Skip to main content

लेख

दिंडी (गूढकथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी रविवार, 18/09/2022 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
दिंडी (गूढकथा) दिंडी संथ गतीने पुढे सरकत होती. मध्यरात्र उलटून गेली होती. तरी दिंडीचे मार्गक्रमण सुरूच होते. खरेतर आता कुठेतरी सगळ्यांनी मुक्कामाला थांबायला हवे होते. पण आमच्या सगळ्यांच्या अंगात कोणते बळ आले होते कोणास ठाऊक, पण आम्ही पुढे चालतच होतो. पन्नास साठ माणसांचा आमचा समूह, गेल्या बारा - तेरा दिवसांपासून असेच पुढे पुढे जात होतो. मुक्काम पडत होते. जागोजागी आमचे पाल पडत होते. रोज अनेक मैल अंतर आम्ही कमी करत होतो.                 पण आज आम्ही कुठेच मुक्काम केला नाही.

पुणे मिपाकट्टा सप्टेंबर २०२२ वृत्तांत: मिपाकट्टा संपन्न झाला

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 17/09/2022 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज दिनांक : १७ सप्टेंबर, शनिवार रोजी सकाळी १० ते दु. २ च्या दरम्यान ठिकाण पाताळेश्वर लेणी, जंगली महाराज मंदिराशेजारी, जंगली महाराज रोड, शिवाजी नगर, पुणे - 411005 येथे अत्यंत उत्साहात साजरा झाला. एकूण सतरा (१७) मिपाकर, मिपा मालकांसहीत उपस्थित होते. त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.

रॉजर फेडरर- एक संयमी झंझावात

लेखक वझेबुवा यांनी शनिवार, 17/09/2022 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
अवघ्या टेनिस विश्वाला भुरळ पाडणारा नजाकतदार खेळाडू. गेल्या २० वर्षांत, जे लोक नियमित टेनिस पाहतात किंवा जे लोक केवळ ग्रँडस्लॅम पाहतात त्यापैकी बहुतांश लोकांचा आवडता खेळाडू कोण असे विचारल्यास नक्कीच फेडरर हे उत्तर मिळेल. पीट सॅम्प्रस चं लयाला जाणार साम्राज्य याने बळकावले आणि हा टेनिस जगताचा नवीन सम्राट म्हणून उदयास आला. आधी विम्बल्डन बॉईज मध्ये विजेतेपद नंतर मुख्य विम्बल्डन मध्ये सेमीफायनलला सॅम्प्रसला हरवून हा प्रेक्षकांना खुणावू लागला. आणि मग पुढील वर्षी विजेतेपद पटकावल्यावर याने मागे वळून पाहिलेच नाही.

परिचित, तरीही अपरिचित ‘दख्खन’

लेखक पराग१२२६३ यांनी शुक्रवार, 16/09/2022 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
दख्खन दररोज मुंबई-पुणे-मुंबई अशा फेऱ्या मारून सुमारे 3,000 प्रवाशांची ने-आण करत असली तरी तिच्या कारकिर्दीची दखल क्वचितच कोणी घेतली असेल. इतकंच काय तिचा वाढदिवसही कधी असतो, हेसुद्धा कुणाला माहीत नाही. त्यासंबंधीचा अधिकृत पुरावाही सापडत नाही. दख्खनच्या राणीच्या अगदी उलट परिस्थिती आहे ही सगळी.

गडकरींनी पुण्यात केले 'हे' वक्तव्य... खड्ड्यात वाहन गेले की...

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 14/09/2022 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे वार्ताहर: दि. १४ सप्टेंबर. रस्त्यातील असलेले खड्डे दुरुस्ती करणे किंवा त्या जागी नवे रस्ते करणे सरकारला लगेचच अशक्य आहे. भारतावर चीन ने राज्य केले तरच ते शक्य आहे. अशा परिस्थितीत रस्त्यांत असलेले खड्डेच वाहनचालकांच्या मदतीस येतील, कारण असल्या खड्ड्यांतूनच वीजनिर्मिती भविष्यात करू अशी घोषणा रस्ते वाहतूक मंत्री श्री. गडकरी यांनी काल पुण्यात केली. गणपती विसर्जन झाल्यानंतर आलेल्या पावसाच्या पुराची पाहणी पुण्यात केल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलत होते. ही परिषद रात्री ११ वाजता शासकीय विश्रामगृहात झाली. गडकरी पुढे म्हणाले की, रस्त्यांवरील खड्डे हे आपले मित्रच आहेत. त्यांना वैरी संबोधू नका.

