Skip to main content

लेख

मेरा कुछ सामान …

लेखक भावना कल्लोळ यांनी गुरुवार, 02/05/2013 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
संकल्पना : इज्ज़ाज़त सिनेमा मधील " मेरा कुछ सामान " या गीतावरून आली आहे. आज राज घरी एकटाच होता. रजनीशी फारकत घेऊन चार दिवसच झाले होते. आयशा हि सध्या त्याच्याच घरी राहण्यास आली होती. आयशा सह कर्मचारी राजची. पण काही दिवसातच दोघाचे सुत जमले आणि तेरा वर्षाचा राज आणि रजनीचा संसार पत्या सारखा विखुरला. आयशाने घरी येताच रजनीचे जे काही सामान होते ते तिच्या घरी पाठवायला सांगितले राजला. वरतून अशी ताकीद हि कि जेव्हा मी ४ दिवसात पुण्यावरून परत येईन तेव्हा रजनीचा साधा रुमाल हि मला घरात नको आहे. झाले हि तसेच. आयशा ने जसे सांगितले तसे राज ने रजनीचे सर्व सामान पाठवून दिले. आज तो घरी एकटाच होता.

आज हुतात्मा प्रफुल्लचंद्र चाकीचा १०५ वा हौतात्म्यदिन

लेखक सर्वसाक्षी यांनी गुरुवार, 02/05/2013 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
आज दिनांक २ मे, आज हुतात्मा प्रफ़ुल्लचंद्र चाकीचा १०५ वा हौतात्म्यदिन. प्रफुल्ल चाकीचा जन्म पूर्व बंगालच्या बगुडा जिल्ह्यातील रंगपूर गावचा. पितृछत्र बालपणीच हरवलेला प्रफ़ुल्लचंद्र शालेय जीवनात देशकार्याकडे आकर्षित झाला आणि त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले. पुढे क्रांतिकारकांशी ओळख हो‌ऊन प्रफुल्ल बरिंद्रनाथ व अरविंद घोष यांच्या ’युगांतर’ मध्ये सामील झाला. आपले आयुष्य त्याने देशाला वाहायचे ठरविले होते. युगांतर मध्ये त्याने भाग घेतलेली पहिली मोठी कामगिरी म्हणजे बॅम्फिल्ड फुलर या जुलुमी अधिकाऱ्याच्या वधाचा कट.

क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग १

लेखक किलमाऊस्की यांनी बुधवार, 01/05/2013 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
इसवी सन १५०० च्या आसपास युरोपात सत्ता काबीज केल्यावर रशियनांनी अतिपुर्वेला सैबेरियाच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. सैबेरिया काबीज करून पुढे अमेरिका खंडात प्रवेश करायाचा त्यांचा इरादा होता. सैबेरियाच्या दिशेने प्रवास करता करता आशिया खंडाच्या पॅसिफीक किनार्‍यावर त्यांचं लक्ष गेलं. यातूनच सैबेरिया व उत्तर अमेरिका जोडण्याची कल्पना तत्कालीन रशियन राज्यकर्ता 'पिटर द ग्रेट' याच्या डोक्यात आली. या कल्पनेला कितपत मूर्त स्वरूप देता येईल याची शाहनिशा करण्याकरीता त्याने रशियन नेवीतील डॅनिश ऑफिसर Vitus Bering (१) याला मोहीमेवर रवाना केलं.

युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग २

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 01/05/2013 08:12 या दिवशी प्रकाशित केले.
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग १ Simple, Free Image and File Hosting at MediaFire

टोरा ! टोरा ! टोरा ! अर्थात पर्ल हार्बर-२

पर्ल हार्बरवर हल्ला चढवायची मूळ कल्पना जपानच्या विमानदल व नौदलाच्या एकत्रीत दलाचा कमांडर-इन-चीफ ॲडमिरल इसोरोकू यामामोटो याची.

युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग १

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 29/04/2013 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire मित्रहो, आजपासून युद्धकथेच्या मालिकेत सातवे पुष्प गुंफत आहे...............हा लेख बराच मोठा असणार आहे कारण पर्ल हार्बरची पूर्ण कहाणी सांगायचा विचार आहे....आपल्या शंकांना मी उत्तरे सगळ्यात शेवटी देईन-अर्थात मला माहीत असली तर......आजचा भाग छोटा आहे कारण बाण सुटला आहे............त्या बाणाच्या प्रवासाची ही कहाणी मला तरी रोमांचकारक वाटली......आपल्यालाही ती तशी वाटेल अशी आशा आहे..........

