Skip to main content

लेख

'माळा'

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 04/11/2015 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
हो...

गोल-गोल सोनेरी रंगाचे अनारसे.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 03/11/2015 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
“माझी आजी किचनमधे माझ्या जवळ बसल्याचा मला भास होणार.आणि डायनींग-टेबलाच्या पलिकडे माझ्या दोन्ही मुली एकाग्र होऊन मला पहात असणार” सुलभा मला म्हणाली. सुलभाकडे मला दरदिवाळीला फराळासाठी बोलावलं जातं.मला अनारसे आवडतात हे सुलभालाही माहित आहे.त्यांच्या फराळात अनारसे निक्षून असायचे.मी ते आवडीने खाताना सुलभाची आजी मला टक लावून पहायची.आणि माझ्या चेहर्‍यावरचं समाधान पाहून तिही खूश व्हायची. “वाः! काय सुंदर झालेत अनारसे” असं मी म्हटल्यावर, “मोठे कष्ट पडतात बाबा!

चित्रा

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 02/11/2015 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
लेकीच पहिलं बाळंतपण! आपल्याच घरी व्हावं म्हणून आईने खूप प्रयत्न केलेले पण लेकीच्या सासरच्यांनी, 'कशाला त्या गावखेड्यात? तित काय येळला सोयी-सुविधा हायेत, का रातीअंधारचं गाडी-घोडा आहे? शिवाय एकली आई आन म्हातारी आज्जी. त्यांच त्यान्ला तरी उरकतयं का ह्ये परपंचाच ऱ्हाटगाडग?' अशा उलटतपासण्या करून बाळंतपण कुठे व्हाव हा विषय संपवून टाकला! मग नातीने चिमुकले पाऊल सा-यांच्याच जगात ठेवल्यावर लेकीच्या आग्रहाखातर आठ-पंधरा दिवसांसाठी आई गावातल्या वावरातली विळा-खुरपी तिथेच सोडून शहरातल्या इमारतींच्या जंगलात आली. पहिल्यांदाच एकटी आलेली!

एक पिल्लू: तिचं आणि आमचं....

लेखक संदीप डांगे यांनी रविवार, 01/11/2015 01:52 या दिवशी प्रकाशित केले.
परवा बायको आमच्या छोट्या बाळाला घेऊन शेजारच्या घरी काही कामानिमित्त गेली होती. त्यावेळी तिथल्या आजींनी हिला सहज विचारले, "अगं याची दृष्ट वैगेरे काढतेस की नाही? मला वाटतंय ह्याला जबरी दृष्ट लागली आहे." तेव्हा बायकोनी त्यांना उत्तर दिले की आम्हाला यातलं काही कळत नाही, त्यामुळे आम्ही हे दृष्ट उतरवणे वैगेरे प्रकार करत नाही. तेव्हा त्या आजींनी एक अनुभव सांगितला, तो अक्षरशः चकरावणारा होता.... ते सगळं कुटुंब अंदाजे पंधरा सोळा जण त्यांच्या कुलस्वामिनीच्या दर्शनाला गेले होते, तिथे त्या निसर्गरम्य ठिकाणी काही माकडेही होती. एका उंचशा झाडावर एक माकडीण आपलं पिल्लू सांभाळत बसली होती.

अनवहाणी चालणं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 28/10/2015 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
मला आठवतात ते दिवस. "गै वयनी,कालचां काय शिळांपाक्यां असलां तर वाढ गे!" माझ्या आजोळच्या घराच्या मागच्या अंगणाच्या बाहेरून दगडूमहाराचा( दगडूमहार ह्याच नांवाने तो ओळखला जात असल्याने तसं नाईलाजाने म्हणावं लागतं.) हा आवाज ऐकल्यावर माझी आजी मांगरात जाऊन अंगावरचं लुगडं सोडून मांगरातून जूनं लुगडं-त्याला कोकणात बोंदार म्हणायचे-नेसून यायची.ते झाल्यानंतरच दगडूमहाराच्या करटीत-नारळ फोडून नारळातलं खोबरं काढून झाल्यावर उरलेले कडक आवरणाचे दोन भाग.त्यातल्या अर्ध्या भागाला करटी म्हणायचे-आम्ही लहान मुलांनी खाऊन झाल्यावर उरलेली पेज आणि फणसाची भाजी,त्याच्या करटीत वरून टाकायची .करटीत टाकलेली पेज पिऊन झाल्यावर फ

परीकथा भाग ४ - (फेसबूक स्टेटस १.६ ते १.७ वर्षे)

