Skip to main content

लेख

---------एका प्रवासाचा क्रॉससेक्शन------------

लेखक अर्थहीन यांनी मंगळवार, 06/10/2015 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
---------एका प्रवासाचा क्रॉससेक्शन------------ गांधीबाबांची जयंती. सुट्टी. लॉन्ग वीकेंड. घरी जायचं म्हटलं की आजही तेवढाच आनंद. पुणे-सोलापूर सकाळी 9.30ची इंटरसिटी गाठायची आहे. जगताप-डेरीच्या नवीन BRTस्टॅंड वर कानात हेडफोन अडकवुन प्रसन्न मनानं बसची वाट पाहतो. गाणं चेंज करेस्तोर 5 मिनटातच -हादरा बसताना फ़क्त चुंयि-चुंयि असा आवाज करणारी वातानुकुलीत BRT येते. स्वयंचलित दरवाजातून प्रवेशतो. संपूर्ण भला मोठा अन व्यवस्थित लेन्स आखलेला गुळगुळीत प्लेन रोड. प्रवास म्हणजे सु:ख! आत बसल्यावर बस हालली तरी फ़क्त हत्तीच्या पाठीवर इकडून-तिकडे मऊ झुलल्यासारखं वाटावं इतका मऊपणा..

पुणे कट्टा वृत्तांत- ४ ऑक्टोबर २०१५

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी सोमवार, 05/10/2015 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे पेर्णास्त्रोतः भव्य आवाहन ~ दिव्य आवाहन ~ दो सोनार की इक लोहार की २४ सप्टेंबर २०१५ (ख्रिस्तपुर्व लिहायचा मोह आवरला) मिपावरचं एक भव्य (?) दिव्य (नमस्कार माझा तया दिव्यश्रीला) वॅक्टीमॅट्व श्री.स्त्री.दी.भव्यश्री ह्यांनी युरोपखंडे जर्मनदेशे नामक भुभागावरुन भारतामधल्या पुण्यभुमीमधे एक समस्तं मिपाकरांचा एक कट्टा व्हावा असा डाव्या पायातला बुट काढला.

पहाट.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 04/10/2015 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
“पाऊल पुढे टाकायला ही पहाट मला इंधन पुरवते.”---संध्या परब सकाळीच बाहेर फेरफटका मारायची माझी जूनीच संवय आहे.मग मी कुठेही फिरतीवर असलो किंवा कुणाकडे बाहेर गावी रहायला गेलो असलो तरी सकाळी उठून जवळ असलेल्या कुठच्याही मोकळ्या जागी फिरून यायचो.मग कोकणात असलो तर,बाजूच्या शेतीवाडीत फिरायचो,समुद्राजवळ असलो तर चौपाटीवर जायचो,छोटासा डोंगर असला तर घाटी जढून जायचो.जवळ नदी असेल तर नदीच्या किनार्‍या किनार्‍याने फिरत जायचो. शहरात असल्यानंतर मात्र अशी निवड करायला मिळत नसायची. एकदा मी दिल्लीत असताना वसंत विहार कॉलनीत रहायला होतो.कॉलनीत अतीशय सुंदर पार्क होता.खूप लोक सकाळी फिरायला यायचे.गॉल्फचं मैदान पण होतं

ब्रायन क्लोज - द मॅन ऑफ स्टील!

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 03/10/2015 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रायन क्लोज गेला! कोण ब्रायन क्लोज? असा प्रश्न साहजिकच अनेकांच्या मनात चमकून गेला असेल. अगदी क्रिकेट जाणकारांच्याही! कारण सध्याच्या ट्वेंटी-ट्वेंटीच्या जमान्यात ८४ व्या वर्षी ख्रिस्तवासी झालेल्या क्लोजबद्दल तपशीलवार माहिती असण्याची शक्यता विरळाच! आजकालच्या हिमेसभाय, यो यो हनीसिंग (काय पण नाव!), आतिफ अस्लम (हे माणसाचं नाव आहे. मला आधी हा मुर्ग मुसल्लम सारखा खाण्याचा प्रकार वाटला होता.

मोठ्यांचे मोठेपण आणि त्यांची विनम्रता!

लेखक विद्यार्थी यांनी शुक्रवार, 02/10/2015 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
विश्वविहार करताना नारद मुनी एकदा वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात पोहोचले.निरनिराळ्या वयातील विद्यार्थी तिथे बसून अभ्यास करत होते. त्यातील काही विद्यार्थी ७०-७५-८० वर्षांचे होते. ते पाहून नारदांना गम्मत वाटली. ते वसिष्ठ ऋषींना म्हणाले, "माझा शिष्य ध्रुव (ध्रुव तारावाला) याला तर मी थोड्याच काळात अढळ पदावर पोहोचवले पण तुमचे हे शिष्य संपूर्ण आयुष्य घालवून काहीच मिळवू शकले नाहीत. गुरु म्हणून तुम्ही त्यांना काय मिळवून दिले?" वसिष्ठ ऋषीं त्यांना नम्रपणे म्हणाले, "आपण देवर्षी नारद आहात, तुमची आणि माझी बरोबरी कशी बरे होऊ शकेल?" हे संभाषण संपता संपता संध्याकाळ झाली.

