Skip to main content

लेख

थोडे अद्भुत थोडे गूढ - ९

लेखक स्पार्टाकस यांनी रविवार, 14/09/2014 00:54 या दिवशी प्रकाशित केले.
रशियाच्या पश्चिम भागात दक्षिणोत्तर पसरलेली एक लांबलचक पर्वतराजी आहे. उरल! उरल नदीच्या खोर्‍यापासून आणि कझाकस्तानच्या वायव्य प्रांतापासून ते पार आर्क्टीक समुद्रापर्यंत पसरलेली उरल पर्वतरांग सुमारे १६०० मैल पसरलेली आहे. आर्क्टीक, सब-आर्क्टीक, उत्तर, मध्य आणि दक्षिण असे उरल पर्वताचे पाच भाग पडतात. उरल पर्वतरांग ही आशिया आणि युरोप यांना विभागणारी नैसर्गीक सीमारेषा मानली जाते. भारतीय उपखंडात जे स्थान हिमालय पर्वताचं, तेच रशियात उरल पर्वतराजीचं! उरल पर्वतात गिर्यारोहणाच्या अनेक मोहीमा नियमीतपणे आखल्या जातात.

मोझाम्बिकची निवडणूकः १

लेखक आतिवास यांनी शनिवार, 13/09/2014 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
१५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात होणारी निवडणूक मला अनुभवता येणार नाही. पण त्यामुळे फारसं बिघडणार नाही असं आज तरी वाटतंय. कारण सध्या मी जिथं राहतेय त्या ठिकाणीही निवडणुकीची जोरदार हवा आहे. आणि काय योगायोग असेल तो असो, इथलं मतदानही १५ ऑक्टोबर रोजीच आहे. मी लिहिते आहे ‘मोझाम्बिक’ बद्दल. मोझाम्बिकला यायची माझी तयारी ‘हा देश नेमका आहे कुठं’ हे शोधण्यापासून झाली.

थोडे अद्भुत थोडे गूढ - ८

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 11/09/2014 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
भारतातील बहुतेक सर्व राज्यांवर निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केली आहे. काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून ते अरुणाचलपर्यंत पसरलेल्या या देशात निसर्गाचे अनेक अविष्कार पाहण्यास मिळतात. अनेक उत्तुंग पर्वतराजी, शेकडो मैलांचा सागरकिनारा, रखरखीत वाळवंट, सदाहरीत जंगले आणि अतिवृष्टीचे प्रदेश अशी निसर्गाची अनेक रुपं इथे अनुभवण्यास मिळतात. भारतीय उपखंडाचा मुकुटमणी म्हणजे नगाधिराज हिमालय! भारतीय टॅक्टॉनिक प्लेट आणि युरेशियन प्लेट यांच्यातील प्राचीन काळात झालेल्या घर्षणामुळे हिमालयाची निर्मीती झाली.

थोडे अद्भुत थोडे गूढ - ७

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 10/09/2014 07:48 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तर अटलांटीक महासागरातील आणि युरोपातील सर्वात मोठं बेट म्हणजे ग्रेट ब्रिटन! युनायटेड किंगडम या नावाने ओळखला जाणारा हा प्रदेश हा मूलत: इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड या चार स्वतंत्र देशांचा बनलेला आहे. या चारही देशांनी एकत्रं येऊनही आपापल्या परंपरा आणि चालीरिती जाणिवपूर्वक वेगळ्या जपलेल्या आहेत.

कोकणातली भुतं

लेखक कल्पतरू यांनी रविवार, 07/09/2014 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
कोकण, या नावात भरपूर काही साठवलय. त्या महासागरांच्या पोटात ज्या गोष्टी दडल्यात ना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त गोष्टी आमच्या कोंकणात आणि इथल्या माणसांमध्ये दडल्यात. आता कोकण म्हणजे नदी नाले डोंगर दऱ्या हे सगळं आलंच पण या सगळ्याबरोबर एक इनबिल्ट गोष्टंसुद्धा येते ती म्हणजे कोकणातली भूतं. लहानपण गेलं ते यांच्या गोष्टी ऐकण्यातच आणि अनुभवण्यातपण त्यातलेच काही मोजके गमतीदार किस्से खाली दिलेत. रात्रीची वेळ होती आणि अचानक वीज गेली. आता कोकणात पाऊस कधी पडेल आणि वीज कधी जाईल याचा काही भरवसा नसतो. तर उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे लगेचच घामाच्या धारा लागल्या.

आठवणी

लेखक कल्पतरू यांनी रविवार, 07/09/2014 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
असाच एका संध्याकाळी आपल्या गच्चीवर बसलो होतो. सूर्याचं बहुतेक उत्तरायण सुरु होतं. मी इथे दीड वर्ष होतो. दिवस कसे झपकन निघून गेले समजलंच नाही अगदी त्या बुलेट ट्रेनसारखे. कितीतरी आठवणी आहेत ज्या मनावर कायमच्या कोरल्यात. ७.११.११ सकाळी माझा interview होता. जरासा उशीरच झाला. भरपूर कसरत करून हिंजवडीला पोहचलो. सरांना भेटायचं होतं. समोरच कंपनी दिसत होती. एक कामगार भलं मोठं पोट पुढे काढून त्या भल्या मोठ्या दरवाजात उभा होता. पहिला राउंड सरांनी घेतला, नंतर कंपनी मालकांनी बोलावलं आणि म्हणाले " आमच्याकडे दोन काम आहेत एक म्हणजे project आणि दुसरं म्हणजे panel manufacturing.

