Skip to main content

लेख

"येडाय का तु?"

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 06/09/2015 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
कुटीबाहेर रविकिरणांची तांबुस सकाळ पसरली. हरीतालिकेचा गाभारा रामप्रहरी दणाणला. तपोवनातल्या वैराग्याचा निद्राभंग झाला. कुटीबाहेर येऊन सुर्यस्नान करत तो उकिडवा बसला. कुळस्वामीनी कोवळ्या ऊन्हात आन्हिकं उरकत होत्या. गायींच्या गळ्यातल्या घंटा मंद किणकिणत होत्या. कळप घेऊन बालगोपाळ अरण्यात निघाले. कान्हा पण आला असेल त्यांच्यात, मंत्रमुग्ध बासुरी घेऊन. यशोदेला चुकवुन. पाणवठ्यावर गौळणींची लगबग चालली होती. गोपिका खिदळत बाजाराला निघाल्या होत्या.

सच्चे वरण

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 06/09/2015 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
सच्चे वरण ह्याचा अर्थ ’mageireména fakés / kalós fakés’ (ग्रीक शब्द) ", "gut Linsen (जर्मन शब्द)", "bien lentilles (फ्रेंच शब्द)" म्हणजेच "चांगले शिजलेले एकजीव झालेले वरण" असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात चांगल्या वरणभाताने आणि शेवट चांगल्या ताकभाताने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते. ’सच्चे वरण हवे’ असे अंथरूणाला खिळलेल्या आजारी व्यक्तीने सांगितले तरी घरातल्यांना ते पटत नाही. अंथरूणाला खिळलेल्या वृद्ध व रूग्णांना सच्चे वरण देणे अवघड असते. नवरा किंवा बायको असली तर त्यातल्या त्यात चांगले.

वाघ-या

लेखक चांदणे संदीप यांनी शनिवार, 05/09/2015 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
(ही पूर्णत: काल्पनिक कथा असून या कथेचा अन्यत्र कुठेही कसल्याही प्रकारचा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ही नम्र विनंती) "कुठला र तू?" दरेकर साहेबाने जेवता जेवता पाण्याचा ग्लास तोंडापाशी धरला आणि इतका वेळ दाराबाहेर हात मागे बांधून उन्हात उभा असलेल्या ठाकराच्या पोराला विचारले. दुपार तीन-साडेतीनची वेळ होती. दरेकर साहेबांची ब-याच दिवसांनी या पांबरे-माड धरणक्षेत्राला व्हिजीट पडली होती. इकडे येताना मुख्य राज्य महामार्ग सोडल्यानंतर रस्त्याने त्यांना गाडीत एका जागी स्वस्थ बसू दिले नव्हते.

नवस - लघुकथा

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 04/09/2015 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
होडी तशी बारीकचं होती. नदीसारखीच. पलिकडं, देवळावर, भगवा झेंडा वाऱ्यावर डौलत होता. हातात मटणाचा प्रसाद होता. आभाळात घारी सावज शोधण्यात भटकत होत्या. बारकी पोरं त्यांचाकडं बघण्यातच दंग होती. ईवलूशी होडी पण वस्ताद कस लावुन वल्हत होता. संथ संथ होडी काठाला लागली. देवळात भक्तगणांची गर्दी होती. मऊशार वाळुतनं वाट काढत नाना देवळात शिरला. मंदाक्कापण सोबतीला होती. आज नानानं बोकड कापलं होतं. म्हसोबाला. कुणी त्याला खंडोबा पण म्हणायचं. आख्खी वाडी आली होती. दुरदूरची नातीगोतीही जमलेली. दिगंबर सोडून. पोरीचं लगीन जमाव म्हणुन मंदाक्कानं नवस केलता.

परोपकारी गणू

लेखक बबन ताम्बे यांनी शुक्रवार, 04/09/2015 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज गावचा आठवडे बाजार. त्यामुळे सकाळची शाळा आणि दुपारी बारा वाजता सुट्टी. गणूला हा दिवस खूप आवडे. नेहमीप्रमाणे तो शाळेतून बारा वाजता घरी आला. घराला कुलुप होते.आई शेतावर मजूरीसाठी गेली होती आणि अजून तायडी पण शाळेतून आली नव्ह्ती. म्हणून तो घराच्या ओटयावर बसून राहीला. एव्हढयात त्याला शेजारच्या बिन्नूचा रडण्याचा आवाज आला. बिन्नू हा दुसरीत शिकत होता. त्याची आई सहसा कुठे बाहेर जात नव्हती पण आज ती घराला कुलुप लावून बाहेर गेली होती. घर बंद पाहून बिन्नू मोठमोठयाने रडत होता. गणूचा ह्या टिल्लूवर भारी जीव. त्याच्याशी खेळायला त्याला खूप आवडे. आज त्याला रडताना पाहून गणूची कालवाकालव झाली.

