Skip to main content

लेख

तो आणि आम्ही

लेखक अभिदेश यांनी शुक्रवार, 26/12/2014 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
Virat ची Adelaide ची innings बघितली .... १९९९ च्या Pakistan विरुद्ध ची आठवण ताजी झाली. आज एक वर्ष होऊन गेले त्याला retired होऊन . कित्येक आठवणी चित्रपटा प्रमाणे डोळ्यासमोर तरळल्या . साल १९८७ , तुम्ही शाळेतून धावत पळत घरी येता , पाठीवरचे दप्तर ही न काढता T .V. लावता. हुश्श …!!! तो खेळत असतो . आई ने काय पानात वाढलंय तुमचे लक्ष नसते कारण तुमचे सगळे लक्ष त्याच्याकडे , भारताला जिंकायला ४१ runs बाकी …. आणि .... umpire च्या चुकीच्या निर्णयामुळे तो बाद होतो. आपण तो सामना १६ runs ने हारतो. ती त्याची शेवटची test innings असते . सामना अर्थातच पाकिस्तान विरुद्धचा बंगलोरचा .

"ती" दोघं

लेखक तुमचा अभिषेक यांनी शुक्रवार, 26/12/2014 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
.. महाबळेश्वर प्राईड हॉटेलच्या काऊंटरपाशी घुटमळताना ती मला पहिल्यांदा दिसली. तेव्हा तिचा "तो" तिच्या बरोबर नव्हता. जर हि आमची पहिलीच भेट नसती तर मला नक्कीच आश्चर्य वाटले असते की तिला एकटीला सोडून तो गेलाच कसा. पण त्या क्षणी तरी ती एकटीच तिथे चुळबुळ करत उभी होती. हो, शब्दश: चुळबूळ. खाद्यांवरून आलेल्या ओढणीशी चुळबूळ. पाठीमागून कंबरेपर्यंत आलेल्या केसांशी चुळबूळ. कधी कानाला लटकलेल्या झुंबराशी चाळा, तर कधी हातामधल्या पर्सची उघडझाप. तिथे काहीच न करता उभे राहताना येणारा बावरलेपणा सावरण्याच्या नादात तिची ही धांदल उडत होती. पर्स हाताळण्याची पद्धतही अशी की जणू पहिल्यांदाच पर्स वापरत असावी.

Happy new year!!!

लेखक Maheshswami यांनी बुधवार, 24/12/2014 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
बारमध्ये, परमिट रूम मध्ये, लाईट्स जमेल तेवढ्या मंद करून काळाकुट्ट अंधार करून ठेवण्याचे काय प्रयोजन असेल, हा मला नेहमी सतवणारा प्रश्न आहे. दारू पिणे काही गुन्हा आहे काय कि सगळ्यांच्या नजरा चुकवत अंधारात लपून करावा? गेल्या दहा मिनिटात वेटरचे "हेल्लो , शूक शूक " करून लक्ष वेधून घेण्याचा माझा दहावा प्रयत्न या अंधाराने हाणून पाडला होता. शेवटी, जोरात ओरडून बोलावल्यावर तो धावत पळत टेबलाकडे आला . मी तोंड उघडायच्या आधीच माहितीवजा धमकी दिली त्याने . "साब, और कुछ मंगानेका रहेंगा , तो अब्भीच बोलो . कल कि थरटी फष्ट की तैय्यारी के वास्ते बार आज जल्दी बंद होएंगा .

परवाना !

लेखक Maheshswami यांनी सोमवार, 22/12/2014 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
लाईट जाणं वगैरे प्रकार परदेशात राहून विसरायला झाले होते. भारतात आलो आणि थोड्या वेळातच विजेने सायोनारा केले आणि धूम ठोकली. दिवेलागणीची वेळ, आणि वर बेभरवशाचा कारभार आपल्याकडे सगळा, वीज कधी परत येणार माहित नाही. इनवर्टर पण एन वेळी खराब झालेला. सणासुदीच्या दिवसांमध्ये त्याची डागडुजी करायला पण कुणी येत नव्हतं. बाहेर रिमझिम सुरु झाली होती नुकतीच पावसाची. जीव वैतागून गेला , पण करणार काय ? पर्याय नव्हता. वीज परत येण्याची वाट बघायचं नुसतं! काडेपेटी शोधून मेणबत्ती पेटविली. त्या प्रकाशात घर कसं अगदीच वेगळं भासायला लागलं. निरनिराळ्या वस्तूंच्या लंबुळक्या सावल्या भिंतीवर कशा दिमाखानं डौलू लागल्या.

