Skip to main content

लेख

कोर्ट- एक समंजस चित्रभाषा.

लेखक अंतरा आनंद यांनी सोमवार, 27/04/2015 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपटात नायक किंवा नायिका किंवा दोघे असतात. चित्रपट आपल्याला त्यांची गोष्ट सांगतो किंवा एखादी गोष्ट त्यांच्या नजरेतून दाखवतो. ’कोर्ट’ मध्ये ’सिस्टीम’ हेच सिनेमाचं मुख्य पात्र आहे. लोकशाहीर, वकिल, न्यायाधीश आणि त्यांच्या आजूबाजूचे सगळेच या सिस्टीमच्या आधारे वावरणारी दुय्यम व्यक्तीरेखा आहेत. हा सिनेमा कोणा एकाची गोष्ट सांगत नाही तर ह्या सगळ्यांचे टेकू असलेली तरिही सगळ्यांच्या जगण्यातला महत्वाचा भाग असलेली सिस्टीम आहे तशी दाखवतो. इथे सिस्टीमच नायक आहे आणि खलनायकही.

शाळा

लेखक चिनार यांनी गुरुवार, 23/04/2015 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या शाळांमध्ये वार्षिक परीक्षांचे निकाल लागण्याचा मौसम सुरु आहे. ओळखीतल्या शाळकरी मुलांपैकी जवळपास सगळेच पहिल्या नंबरात पास होतायेत. मला प्रश्न पडलाय की सगळेच पहिल्या नंबरात असतील तर दुसरं कोण येतं? की दुसरा नंबर बादच केलाय शिक्षणपद्धतीतून ? शिवाय आजकाल पहिल्या नंबरात येणाऱ्या मुलांचे फारसे कौतुक होत नाही. पहिल्या नंबरात आला तरी अमक्या विषयात मार्क जरा कमीच पडलेत अशी चर्चा जास्त होते. कारण त्या कमी मार्कांमुळे पहिला आणि दुसऱ्यातली तफावत कमी होते. या तफावतीमुळे काय फरक पडतो ते माहिती नाही. कदाचित पालकांना 'अनबीटेबल लीड" हवी असावी असा माझा कयास आहे.

तिची ओळख

लेखक अभिशेखि यांनी बुधवार, 22/04/2015 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
“वैनी , नमस्कार.!!!” म्हणत ५-१० कार्यकर्त्यांचा घोळका दिवाणखान्यात येउन स्थिरावला. वहिनींनी सुद्धा हसून नमस्कार केला. “दादा येताहेत, चहा आणि नाश्ता केल्याशिवाय निघू नका” असं म्हणत त्यांची पावलं स्वैपाकघराकडे वळली. चहा आणि नाश्ता दिवाणखान्यात न्यायला सांगून त्या दादांच्या बेडरूमकडे निघाल्या. दादांची तयारी पूर्ण होत होती. नेहरू जाकीटाचं शेवटचं बटन लावून त्यांनी हात पुढे केला. वाहिनी लगबगीने पुढे सरसावल्या. खणातून काढलेल्या पांढऱ्याशुभ्र रुमालावर अत्तराचे दोन थेंब लावून त्यांनी तो दादांच्या हातात दिला. “बाहेर कार्यकर्ते…. ” वाहिनीचं वाक्य पूर्ण होण्याआधीच दादा बेडरूमबाहेर पडले होते.

‘ती’ चा प्रवास....

लेखक प्रियंका देसाई यांनी बुधवार, 22/04/2015 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
चविष्ट स्वयंपाक बनवणारी ‘ती’, नटण्या-मुरडण्याची आवड असणारी ‘ती’, नवीन साड्या पाहून हरखून जाणारी ‘ती’, मुलाबाळांचं वात्सल्यानं संगोपन करणारी ‘ती’, काटकसरीनं संसार चालवणारी ‘ती’....वर्तमानपत्रातून, टीव्हीवरील बातम्यांमधून, मालिकांमधून अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून ‘ती’ आपल्याला नेहमीच भेटत असते. तिच्या वेगवेगळ्या रुपांमधून ‘ती’ उलगडत जाते. मीही अशाच ‘ती’ला भेटलेय, अगदी तुमच्या माझ्यासारखी सामान्य स्त्री. मात्र तिच्या असामान्य कर्तुत्वाने चारचौघींपेक्षा वेगळी असलेली ‘ती’. चविष्ट स्वयंपाक बनवायला ‘ती’लाही आवडतं पण कच्चं-पक्कं कसही दोन वेळा लेकरांच्या पोटात जाव ह्या प्रयत्नात ‘ती’ असते.

