Skip to main content

लेख

मनाचिये गुंती..

लेखक यशोधरा यांनी मंगळवार, 22/01/2013 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनाचा अनादि, अनंत प्रवाह, त्यातून तुमच्या आमच्या ओंजळीत येणारे काही क्षण. कधी रेशीमलडींसारख्या उलगडणार्‍या तर कधी धारदार पात्यासारख्या लखलखणार्‍या जाणिवा. अवतीभवतीच्या जगातले आपणच लोक आपापल्या परीनं एकमेकांची सुखदु:खं वाटून घेत असतो, साथसंगत करत असतो, नातीगोती जपायचा मनापासून प्रयत्न करत असतो.

मेसोअमेरिका (६.१) - आस्तेक

लेखक किलमाऊस्की यांनी शुक्रवार, 18/01/2013 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग : "मेसोअमेरिका(६) - आस्तेक " २५ फेब्रुवारी १९७८ ची मध्यरात्र. मेक्सिको सिटी नगरपालिकेच्या वीज कामगारांचं नेहमीप्रमणे खोदकाम चालू होतं. 'झोकालो'(१) च्या आसपास खोदकाम करता करता अचानक २ मीटर खोल अंतरावर सुमारे ८ टन वजनाचा अतिशय सुंदर कोरीवकाम केलेला दगड कामगारांना सापडला. त्यानंतर लगोलग मेक्सिको सिटी आणि आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात उत्खनन चालू झालं आणि यातूनच आस्तेकांबद्द्लची बरीच माहिती उजेडात आली. हा शोध फक्त मेसोअमेरिकाचं नव्हे तर जागतिक पुरातत्त्वक्षेत्रात अतिशय महत्त्वाचा मानला जातो.

रक्तामधील घटकांचे आणि रक्ताभिसरणाचे नियंत्रण

लेखक आनंद घारे यांनी मंगळवार, 15/01/2013 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
शरीरामधल्या रक्ताची विविध प्रकाराने तपासणी करून आणि रक्तदाब, नाडीचे ठोके वगैरे अनेक गोष्टींचा अभ्यास करून त्याचा उपयोग रोग्याच्या शरीराची अवस्था समजून घेण्यासाठी आणि त्याच्या व्याधीचे निदान करण्यासाठी केला जातो. हे करतांना त्याच्या रक्तामध्ये काही दोष किंवा तृटी आढळल्या तर त्यावर औषधोपचार करतात. काही बाबतीत रक्ताच्या तपासणीमध्ये सगळे काही व्यवस्थित निघाले तरी व्याधीच्या निवारणीसाठी त्याच्या गुणधर्मांमध्ये थोडा बदल करणारी औषधयोजना केली जाते.

मेसोअमेरिका(६) - आस्तेक

लेखक किलमाऊस्की यांनी रविवार, 13/01/2013 06:57 या दिवशी प्रकाशित केले.
छोट्या विश्रांतीनंतर मेसोअमेरिका पुन्हा तुमच्या भेटीला येत आहे. या मालिकेतील मागचा भाग - मेसोअमेरिका(५) - तोल्तेक(Artisan) *** सन १५१९. नवीन प्रदेशाच्या शोधार्थ निघालेल्या धाडसी स्पॅनिश सैनिकांनी आपल्या क्युबन वसाहतीतून मेक्सिकोच्या दिशेने कूच करण्यास प्रारंभ केला. या सैन्याने Popocatepetl पर्वताच्या बर्फाच्छादीत रांगा ओलांडताच क्षणी त्यांना समोर अद्भभूत नजारा दिसू लागला. छोट्या छोट्या तलावांच्या आसपास बांधलेल्या आखीवरेखीव वसाहती, त्यांना मधूनचं छेदणारे रस्ते, छोटी छोटी तळी आणि त्यावर बांधलेले पूल.

हरवला आहे...

लेखक रविंद्र रुपन् यांनी मंगळवार, 08/01/2013 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
शासनसंस्था, विद्यापीठे,कुटुंबसंस्था आणि ह्या सगळ्यातून उद्भवलेली एक राक्षसी महत्त्वाकांक्षा ह्यांनी प्रयत्नपूर्वक आपल्या प्रत्येकात दडलेल्या रॅंछोला पार पाताळात दडपून टाकले आहे. त्याला आपण कधी शोधणार?
साऱ्या आयुष्याचा घोळ झाला आहे. कशाचाच अर्थ लागत नाही. चांगली कचकचून भूक लागलेली असावी. समोर वाफाळलेल्या नूडल्सची प्लेट यावी अन् कुणी आपल्याला सांगावे की तुला ते खाता येतील, पण एका शर्तीवर. ह्यातील एकेक नूडल वेगळी करून, काट्याभोवती लपेटून किंवा काड्यांनी वेचून खायची. नूडलचे एक टोक आपल्यासमोर, दुसरे कुठे आहे कळतच नाही. वेळ वाया जातो आहे, काय करावे सुचतच नाही.

आमची पहिली गाडी

लेखक पैसा यांनी मंगळवार, 08/01/2013 00:54 या दिवशी प्रकाशित केले.
आमची पहिली गाडी झालं असं की घराचे सगळे पैसे देऊन झाले आणि हप्ते पण सुरू झाले. काही दिवसांनी हातात थोडे पैसे खुळखुळायला लागले. तोपर्यंत घरात दोनाचे चार मेंबर्स झाले होते आणि जबाबदार पालकांप्रमाणे स्कूटरवरून दोन मुलांना घेऊन जाणे किती धोक्याचे आहे वगैरे विचार आपोआप डोक्यात यायला लागले. मग मी आणि माझा नवरा याच्या तार्किक शेवटाकडे पोचलो, ते म्हणजे आपल्याला एक चारचाकी गाडी घ्यायला पाहिजे. संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी. नवरा लगेच ड्रायव्हिंग शिकायला ड्रायव्हिंग स्कूलमधे जायला लागला. ड्रायव्हिंगच्या बाबतीत माझा आधीपासूनच आनंद! एक बारीकशी सनी होती तीही तोपर्यंत गंजून जाऊन विकून झाली होती.

स्वप्नातल्या देशा

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 01/01/2013 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
"सपने मे देखा एक सपना, वो जो है ना अमिताभ अपना..............." ऐकत होतो आणि खरोखरच अमिताभ आला. सुरुवातीच्या चहापाण्याच्या चार गप्पा झाल्यावर (म्हणजे फक्त गप्पाच झाल्या. पुणेकर आहे म्हटले मी. साले लोक न बोलावता घरी येणार वर यांच्यासाठी चहा करा हे कोणी सांगितले आहे?" ) अमिताभन्ने चाचरत मुद्द्याला हात घातला. पिक्चर काढतो आहे म्हणाला. मला हिरो होण्यासाठी गळ घालत होता. आधी ष्टोरी विचारायच्या बेतात होतो पण मग साशंक मनाने आधी उरलेली स्टारकास्टच विचारली. तर म्हणाला तुम्ही हिरो, अभिषेक साइड हिरो, ऐश्वर्या हिरोइन, जया तुमच्या आईचा रोल करेल आणी मी खलनायक. नाही म्हणले तरी मला ठसका लागला.