लेखक तुमचा अभिषेक यांनी सोमवार, 26/10/2015 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
. ३० सप्टेंबर २०१५ पापा ! ते सुद्धा पा पा पा पा नाही तर सुस्पष्ट आणि खणखणीत पापा .. ते सुद्धा मम्मा बोलायच्याही आधी आधी.. फिलिंग शब्द, इमॉटिकॉन्स आणि स्मायलींच्या पलीकडले :) . . २ ऑक्टोबर २०१५ वीज चमकते तेव्हा आधी प्रकाश दिसतो, मग थोड्यावेळाने आवाज ऐकू येतो. हेच सायन्स वापरून आम्ही ब्रश केल्यावर चूळ भरतो. आधी शांतपणे ग्लासातले पाणी पिऊन घेतो, मग फुर्रर करून आवाज काढतो. वीज काही आपल्या डोक्यावर कोसळत नाही, आणि आमच्या तोंडातले पाणी काही बेसिनमध्ये पडत नाही :) . . ५ ऑक्टोबर २०१५ मोठी माणसं विनोद करतात, लहान मुलं विनोद घडवतात. शनिवारी परीबरोबर तिच्या आजोळी चाललो होतो.

हवा के साथ साथ..

लेखक स्वाती दिनेश यांनी रविवार, 25/10/2015 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या भारतवारीत अशाच निवांत गप्पा चाललेल्या असताना काकूने एअर फ्रायरचा विषय काढला. विषय मोठा टेम्टिंग होता. गरम हवेचे झोत वेगात फिरवून फ्रेंच फ्राइज पासून केकपर्यंत कोणतेही पदार्थ तयार केले जातात आणि तेलाचा वापर त्यात नगण्य असतो ही गोष्टच क्रांतिकारी होती. अर्धा चमचा तेलात कटलेट आणि एक चमचा तेलात समोसे बनतात अशा संभाषणातले समोसे, कटलेट, पेस्ट्री असं सारखं सारखं ऐकून जीभ चाळवली आणि कोपर्‍यावरच्या वडेवाल्याकडून वडे, भजी आणलेच आम्ही..

(जेव्हा) काहीच करू नये. (असं वाटतं)

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 23/10/2015 07:36 या दिवशी प्रकाशित केले.
“काहीच करायचं नाही”,किंवा “असाच कुठे तरी वेळ घालवायचा” याचा अर्थ जीवनात कुणी आळशी असणं किंवा कुणी निष्क्रिय असणं असं नव्हे.” त्या दिवशी मी नरेंद्राच्या घरी काही कामासाठी गेलो होतो.तो एकटाच घरी होता.अगदी कंटाळलेला दिसला. “कायरे,नरेंद्रा अगदीच कंटाळलेला दिसतोस.बायको घरी नाही म्हणून तुझा वेळ जात नाही काय?” मी नरेंद्राला कुतूहल म्हणून विचारलं. “काहीच करू नये असं मला बरेच वेळा वाटतं.बरेच लोक त्याकडे निराळ्या अर्थाने पहातात तो अर्थ नव्हे .काहीच करू नये याचा अर्थ-चांगला आलेला दिवस मस्त घालवावा,अमुक ठिकाणी जाणार आहे,निर्दिष्ट स्थानाकडे जाणार आहे, असं न समजून चालत रहावं असं वाटतं.जीवनातले आनंदाचे क्ष

माझी शाळा: मोठेपणीचा निबंध!

लेखक चांदणे संदीप यांनी बुधवार, 21/10/2015 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
काय भुर्रकन गेले ते दिवस! शाळेचे! कळलंसुद्धा नाही! कॉलेजात जायच्या आणि पुढे काहीतरी बनायच्या ध्येयापुढे आपल्या बालपणाच्या सोनेरी पानाला आपण अगदी सहज, उडत्या पांढर्‍या म्हातारीला तिच्या बीमधून काढून एकेक करून वार्‍यावर भिरकावून द्यावं तसं भूतकाळाच्या अंगणात नेमाने रतीब घालत टाकून आलो. आता ते बालपणाच सोनेरी पान दुरून फक्त पाहता येतं. परत मिळवता येत नाही, इतकंच कशाला, त्याला स्पर्शही करता येत नाही! मुकलो त्याला कायमचंच! आज मेंदूला ताण देत वर्गातल्यांची नावे आठवावी लागतात.

कंट्रोल रूम

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 19/10/2015 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
( या लेखातील घटना जरी खरया असल्या तरी पात्रांची नावे बदलली आहेत आणि विनोदनिर्मितीसाठी काही प्रसंगांना तिखटमीठ लावण्यात आलेले आहे!) ०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-० "नमस्कार, कंट्रोल रूम, काय मदत करू शकते आपली?" "हॅलो, पुलिस, अहो आमच्या हिथे बाहेरच्या नळावर, त्या परजापतीबाई आणि सराटेबाई ह्यांच्यात जोरात भांडण चालूयेत, लवकर पुलिस पाठवा नाहीतर आता त्यांच्यात बादली, हंडं-कळशांनी मारामारी सुरू हुयल, अजून थोड्या वेळाने माहित नाही कशानं मारामारी करतेल!" "कुठून बोलताय तुम्ही" "घरात्न... आपलं ते...