Skip to main content

लेख

अजंठा ...........भाग-५

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 19/03/2014 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire अजंठा ...........भाग-१ अजंठा ...........भाग-२ अजंठा ...........भाग-३ अजंठा ...........भाग-४ मागील भागात पाहिलेल्या शडदंत जातकानंतर अत्यंत पडझड झालेले महाकपिजातकाची चित्रमा

माझं कोकणातलं गांव :- भाग-४ (परतीचा प्रवास)

लेखक प्रमोद देर्देकर यांनी बुधवार, 19/03/2014 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
माझं कोकणातलं गांव :- भाग - ३ मागील भागात>> घरी येता येईतो चांगलाच अंधार पडलेला असायचा. दिवे लागणी झाली कि मग पर्वचं वगैरे होवुन गाण्याच्या भेंड्या, पत्ते खेळणं असा सगळा वेळ जायचा. तिथुन पुढे >> कधी दुपारी मी आणि काका घराजवळच्या हौदात पन्हाळीला पिण्याचे पाणी येत नाही म्हणुन जिथुन पाणी येतं तिथपर्यंत पर्‍यात पाट साफ करत जायचो. हा पर्‍या गणपतीच्या देवळाकडे जाताना जो पर्‍या लागतो तोच पण त्याच्या थोडं वरती जावं लागतं. तिकडे जायला वेगळी एकेरी पाऊलवाट आहे. वाटेत भरपुर दगड धोंडे आहेत.

ती आणि तिचा भाऊ

लेखक kurlekaar यांनी मंगळवार, 18/03/2014 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
ती आणि तिचा भाऊ (ही लघुकथा ‘आश्लेषा’ च्या २०१३ च्या दिवाळी अंकांत प्रकाशित झाली होती) .....अचानक समोर तिला तिच्या ओळखीची परी दिसली.—घामाघूम व धोडीशी घाबरलेली. “अगं, तुझा भाऊ वर आलाय, मी किती वेळ शोधत्येय तुला सांगायला”. “काय?” ती किंचाळली. “पण हे कसं शक्य आहे? मी तर त्याला गेल्याच पक्षात पृथ्विदर्शन वर पाह्यलं होतं”. हातांतली फुलं तिने परीकडे सोपवली व ती सुसाट निघाली. “अगं पण तो कुठे आहे हे तरी सांगूदे मला”, परी म्हणाली. “कांही आवश्यकता नाही, मला कल्पना आहे, आणि तिथं तो नसला तर त्याला शोधून काढेनच की मी” ती जाताजाता ओरडली.

पापभीरू

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी सोमवार, 17/03/2014 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
एका वृत्तवाहिनीवर अत्यंत गंभीर चेहरा करून तावातावाने एक वृत्तनिवेदक राष्ट्रकुल स्पर्धा म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनात सुरु असलेल्या घोटाळ्याबद्दल बोलत होता आणि आयोजनासाठी जबाबदार असलेल्या एका राजकारणी व्यक्ती आणि त्याचे सहकारी-कम्-चमचे यांच्यावर, झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल पुराव्यांसकट आरोपांवर आरोप करत सुटला होता.

संस्कारनगरी वडोदरा

लेखक संतोषएकांडे यांनी रविवार, 16/03/2014 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी मोदक यांचा वडोदरा (बडोदा) प्रवासाचा लेख मिपावर आला होता. वडोदरा बद्दल ओढ असणारे बरेचशे मिपाकर त्या लेखाच्या प्रतिक्रीयेत दिसले. म्हणूनच वडोदराची जवळून ओळख करून देण्यासाठी हा लेख. संस्कारनगरी,विध्यानगरी,साहित्यनगरी किंवा कलानगरी अशी विश्वात कीर्ती मिळवून देण्याबद्दल वडोदरा संस्थान श्रीमंत सयाजीराव गायकवाड ३रे यांचं सदैव ऋणी आहे. स्वातंत्र्याआधी वडोदरा संस्थान निझामाच्या हैद्राबादा नंतर भारताचं दूसरं भव्य राज्य होतं. तरीही वडोदराला इंग्रजां कडून जास्तच महत्व मिळालं होतं. श्रीमंतांनी बरीचशी स्थापत्य व महालांचं राज्यात निर्माण केलं.

कारट्या ची शाळा एडमिशन . (ललित लेख )

लेखक राजघराणं यांनी सोमवार, 10/03/2014 01:16 या दिवशी प्रकाशित केले.
कारट्या ची शाळा एडमिशन . (ललित लेख ) आमचे चिरंजीव श्री राजवीर दिक्षित नुकतेच तीन वर्षाचे होतील. तवा साहेबांच्या शाळा प्रवेशासाठी गेला आठवडाभर मिशन हाती घेतले होते. आमचे शिक्षण सरकारी शाळेत झालेले - पाच रुपये फी वाल्या . पण पोराला इंटरनेशनल अभ्यासक्रमाच्या शाळेत टाकायचं असा निश्चय केला . बांद्रे सांताक्रूझ च्या शांळाची चौकशी सुरु केली . फार माहिती नेट वर नाही . मग सुजाण पालक या नात्याने मी , बायको आणि चिरंजीव असे तिघे शाळा शोधत फिरू लागलो . शेवटी बर्याच चौकशी अंती सान्ताक्रुझ पश्चिम येथील एका प्रथित यश शाळेकडे काल मोर्चा वळवला . पूर्ण रस्ता भर आमची पत्नी पढवत होती .

डोंबिवली कट्टा ०२ मार्च वृत्तांत

लेखक सुबोध खरे यांनी सोमवार, 03/03/2014 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
काल दि ०२ मार्च रोजी डोंबिवली ( मध्यवर्ती ठिकाण -मुवि ) येथे हॉटेल नंदी पैलेस या ठिकाणी मिपा कट्टा संपन्न झाला. मुळात मला घारापुरी कट्ट्याला येता न आल्याची खंत होतिच म्हणून हा कट्टा करायचाच हे मी ठरवले होते. माझ्या मुलाची बारावीची परीक्षा असल्याने मला थोडासा उशीर झाला.( मी त्याचा अजून अभ्यास घेतो हे मला आनंदाने नमूद करावेसे वाटते). मुवि आणि बाकी सर्व जण साडे सात वाजता तेथे पोहोचले आणि जागा राखून ठेवलेली होती. त्यामुळे मी पोहोचे पर्यंत समारंभाला सुरुवात झालेली होती. आजचे आपले पाहुणे श्री दीपक कुवेत ते पण पोहोचलेले होते. माझी कल्पना अशी होती के हे कोणीतरी मध्यम वयीन सद्गृहस्थ असावेत.

अजंठा ...........भाग-३

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 03/03/2014 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire अजंठा ...........भाग-१ अजंठा ...........भाग-२ या भागात आपण अजंठाची चित्रे कशी केली असतील व त्या चित्रांच्या संवर्धनासाठी आत्तापर्यंत काय काय प्रयत्न केले गेले, त्यात मूळ रंग कसे बरबाद झाले इत्यादि घटनांची माहिती घेऊ.... विष्णोधर्मोत्तरम् या ग्रंथाच्या चाळीसाव्या प्रकर