अष्टवृक्षासौभाग्यवती

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 21/04/2015 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
महमूद दरवेश या पालेस्तिनी लेखकाच्या 'If Only the Young Were Trees!' या ललितलेखाचा मुक्त अनुवाद. झाड झाडांचे सहोदर.

कहाणी एका पाण्याची !

लेखक चौथा कोनाडा यांनी शुक्रवार, 17/04/2015 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
एकोणीसशे नव्वदच्या सुमाराची गोष्ट आहे. नविन लुथरा आणि त्यांचे मित्र दीपक मोहन लोणावळयाच्या डोंगराळ घनदाट वनपरिसरातून लुथरा यांच्या मारुती जिप्सी मधून मुळशीकडे निघाले होते. नविन लुथरा म्हणजे कस्टम क्लियरन्स मधले एक उभरते यशस्वी व्यावसायिक. वय जेमतेम तिशीच्या आसपास. अन दीपक मोहन म्हणजे एका तेल-जहाजाचे मालक. धनाढ्य असामी ! Green_One नविन लुथरा स्वत:ची कहाणी सांगत होते.

_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 17/04/2015 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन. (काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच) तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र. आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो. १. नवर्‍याला आवडणार्‍या गोष्टी करा.

ह्युमन रिसोर्स - एक प्रजात

लेखक चिनार यांनी बुधवार, 15/04/2015 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत असं सांगतो की, "कालानुरूप प्रत्येक प्रजातीचा जीव स्वत: मध्ये बदल घडवून आणतो जेणेकरून तो जीव इतर जीवांशी स्पर्धा करूनही टिकून राहू शकतो आणि पुनरुत्पादन करू शकतो" नाही नाही... या सिद्धांतावर आक्षेप नाहीये माझा. किंबहुना आक्षेप घेण्याएवढी पात्रतासुद्धा नाहीये. पण काहीही म्हणा, या डार्विनभाऊंना दूरदृष्टी नव्हतीच. मुळात त्यांनी अभ्यास केलेल्या प्रजातींशिवाय अस्तित्वात येऊ शकणाऱ्या काही प्रजातींकडे त्यांचे दुर्लक्षचं झाले.

"सेफ, अ‍ॅण्ड फोर" - रिची बेनॉ

लेखक फारएन्ड यांनी शनिवार, 11/04/2015 07:48 या दिवशी प्रकाशित केले.
७०-८० च्या दशकातील इंग्लंडमधल्या एखाद्या मैदानावर चाललेली टेस्ट. तुमच्या लक्षात असेल तर तेव्हा साधारण पॅव्हिलियन च्या बाजूने एक कॅमेरा लावलेला असे, आणि बराचसा खेळ त्यावर दिसत असे. त्यामुळे मुख्य पिच व जवळचे फिल्डर्स त्यावर दिसत. बाकीचे कॅमेरे अधूनमधून टीव्ही कव्हरेज वर येत. अशीच एक मॅच. बॅट्स्मन एक फटका हवेत मारतो आणि तो स्क्रीन वर दिसणार्‍या भागाच्या बाहेर हवेत जातो. अशा वेळेस दुसरा कॅमेरा आपल्याला तिकडे नेइपर्यंत बघणार्‍याच्या डोक्यात येणार्‍या दोन प्रश्नांची उत्तरे रिची बेनॉ कमीत कमी शब्दांत देतो, "Safe, and Four"!

आयपीएल येती घरा!

लेखक चिनार यांनी शुक्रवार, 10/04/2015 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
पाचव्यांदा वर्ल्डकप जिंकल्याबद्दल ऑस्ट्रेलीयन खेळाडूंचे अभिनंदन ! का कोणास ठाऊक पण कांगारूंचे अभिनंदन कधी मनापासून करताच येत नाही. तसं त्यांच्या सध्याच्या संघात कोणाविषयी राग नाहीये. पण त्यांच्या पूर्वजांनी केलेले कर्म विसरणं या जन्मात तरी शक्य नाही. असो. उपांत्य फेरीत त्यांच्याकडून हारण्याच्या दु:खातून सावरतच होतो की परत त्यांच्याच स्वागताला उभं राहण्याची वेळ आली. अहो कश्यासाठी म्हणून काय विचारताय ..राष्ट्रीय तमाशा सुरु होतोय या आठवड्यात ! इंडिअन प्रिमियर लीग ! पाहुण्या कलाकारांच स्वागत करायला नको का ?