नात्यातले लुकडे जाडे

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 03/09/2015 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही नात्यामध्ये दोघांपैकी जो वजनाने मोठा असतो त्याचेकडून सतत डाएटिंगची आणि जास्त कामाची अपेक्षा केली जाते. केवळ वजनाने मोठा आहे म्हणून सगळ्यांचे त्याला ऎकून घ्यावे लागते व खाण्यापिण्याला आणि आरामाला मुरड घालावी लागते. पण हाच जाड्या असलेला व्यक्ती जेव्हा लुकड्याला एखादा उपदेश करतो, दोष दाखवतो, आज्ञा करतो तेव्हा मात्र लुकडा जर त्याचे ऎकत नसेल आणि जाड्याला योग्य तो मान मिळत नसेल तर मात्र त्या नात्याला एकतर्फी नाते म्हणता येईल.

मिपावर ट्रॉल वाढत आहेत

लेखक इस्पिक राजा यांनी गुरुवार, 03/09/2015 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मिपावरील ट्रोलांची संख्या बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या मिपावर वेगाने ट्रोलांची संख्या वाढते आहे. मिपा सारख्या संस्थळावर जिथे चांगल्या लेखकांना मखरात सजवले जाते, तिथे अशा प्रकारचे ट्रोल बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का की आज आपल्याला जेन्युइन आयडी दुरापास्त होत आहेत. ज्यांनी मिपाला उत्तमोत्तम प्रतिसादांनी सजवले, आपला वेळ देउन मोठे केले तेच आज (असल्या टोळांमुळे) मिपापासुन दूर गेलेले पाहून मन दु:खी होते. सामान्य वाचक अशी आशा करतात की चांगले लेखक उत्तमोत्तम लेख देत राहतील.

नात्यातले लहान मोठे

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 03/09/2015 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही नात्यामध्ये दोघांपैकी जो वयाने मोठा असतो त्याचेकडून सतत कर्तृत्वाची आणि कर्तव्याची अपेक्षा केली जाते. केवळ वयाने मोठा आहे म्हणून सगळ्यांचे त्याला ऎकून घ्यावे लागते व हौसे मौजेला मुरड घालावी लागते. पण हाच मोठा असलेला व्यक्ती जेव्हा लहानाला एखादा उपदेश करतो, दोष दाखवतो, आज्ञा करतो तेव्हा मात्र त्याचे लहान जर त्याचे ऎकत नसतील आणि मोठ्यांना योग्य तो मान मिळत नसेल तर मात्र त्या नात्याला एकतर्फी नाते म्हणता येईल.

बाबांचा 'सैगल'

लेखक मार्मिक गोडसे यांनी बुधवार, 02/09/2015 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
माझे मनगट घट्ट पकडून बाबा गर्दीतून वाट काढत भरभर चालत होते. मी रेंगाळतोय असे वाटले की बाबा मला पुढे ओढायचे, त्यांच्या वेगाने मला चालता येत नव्हते, पळावे लागत होते. फोर्टचा परिसर माझ्याकरता जादुनगरीच होती, फुटपाथावरील ते स्टॉल, त्यावरील इलेक्ट्रोनिक वस्तू, कॅमेरे, रिमोटवर चालणारी गाडी,हवेत उडणारे प्लॅस्टिकचे हॅलिकोप्टर,पाण्याच्या टबमध्ये फिरणारी बोट काय बघू नि काय नको अशी माझी अवस्था झाली होती.

ती सकाळ आणि ती!

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 01/09/2015 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
भाळातली चांदण्याची आरास पुसट होत चालली होती. रात्रीचा खेळ संपवून माघारी चाललेल्या चांदण्यांमधल्या काही उगाच मागे रेंगाळल्या होत्या. वारा कधी झाडांवरच्या पानांबरोबर तर कधी खाली निवांत पहुडलेल्या पाला-पाचोळ्यांबरोबर खेळत होता. धुकही आता आजूबाजूच्या परिसराला मिठीत घ्यायला लागल होत. बाहेर भिरभिरणारा वारा आता शिरीषच्या बेडरुमच्या अर्धवट उघड्या खिडकीतून आत शिरला व शिरीषच्या तोंडावर झुलणा-या चादरीच्या टोकाला धरून हलवू लागला.