ऐक..दरवाजा उघडू नकोस! (गूढकथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी सोमवार, 12/09/2022 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
ऐक.. दरवाजा उघडू नकोस! (गूढकथा) सायंकाळचा संधिप्रकाश आता, गडद जाणवायला लागला होता. अंधाराच्या छटा आता, अवतीभोवती विखुरल्या जात होत्या. त्या अंधाराच्या गडद छायेत एक एक वस्तू, अदृश्य होत होती. शेवटच्या गल्लीतला सगळ्यात पाठीमागचा तेरा नंबरचा बंगला, जो गल्लीच्या एकदम मागच्या टोकाला होता, तोही आता या अंधारात दिसेनासा झाला होता. जसा जसा अंधार वर चढू लागला, तसतशी भीती संथ गतीने माझ्या अंतर्मनात शिरत होती. या अशा बंगल्यात मी एकटीच होते.अगदी एकटीच.

सायन्स फिक्शन - तिकडची आणि इथली

लेखक अनुनाद यांनी रविवार, 04/09/2022 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. नारायण धारप ह्यांच्यावर भयकथा लेखक हा शिक्का बसला आणि मराठीमधे अतिशय उत्कृष्ट व काळाच्या पुढच्या विज्ञानकथा लिहीणाऱ्या लेखकाची ही बाजू वाचकांसमोर कधीही आली नाही. मराठीत विज्ञानकथा रुजली नाही याला लेखकाची प्रतिभा नव्हे तर वाचकांचं अज्ञान कारणीभूत होतं. कौटुंबिक सिरीयल्सचा तोच तो चोथा चघळणारे प्रेक्षक आणि जीर्णशीर्ण लव्हस्टोरीज पलिकडे न जाणारं बाॅलिवूड यामुळे मायदेशात सायन्सफिक्शन रूळली नाही पण तरीही धारप लिहीतच राहीले... X-men (मालिकेतील पहीला चित्रपट) जुलै २००० मधे release झाला.

गेले ऐकायचे राहून

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी सोमवार, 29/08/2022 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी फिरायला जातो ते महात्मा सोसायटीजवळ असलेल्या डीपी रोडपर्यंत. तिथे रस्त्यावर दामलेकाकांची एक मोफत व ओपन लायब्ररी आहे. लोक पुस्तके नेतात व आणतात. अनेकांनी पुस्तके भेटही दिली आहेत. काही जण उपक्रमासाठी स्वयंसेवक म्हणूनही मदत करतात. दामले काका जगन्मित्र व नर्मदा परिक्रमा केलेले. त्यामुळे ग्रंथालायचे नाव ही नर्मदे हर! मी थोडावेळ गप्पा मारायचो. माझे यंदा कर्तव्य आहे हे पुस्तक ही ग्रंथालयाला भेट दिले.मग गप्पांमधून त्यांना व तेथील स्वयंसेवकांना, माझ्या व्यत्किमत्वाचा परिचय होत गेला. शिरिष नावाचे एक गृहस्थ माझे बोलणे लक्षपूर्वक ऐकायचे.पण त्यांच्या बोलण्यात मला अस्वस्थता जाणवायची.

कुठ्ठे कुठ्ठे म्हणून न नेण्याच्या लायकीचा माणूस !

लेखक रामदास यांनी शनिवार, 27/08/2022 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
बायोलॉजीत जसे स्पेसिज-फायलम-सब फायलम असं वर्गीकरण असतं तसेच सेवानिवृत्त काकांचे फायलम असतात.त्यापैकी सहज आढळणारा म्हणजे - फायलम पासबुकीया ! या फायलममधले काका विविध देशी-विदेशी -सहकारी नागरी बँकांची पासबुकं सक्काळपासून अपडेट करण्यासाठी फिरत असतात. म्हणजे त्यांच्या खात्यात पैशाचा पूर आलाय वगैरे असं काहीच नसतं. दोन चार लाभांश-एखादा अ‍ॅन्युइटी प्लॅन - मासिक व्याज इतकंच काय ते जमा होत असतं पण त्यानिमित्ताने 'मेरीआवाज सुनो'हा कार्यक्रम त्यांना करता येतो. या पासबुकीयांच्या छळवादाला कंटाळून बँकानी पासबुकं छापायचं मशिन लावल्याची अशीही एक अफवा आर्थिक जगतात आहे.

नाते प्राजक्ताचे

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 10/08/2022 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळपासून पावसाची रिपरिप चालू आहे. श्रावणातला पाऊस तो हत्ती सारखा थोडाच कोसळणार. दररोजची प्रभातफेरी चुकली. येताना देवपूजेला फूले घेऊन येण्याचा नित्यनेम. लाईट नव्हती, पाच माळे उतरून खाली जावे की न जावे द्विधा मनस्थितीत. नित्यनेम चुकला की दिवसभर रुखरुख लागते. त्यापासून वाचण्यासाठी खाली उतरायचे ठरवले. विचारमग्न अवस्थेतच पाचव्या मजल्यावरून खाली आलो,छत्री विसरल्याचे लक्षात आले. अरे देवा! आता पुन्हा पाचा वर जावून शून्यावर यायचे.जाऊ द्या थोडं भिजल्याने काय होणार आहे ?