एका मंदिरात...

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 02/10/2015 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
मी राहतो त्याठिकाणी एक अवजड बोजड मंदिर आहे. पण मी तिकडे फारसा जात नाही. रात्रीचं हे मंदिर मला भेसुर वाटते. कलुळात 'कवशी' दिसते असं मला एकजण म्हणाला होता. बऱ्याच वर्षापुर्वी कुण्या 'कौशल्या'ने ईथेच ऊडी मारली मारली होती. तिचं भेसुर भुत ईथंच वावरतयं असा माझा समज झालाय. रात्रीचं मी तिकडं कधीच फिरकत नाही. भल्या सकाळी उठुन मी मंदिरात जातो. गाभाऱ्यातल्या अनाम परड्या मला जोगवा मागतात. पाट्यावरचा लालबुंद गंध माझ्या कपाळावर अलगद जाऊन बसतो. चाफ्याची सुगंधी फुले माझ्या हाताकडे झेपावत येतात. मी त्यांना देवीकडे फेकतो. आतल्या काळोखात मला फारसं दिसत नाही.

पुणे कट्टा- ४ ऑक्टोबर २०१५,

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 02/10/2015 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
दिव्यश्रींच्या धाग्यावर जरा जास्तचं मारामारी झाली. असो. कट्टा फायनालाईझ झालेला आहे. कट्टा खालीलप्रमाणे होईल. तारिख पे तारिखः ४ ऑक्टोबर २०१५ वेळः रविवारी पहाटे ११.०० वाजता स्थळः पुण्यनगरीमधली पाताळेश्वर ही पावन जागा कार्यक्रम: भेटणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे आणि टवाळक्या करणे फायनान्स डिटेल्सः टी.टी.एम.एम. कोण कोण येणारे ते इथे कन्फर्म करा. म्हणजे भोजनास कुठे जायचे हे ठरवता येईल. दुर्वांकुरला जायचं का? (संपादकांना विनंती-४ तारखेनंतर धाग्यास हेवनवासी करावे. धाग्याकर्त्याला नको) धन्यवाद.

साखरचौथीचा गणपती

लेखक जागु यांनी गुरुवार, 01/10/2015 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
भाद्रपद महिना म्हणजे गणेशोत्सवाचा जल्लोष! या दिवसांत बाजारपेठांतील गल्ली अन गल्ली मंगलमय रूप धारण करते. जिकडे तिकडे अत्तर, उदबत्त्यांचा सुगंध, फळांच्या गाड्यांवर फळांच्या सुबक राशी, फुलमार्केटमध्ये सजावटीची फुले, कंठ्या नी दूर्वा, सुगंधी फुलांनी मार्केट इतके मंगलमय झालेले असते की तिथून पाय पुढे निघत नाहीत. काही सजावटीची दुकाने तोरण, माळांनी घरा-घरांतील गणेशाचे स्वागत करायला सज्ज झालेली असतात. हलवायांच्या दुकानांत मोदकांच्या सुबक राशी रचल्या जातात. सीडींची दुकाने गणेश भक्तीच्या गीतांनी सुरेल झालेली असतात. गणपतीच्या आगमनापूर्वीचे दोन दिवस तर बाजारपेठ तुडुंब भरलेली असते.

कालचक्र

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 30/09/2015 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
कोण्या एका काळी एका दुरदेशी एक महान तपस्वी एका निबिड अरण्यात एकाकी भटकत होता. त्याची गृहस्थी सर्वदुर प्रदेशात एका कुटित आपल्या मुलांना घेऊन त्याची वाट पाहत अश्रुंचे ताटवे फुलवत राहीली. दऱ्या डोंगरे चिखल दलदल आणि ऊष्ण वाळवंट तुडवणारा तपस्वी आता या दिशाहीन प्रवासाला थकला होता. एके दिवशी एका चवदार तळयाकाठी त्याला एक बंदिस्त शुभ्र मडके सापडले. वैफल्याने ग्रासलेल्या आपल्या मळकट झोळीत त्याने ते ठेऊन दिले. एका अवाढव्य शिळेवर चढुन त्याने ते खोलुन पाहिले.

मटणाचं कालवण! (शतशब्द्कथा)

लेखक चांदणे संदीप यांनी बुधवार, 30/09/2015 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
फाट्यावरच्या ट्रकमधून गर्दी सांडून ओघळ फुटल्यासारखी गाव आणि वस्त्यांकड निघालेली. कलंडलेल्या उन्हातनं तिघी वस्तीकडं निघाल्या. गर्दीत मिसळू न देण्यासाठी सासूने त्या दोघींचे हात धरलेले! भयानक दुष्काळ पडलेला! दुष्काळी कामावरूनच तिघी परतत होत्या. स्वयंपाकासाठी काय करायचं हा नेहमीचा प्रश्नही सोबत चालत होता. पण कुणीच काही बोलत नव्हत. मुक्याच जणू! नेहमीच्या वळणावर तिघी थांबल्या. थोरली सून रस्ता उतरली, ढासळलेल्या पवळंवरून पलिकडं गेली. कंबरेच्या विळ्याने 'विचका' स्वयंपाकासाठी काढू लागली.