Skip to main content

लेख

भाषा तुझी-ती-माझी

लेखक शिरीष फडके यांनी शुक्रवार, 05/12/2014 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
भाषा तुझी-ती-माझी एका गावातील एक शिक्षक. एके दिवशी शाळा आटपून घरी येतो तर दरवाज्यात / पुढयात एक पत्र. आपल्याला कोण आणि का पत्र लिहिल? आपल्या तर मागे-पुढे कुणी नाही मग चुकुन आपल्या घरात पत्र पोस्टमन काकांनी टाकलं की काय? पण असं कसं होईल? काकांना तर अख्या गावातला कोपरा न कोपरा माहीत आहे मग ते चुकीच्या पत्त्यावर कसे बरे देतील? अशी प्रश्नांची मालिका डोक्यात चालू असताना बाहेर वीज कडाडली आणि तो प्रश्नांच्या जंजाळातून बाहेर आला. जणू काही त्याच्या डोक्यातील वाढत्या प्रश्नांची मालिका खंडित करण्यासाठीच ती वीज कडाडली होती.

शांततेनंतरचं वादळ - Thunder down under

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी गुरुवार, 04/12/2014 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
"We must dig in and get through to tea. And we must play on." भावुक झालेला ऑझी कर्णधार मायकेल क्लार्क आपल्या धाकट्या भावासारख्या सहकार्‍याला श्रद्धांजली वाहत होता. तेव्हा फक्त मॅक्सविलच्या शाळेत उपस्थित ऑझी पंतप्रधान, आजी-माजी क्रिकेटपटू, ह्यूज कुटुंबीय आणि चाहत्यांचेच नाही तर क्रिकेट आवडणार्‍या / नावडणार्‍या जगभरातल्या कुठल्याही सहृदय माणसाचे डोळे पाणावले असतील. २५ नोव्हेंबरपासून सगळं क्रिकेटविश्व हादरलंच होतं. कारणही तसच आक्रीत. आत्तापर्यंत असे शेकडो बाऊन्सर्स टोलवलेला आणि झेललेला फिल ह्यूज सिडनीच्या मैदानावरच एका विचित्र अपघाताने कोसळला.

बिल्डिंग अ स्ट्राँग फाउंडेशन - पायांचे साधे, सोपे व्यायाम

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 02/12/2014 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
बाकी काही लिहीण्या आधी काही डिस्क्लेमर्स देत आहे. लेखन व्यायाम/व्यायामप्रकार विषयक आहे. तरीही, मी व्यायामतद्न्य, प्रशिक्षक इत्यादी नाही. माझ्या कुतुहलजन्य माहितीस मी इथे केवळ मांडत आहे. यास किंचितशी अनुभवाची किनार असली तरी 'स्वानुभवातून सांगतोय' म्हणण्याइतकी नाही. खाली दिलेले काय, किंवा कुठलेही व्यायामप्रकार एक तर स्वतःला सांभाळून, कुवत ओळखून वा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावेत. झालं. तर! आता मुद्द्याकडे वळतो. एक सुरेख क्वोट वाचलं होतं कुठेतरी.

छावणी - १० (अंतिम)

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 01/12/2014 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
छावणी या कादंबरीचा हा अखेरचा भाग. ही कादंबरी प्रकाशीत करु दिल्याबद्दल मी मिसळपाव प्रशासनाचा मनापासून आभारी आहे. हिंदुस्तानची फाळणी ही देशाच्या स्वातंत्र्याची एक भळभळती जखम. आज सत्तर वर्ष होत आली तरीही ही जखम पूर्णपणे भरलेली नाही. फाळणीच्या आगीत जे लोक होरपळले, ज्यांनी आपले आप्तस्वकीय गमावले त्यांना आयुष्यभर तो कालखंड एखाद्या दु:स्वप्नासारखा आठवत राहीला. त्यापैकी बहुतेकजण आज हयात नसले तरीही त्यांनी सांगितलेले अनुभव आजही अंगावर काटा आणतात.

छावणी - ९

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 29/11/2014 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
जथा पुढे निघाला होता! मागे राहीलेल्यांना कायमचे मागे ठेवून. पूर्वीचा उत्साह आता नावालाही शिल्लक नव्हता. वास्तविक मुरीदके इथल्या छावणीत त्यांना दोन दिवस पूर्ण विश्रांती मिळाली होती, परंतु छावणीवर झालेल्या हल्ल्यामुळे जो मानसिक धक्का बसला होता आणि जे आप्तेष्ट गमवावे लागले होते, त्याची कसर कोणत्याही उपायाने भरुन निघणारी नव्हती. आला तो दिवस आपला म्हणत हिंदुस्तानच्या सीमेकडे चालत राहायचं एवढं एकमेव लक्ष्यं प्रत्येकासमोर उरलं होतं.