आजी-आजोबा

लेखक शिरीष फडके यांनी सोमवार, 22/12/2014 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
कलमनामा – २१/१२/२०१४ – लेख ११ – आजी-आजोबा http://kalamnaama.com/aaji-ajoba/ आजी-आजोबा आज लग्नाचा २५वा वाढदिवस साजरा झाला. बायकोने सगळ्या पाहुण्यांसमोर तोंडभरून आपल्या नवर्याचं कौतुक केलं. नवर्यानेदेखील बायकोचं कौतुक केलं. कौतुक करताना दोघांचेही डोळे आनंदाने भरून आले होते. पण या सगळ्यापेक्षा विशेष होतं ते मुलांनी केलेल्या कौतुकाचं. आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही तुमच्या पोटी जन्म घेतला असं म्हणून दोन्ही मुलांनी आपल्या आईवडिलांना लग्नाच्या २५व्या वाढदिवसाची एकप्रकारे शाब्दिक भेटच दिली. सगळे पाहुणे गेल्यानंतर सवयीप्रमाणे दैनंदिनी लिहायला वडील बसले.

शोध थंडीच्या मीटरचा

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 20/12/2014 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
तापमान मोजण्याच्या यंत्रा बाबत तर सर्वाना माहित आहे, पण थंडीचे मीटर हा काय प्रकार आहे , कुणी शोध लावला आणि याने थंडी कशी काय मोजतात, ही उत्सुकता मनात जागृत होणारच. जीवाची मुंबई या महानगरात आमचे एक जिवलग (?) नातेवाईक राहतात. बेचारे सीधे-साधे सरळमार्गी चालणारे, सरकारी कर्मचारी. सकाळी नऊ वाजता घरातून नौकरीसाठी प्रयाण करणारे आणि संध्याकाळी घरातल्या भिंतीवर लटकलेल्या घड्याळानी साडेपाचचा टोळा देत्याच क्षणी, घरात पुनरागमन करणारे. एकदम शिस्तबद्ध सरकारी कर्मचारी सारखी त्यांची साधी राहणी. अर्धा डिसेंबर उलटताच मुंबईत गुलाबी थंडी पडते.

वाणप्रस्थाश्रम,मेंढपाळ -राजा आणी काहीबाही...

लेखक जेपी यांनी शनिवार, 20/12/2014 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
थंडीच काळ आणी रात्रीचा वेळ,यष्टीतुन प्रवास करताना मस्त पेकी डुलकी लागत होती.. तेवढ्यात डोक्यावर टपली बसली,चिडुन मागे पाहील..मक्या होता "अय लिंबुटीबुं काय झोपतो..

  एक चुकलेली बस - रेडबस डॉट इन २

लेखक लॉरी टांगटूंगकर यांनी गुरुवार, 18/12/2014 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
  एक चुकलेली बस - रेडबस डॉट इन २ पहीला भाग इथे पाहता येईल h एक चुकलेली बस, ते पकडलेली पहिली बस. बस आत्ताशी सुरु होत होती, अजून पुढे बराच प्रवास बाकी होता. रेडबसचे बिझनेस मॉडेल अगदी नवीन नव्हते. ऑनलाइन तिकीट एजंट सिस्टीम जगभर सर्वत्र विमानांच्या तिकीटांसाठी वापरली जाते. बहुतांश इंटरनेट सुशिक्षित वर्गाला या कार्यपद्धतीची कल्पना असते.

ये रे माझ्या मागल्या........

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी बुधवार, 10/12/2014 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
"माझं ऐक - बोलिंग घे..... ओव्हरकास्ट आहे". २७५ शनिवार पेठ पुणे ह्या ठिकाणी बिल्डिंगच्या मध्ये असललेल्या साधारण ५० X १५० फुटी फर्शीच्या मैदानवर पिवळ्या स्मायलीच्या बॉलनी खेळताना ते ढोपरायेवढं कार्टं आपल्या गुडघ्यायेवढ्या कॅप्टनला सूचना करत होतं. आता त्या शेंबड्या पोराच्या ह्या आगावपणामध्ये त्याच्या (मुद्दामच उल्लेख केलेल्या) राहत्या ठिकाणाने दिलेल्या जन्मसिद्ध अधिकाराइतकाच वाटा होता आजकाल सगळीकडूनच मिळणार्‍या क्रिकेटच्या ज्ञानाचा! लहान असताना रबरी चेंडू प्यांटवर आम्हीदेखील घासला होताच... पण ह्यांचे म्हणजे नेणत्याचे घासणे | "वन लेग स्टंप" गार्ड काय घेतील.....

नाव

लेखक शिरीष फडके यांनी बुधवार, 10/12/2014 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
कलमनामा – ०८/१२/२०१४ – लेख १० – नाव http://kalamnaama.com/nav/ नाव नावात काय आहे? हे वाक्य शेकस्पिअरचं किंवा हा प्रश्न शेकस्पिअरचा. त्याचा या वाक्यामागील अर्थ असा होता की जर गुलाबाला काही वेगळ्या नावाने संबोधलं तर त्यातून येणारा सुगंध बदलेल का? किंवा त्याचं सौंदर्य कमी होईल का? उत्तर आहे ‘नाही’. मग नावात काय आहे? नाव का असतं? इतिहासातील किंवा वर्तमानातील कित्येक नावं मोठी किंवा महान आहेत म्हणजे नेमकं काय? नाव बदलल्याने नक्की माणूस बदलतो का? एखाद्या नावाशी असलेला संबंध किंवा नातं आणि त्याचं महत्त्व म्हणजे काय?