एक सिगारेट पिणारी मुलगी

लेखक तुमचा अभिषेक यांनी रविवार, 28/04/2013 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
आज ती दिसली.. जवळपास तीन-साडेतीन वर्षांनी.. ट्रेनमध्ये, जरा दूरच्याच सीटवर बसलेली.. मला ती दिसत होती, म्हणजे ती देखील मला बघू शकत असणार.. बस्स, अजून तिचे लक्ष गेले नव्हते माझ्याकडे.. पण गेले तरी ओळखेल का..? का, नाही ओळखणार..? मी नाही का ओळखले तिला..? तसा फारसा बदल ही झाला नव्हता तिच्यात.. माझ्यात तरी कुठे फारसा झाला होता.. बस्स, बर्‍याच काही घडामोडी घडल्या होत्या आयुष्यात.. या गेल्या तीन-साडेतीन वर्षांत.. वाशीवरून वी.टी.ला जाणारी ट्रेन पकडली. बायकोबरोबर तिच्या माहेरहून परतत होतो. रविवारची संध्याकाळ अन फर्स्टक्लासचा डब्बा. गर्दी नेहमीपेक्षा तशी कमीच.

अव्यक्त…

लेखक मेघनाद यांनी शनिवार, 27/04/2013 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
ललित लिहीण्यासारख काहीस करण्याचा पहिलाच प्रयत्न आहे, माहित नाही कसा झाला आहे. जाणकारांनी समजून घ्यावे व जे चुकले असेल राहून गेले असेल ते समजवावे……. मेघनाद… --------------------------------------------------------------------------------- कोकणातलं घर पण अगदी जुन्या पद्धतीच म्हणजे मातीच्या भिंतीचं किंवा शेणाने सारवलेल्या जमिनींच नव्हत, तर व्यवस्थित रंगवलेल, पांढरी-काळी फरशी असलेलं आणि ऐसपैस जागा असलेल अस. ह्या घरामध्ये बरीच धामधूम सुरु होती कारण होते ते त्या घरातील मोठ्या मुलाच दोन दिवसात होणार असलेल लग्न.

शिलाहारांचा कोप्पेश्वर-भाग ३

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 22/04/2013 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire अनेक वर्षे म्हणजे जवळजवळ ९०० वर्षे झाली हे देऊळ निसर्गाशी संघर्ष करत उभे आहे. उन, पाऊस, वारा, तापमानाचे चढउतार या सगळ्याशी टक्कर देत या देवळाचा गाभा (स्ट्रक्चर) अजुनही सुस्थितीत आहे. त्याचे आरेखन ज्या वास्तुविशारदाने केले आहे आहे त्याला मानावेच लागेल. ९०० वर्षात हे देऊळ गळत नाही ना कृष्णेच्या पाण्याने याला काही झाले.

शिलाहारांचे कोप्पेश्वर मंदीर......भाग-२

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 21/04/2013 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
शिलाहारांचे कोप्पेश्वर मंदीर......भाग-१ सिंघण यादवाने देवेगिरीला गेल्यावर शिलाहारांचे राज्य आपल्या राज्याला जोडले. सिंघण यादवांच्या काही शिलालेखात सर्परुपी भोजाला गरुडाने म्हणजे सिंघणाने पकडले असा उल्लेख आहे. त्याने कोपेश्वरच्या देवळाच्या चरितार्थाची सोय लावली मात्र ते पूर्ण करण्यास आर्थिक मदत केली नाही व ते बांधकाम अर्धवट पडले. नंतरच्या काळात केव्हातरी स्थानिक जनतेने देवळावर शिखर उभे केले पण ते मूळ देवळाशी अत्यंत विसंगत दिसते. पण एवढे काही वाईट नाही.

अंड्याचे फंडे ६ - शॉपिंग मॉल

लेखक साळसकर यांनी रविवार, 21/04/2013 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
अंड्याने तिसर्‍यांदा पलटून पाहिले. अन खात्री केली की ती पुतळाबाईच आहे. फसलोच जरा, पण अंड्याची फसायची ही काही पहिलीच वेळ नव्हती. बरेचदा असे होते ना, मोठमोठ्या मॉलमध्ये फिरताना, कृत्रिम चेहर्‍यांच्या गर्दीमध्ये, एखादा टवटवीत चेहरा उठून दिसावा. आपला चेहरा हरखून यावा, पण निरखून पाहता तो कपड्यांचे प्रदर्शन मांडण्याकरता उभारलेला मानवी पुतळा निघावा.