छावणी - ८

लेखक स्पार्टाकस यांनी शुक्रवार, 28/11/2014 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
छावणीच्या फाटकाच्या दिशेने आलेल्या घोषणा ऐकून सर्वजण काय समजायचे ते समजून चुकले. हल्ला! सर्वत्र धावाधाव पळापळ सुरु झाली. छावणीवर असा अचानक हल्ला होईल अशी कोणालाच कल्पना नव्हती. गुजरानवाला इथून निघाल्यापासून आतापर्यंतची वाटचाल निर्विघ्नपणे पार पडली होती, त्यामुळे सर्वजण काहीसे गाफील राहीले होते. अर्थात आतापर्यंत हल्ला झाला नाही म्हणजे पुढे होणारच नाही याची काही खात्री देता आली नसतीच. हा विचार ध्यानात घेऊन आपण सावध असायला हवं होतं असं प्रत्येकाला वाटून गेलं. पण आता असं वाटून उपयोग नव्हता! आणि सावध असून तरी करणार काय हा यक्षप्रश्न होताच!

छावणी - ७

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 27/11/2014 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
गुजरानवाला इथल्या निर्वासितांच्या छावणीतील पंधरा हजार निर्वासितांपैकी तीन हजारांचा पहिला जथा हिंदुस्तानच्या वाटेला लागला होता! हा जथा हिंदुस्तानात पोहोचवून हिंदुस्तानी लष्कर गुजरानवाला इथे परतलं की दुस्ररा जथा निघणार होता! जास्तीत जास्त पंधरा दिवसात निर्वासितांच्या या जथ्याला हिंदुस्तानच्या सीमेपर्यंत पोहोचवण्यात आपण यशस्वी होऊ असा मेजर चौहानांना विश्वास होता. नियतीच्या मनात काय होतं? सुरवातीला प्रत्येक जण उत्साहात वाटचाल करत होता. आजपर्यंतचं आयुष्य ज्या देशात, ज्या मातीत घालवलं ती सोडून निघावं लागलं होतं याची खंत असली तरी प्रत्येकाला आता आस होती ती एका नवीन भविष्याची, आपल्या देशाची!

छावणी - ६

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 26/11/2014 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
गुजरानवाला इथल्या छावणीतील निर्वासितांमध्ये आता हिंदुस्तानात जाण्याच्या उमेदीने चैतन्यं आलं होतं. हिंदुस्तानात पोहोचल्यावर पुढे काय हा प्रश्न सर्वांपुढे आSS वासून उभा राहणार होता! छावणीत आलेला प्रत्येकजण आपलं घरदार, नोकरी किंवा व्यवसाय पाकीस्तानात सोडून कायमचा हिंदुस्तानात जाण्यासाठी निघणार होता. प्रत्येकाला पुनश्च हरी ॐ म्हणूनच पुन्हा सुरवात करावी लागणार होती. परंतु हिंदुस्तानात पोहोचल्यावर निदान जीवाची सुरक्षीतता तरी लाभणार होती! कोणत्याही क्षणी एखादा धर्मांध माथेफिरू आपल्यावर चाल करुन येईल आणि आपला जीव घेईल ही तरी भीती नव्हती. मेजर चौहाननी या जथ्याची दहा तुकड्यांमध्ये विभागणी केली होती.

छावणी - ५

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 25/11/2014 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
मिर्झा सिकंदरअली खान दर दोन - तीन दिवसांनी आपल्या मित्राची चौकशी करण्यासाठी छावणीत येत असत. येताना शहरातून काही आवश्यक वस्तूही आणत असत. प्रताप आणि उमा यांच्या दुर्दैवी मृत्यूने त्यांनाही खूप वाईट वाटलं. महेंद्रनाथ आणि कमलादेवींचं सांत्वन करताना ते म्हणाले, "आपल्या तकदीरमध्ये जे असेल ते भोगल्यावाचून आपल्या हाती काही नसतं महेंदर! अल्लाको जो बच्चे सबसे प्यारे होते है, अल्ला उन्हें अपने पास बुला लेता है! प्रताप और उमाबेटीके साथ जो बी हुआ उसका मुझे बहोत अफसोस है! मेरे मजहबके लोग जो कुछ भी कर रहे है, वो देखकर उन्हें मुसलमानतो क्या इन्सान कहनाभी गलत होगा! इन्सानियत के नामपर कलंक है ये लोग!

जबाबदार/जबाबदारी

लेखक शिरीष फडके यांनी सोमवार, 24/11/2014 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
जबाबदार/जबाबदारी जबाबदार आणि जबाबदारी हे शब्द राजरोसपणे वापरले जातात. मुलांची जबाबदारी, कामाची जबाबदारी, आईवडिलांची जबाबदारी अशा अनेक जबाबदार्या आम्ही पार पाडत आहोत किंवा उचलत आहोत किंवा निभावत आहोत असं बहुतेकदा ऐकायला मिळतं. पण नक्की जबाबदारी म्हणजे काय? कर्तव्य, काळजी आणि प्रेम यांचं जबाबदार किंवा जबाबदारी या संज्ञेशी नातं काय? जबाबदार आणि जबाबदारी यामध्ये नक्की अंतर किती? असे अनेक प्रश्न आणि त्यांची उकल म्हणजेच पुन्हा एकदा चिकित्सा. यासाठी आपण एका छोट्याशा गोष्टीचा आधार घेऊया. तसं हॉस्टेलमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे शिस्त.