्‍या लग्नाची दुर्बुध्दी झाली,आणी दुसरे लग्न केले.(झक मारली अनं दुसरं लग्न केल..

आय आय टी रामैय्या

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी मंगळवार, 17/04/2012 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
पंचवीस-सव्वीस वर्षांपुर्वीची गोष्ट आहे आपल्या जवळच्याच आंध्रप्रदेशातली. तेलंगणातल्या विविध शाळांमधून विद्यार्थ्यांना गणित शिकवत आयुष्य घालवलेला चुक्का रामैय्या नावाचा एक हाडाचा शिक्षक होता. शिक्षकी पेशा एक व्रत म्हणुन स्विकारण्यापुर्वी स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतलेला, गांधींजींच्या सत्याग्रह आंदोलनात तुरूंगवास भोगलेला एक देशभक्त! वारंगळमधल्या आपल्या गुडुर या मुळगावी अस्पृश्यता विरोधी चळवळ चालवून आपल्याच ब्राम्हण समाजातून वाळीत टाकल्या गेलेला एक पुरोगामी विचाराचा माणुस.

कुलरची खरेदी

लेखक प्राध्यापक यांनी शनिवार, 14/04/2012 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
एअर कुलर ची खरेदीच नियोजन घरात बर्‍याच दिवसापासुन चालल होत, होता येइल तेव्हड मी खरेदि टाळण्याचा प्रयत्न करत होतो,कारण एकच मार्च अखेर मात्र जसजस उन्हाची काहीली वाढु लागली तसं घरातल तपमान आणी अबोला दोन्हीही एकदमच वाढु लागलं नाइलाजाने दोन चार मित्रांकडुन उसन वारी करुन आर्थिक गणित कसबस जमवल आणी मध्यम वर्गीय प्रथांनुसार दुकानांमधे कुलरची माहीति काढायला सुरुवात केली . लवकरच जाणवल हे प्रकरण वाटत तेव्हढ सोप नाही . मित्रांकडुन माहीती काढायला प्रारंभ केला,एकानं सांगीतल कुलर घेताय ना?मग लोकल कंपनीचाच घ्या,ते ब्रँडेड कंपनी वाले फार लुटतात हो?

नस्त्या उचापती

लेखक अन्नू यांनी गुरुवार, 12/04/2012 04:49 या दिवशी प्रकाशित केले.
आज घरातील सर्व मंडळी काही कारणास्तव चार दिवसांसाठी बाहेरगावी गेलेली असल्याने मी घरात एकटाच पडलो होतो आणि त्यामुळेच घरातील 'स्व' जेवणाची जबाबदारीसुद्धा सर्वस्वी माझ्यावर पडली होती. तसा मी भात अगदी मस्त करतो (एकट्यापुरताच) परंतु रोज रोज भात खाण्यापेक्षा आज जरा वेगळं करुया असे वाटले. पण वेगळ म्हणजे नेमक काय करायच? कारण ऑम्लेट- भाताच्या पुढे माझी कधीच उडी गेली नव्हती; नव्हे तसं धाडसच मी कधी केलं नव्हत. (त्यात आळस हा घटकही किंचितसा कारणीभूत होताच!) पण आज मात्र काहीतरी असं धाडसी कृत्य करावच अस मनापासून वाटू लागल होतं.

एका तलवारबाजाची कहाणी

लेखक मृत्युन्जय यांनी बुधवार, 11/04/2012 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
पांडवांच्या वनवासातले १२ वे वर्ष संपत आले तसे दुर्योधनाच्या चेहर्‍यावरचे चिंतेचे जाळे वाढतच चालले. पांडवांच्या मागावर सोडलेले गुप्तहेर जसे एकामागुन एक बेपत्ता होउ लागले तसे तसे तर त्याचे डोके काळजीने पोखरले जाउ लागले. कर्ण, द्रोण भीष्मादि दिग्गजांच्या बळावर त्याने पांडवांशी वैर तर घेतले होते परंतु एक कर्ण वगळता कोण किती एकनिष्ठ आहे याबद्दल त्याला शंकाच होती. भीष्म द्रोण तर ऐनवेळेस पाठिशी उभे राहतिल की नाही याची त्याला काळजी होतीच. पण सत्तेच्या लालसेने दु:शासन देखील विरोधात उभा ठाकणार नाही कशावरुन? पण ही शंका तो झटकन पुसुन टाकत असे. द्रौपदीच्या वस्त्राला हात घालणारा दु:शासन तर होता.

आणि एक वर्तुळ पुर्ण झाले.

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 09/04/2012 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
रूपे जराया भयम। अर्थात रुपाला वार्धक्याचे भय असते आणि देवाने तारुण्यात दिलेले रुप आणि सौष्ठव नाहिसे होते म्हणुन मनुष्यालादेखील वार्धक्याचे भय असते. अँटी एजिंग क्रीम्स च्या जमान्यात आज आपल्याला ते असते तर पुराणकालातील ययातीला ते असल्यास आश्चर्य वाटायला नको. त्यात वर तो गेलेला विषयसुखाच्या आहारी. स्त्रीसुखात रममाण झालेला, स्त्रियांच्या बाहुपाशात राजधर्म विसरलेला, देवयानीसारखी करारी स्त्री पत्नी असुनही राजधर्माची उपेक्षा करणारा.

सत्याग्रही...

लेखक सुधीर मुतालीक यांनी सोमवार, 09/04/2012 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
( ऑगस्ट २०११ मध्ये हा लेख मी लिहिला होता. मिपावर टाकला नव्हता. आज काही कारणांनी या विषयाची आठ्वण झाली त्यामुळे ठेवणीतुन बाहेर काढला. संदर्भ काही महिन्यांपुर्वीचा असला तरी विषय त्रिकालाबादित आहे ! ) ___________________________________________________________________ 'सत्याग्रही' मोर्चांचा वणवा पसरलाय देशभर. जल्लोष आहे. चीड आहे. उन्मादही आहे. सरकारी खजिन्यातल्या करोडो रुपये लंपास करणा-या बदमाषांच्या बातम्या कानावरून वा डोळ्यासमोरून जाताना प्रत्येक वेळी जो संताप झाला होता आणि जो असहाय्यपणे, हतबल होऊन दाबून ठेवला होता त्याला अहिंसक मार्गाने मोकळे करण्यासाठी समस्त भारतीयांना एक नेतृत्व मिळालंय.

हे बंध रेशमाचे

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 09/04/2012 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी चिवचिवत येणार्‍या चिमण्या हा माझ्या आयुष्याचा एक भागच झाला आहे. सकाळी बाहेरच्या खोलीचे काचेचे दरवाजे सरकावायला जरा उशीर झाला तर बाहेर आवाज सुरू झालेला असतो. दारं उघडायची खोटी. चिवचिवाटाने जणु ’सुप्रभात’ करत चिमण्या आंत शिरतात. छज्जावर तांदुळ टाकले की प्रथम आपल्या थव्यातील इतर चिमण्यांना साद घालणार आणि मग एकेक दाणा टिपायला सुरुवात. एकिकडे चिवचिवाट सुरुच असतो. अनेक वर्षे हे नियमितपणे होत असल्याने आता सरावाने मला साधारण तीन प्रकारचे बोल लक्षात येउ लागले आहेत.