थोडे अद्धुत थोडे गूढ - ६

लेखक स्पार्टाकस यांनी रविवार, 07/09/2014 05:42 या दिवशी प्रकाशित केले.
१८५२ सालची गोष्ट.. लंडन शहरातील हाईड पार्क चांगलेच गजबजलेले होते. विविध प्रकारच्या इमारतींचे आणि बांधकामक्षेत्रातील तत्कालीन चमत्कारांचे मोठे प्रदर्शन तिथे भरले होते. अनेक प्रकारच्या बांधकामाचे लहान-मोठ्या आकारातील नमुने तिथे ठेवण्यात आलेले होते. चोखंदळ ब्रिटीश नागरीक प्रत्येक बांधकामाचं चिकीत्सकपणे निरीक्षण करत होते. मात्रं सर्वांची राहून राहून नजर जात होती ती मधोमध करण्यात आलेल्या एक मोठ्या बांधकामावर... १५२ फूट उंचीचा एक लोखंडी टॉवर! प्रदर्शनाला आलेले सर्वजण उत्सुकतेने त्या टॉवरचं निरीक्षण करत होते.

थोडे अद्धुत थोडे गूढ - ५

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 06/09/2014 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरीकेच्या ईशान्येला गल्फ ऑफ मेक्सीकोच्या पलीकडे पसरलेला सागर म्हणजे कॅरेबियन समुद्र. मेक्सीकोच्या उत्तरेकडील किनारा आणि क्युबापासून वेस्ट इंडीज बेटांमधील त्रिनिदादपर्यंत हा पसरलेल्या या सागराच्या किनार्‍यावर अनेक लहानमोठे देश आणि असंख्य बेटं आहेत. पॅसिफीक आणि अटलांटीक महासागरांना जोडणार्‍या पनामा कालव्यातून जहाजं प्रवेश करतात ती याच कॅरेबियन समुद्रात. कॅरेबियन समुद्र ओलांडल्यावर बेटांच्या दरम्यान असलेल्या अनेक मार्गांतून उत्तर अटलांटीक महासागरात प्रवेश करता येतो.

फेसबुकची वचवच- आणि वचावचा करणारं फेसबुक!

लेखक अन्नू यांनी शुक्रवार, 05/09/2014 15:52 या दिवशी प्रकाशित केले.

सध्या सोशल नेटवर्किंगची क्रेझ चालू आहे मग ती ट्वीटरवरची टीवटीव असो नाहीतर, फेसबुकवरची गपशप असो. सगळीकडेच अगदी या साईट्स हातपाय पसरत असलेल्या दिसत आहेत. त्यात ट्वीटरचा विचार केला तर तिथे जास्तकरुन सेलिब्रिटीजचीच टीवटीव आपल्याला ऐकायला येते. सामान्य माणुस मात्र जास्त टीवटीवत नाही, त्यामुळेच कदाचित तो फेसबुकवर पडीक असतो! फेसबुक. म्हणजेच थोडक्यात आपलं- FB ! –यात एक गोष्ट मात्र मला जास्त इंटरेस्टींग वाटते, ती म्हणजे फोटो अपलोडींग आणि टॅगिंग. इथे प्रत्येकजण आपल्या भावना जास्तकरुन वेगवेगळ्या इमेजेसमधून व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो.

परिघ परिक्रमा

लेखक वडापाव यांनी शुक्रवार, 05/09/2014 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
बीजगणित हा माझा आवडता विषय. मला समीकरणांची उत्तरं शोधायची भारी हौस. पण 'डावीकडची बाजू उजवीकडच्या बाजूशी समान आहे हे सिद्ध करा' हा प्रश्न माझा स्वाभिमान दुखवत आलाय, आणि मला नाउमेद करत आलंय, नेहमीच. एकतर ज्या प्रश्नाचं उत्तर मला आधीपासूनच समोर दिसतंय तेच कसंतरी मटका मारून, नाहीतर पुस्तकात छापलेली पद्धत वापरून आपण आणणं अपेक्षित असतं. त्याचं कसलं कौतुक करायचं? आणि समजा ते उत्तर सिद्ध करता येत नसेल, मग तर माझं टाळकंच हटायचं. येत नाही म्हणजे काय! समोर एवढं ढळढळीतपणे दिसतंय म्हणजे यायलाच हवं. आपल्याला आधीपासूनच ठाऊक असलेल्या ठिकाणीच जर जायचं असेल तर प्रवासाचा उत्साह कसा निर्माण करावा माणसानं?