Skip to main content

लेख

Night Out...!

लेखक प. शी. यांनी शनिवार, 23/09/2017 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
विक्रमच्या पापण्यांची हालचाल झाली. पुसटशी चमक त्याला दिसत होती. रस्त्यावर काचेचा चुरा पडला होता. त्याची bike रस्त्याच्या कडेला तशीच पडून होती. तो भानावर आला. डोक्याला हात लावत रस्त्यावरच बसुन होता. त्याच्या कपाळावर जखम झाली होती. त्याच कपाळ, भुवया, कान सर्व काही रक्ताने माखल होत. हाता-पायालाही बरचस खरचटल होत. गुढग्या जवळ खरचटल्यामुळे jeans फाटली होती. शर्ट रक्त आणि मातीन माखला होता. तो हळुहळु ऊभा राहीला. त्याची नजर सुमनवर पडली. सुमन रक्ता-मातीच्या चिखलात तशीच निपचीत पडून होती. तिचा एक पाय Activa च्या खाली अडकला होता. तिचे रक्ताने भरलेले केस तिच्या चेहर्यावर चिटकून होते.

सनी देओल, तू पुन्हा वापस ये!

लेखक पिंपातला उंदीर यांनी शनिवार, 23/09/2017 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
मी पत्रकारितेचं शिक्षण घेत होतो तो काळ. उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही आमच्या गावातच कुठल्याही वर्तमानपत्रात उमेदवारी करणं अपेक्षित होतं. तशी मी करत होतो. मी ज्या वर्तमानपत्रात काम करत होतो, त्यात एकदा बॉलिवुडमधल्या घराणेशाहीवर लेख आला होता. त्या लेखात धर्मेंद्रच्या दोन्ही मुलांनी म्हणजे सनी देओल आणि बॉबी देओल यांनी धर्मेंद्रच्या परंपरेचा सत्यानाश केला या अर्थाची काही वाक्यं होती. तो लेख प्रकाशित झाल्यावर पत्रांचे गठ्ठेच्या गठ्ठे यवतमाळ, बीड, चंद्रपूर, उस्मानाबाद आणि तत्सम जिल्ह्यांमधून वर्तमानपत्राच्या मुख्य कचेरीत आले.

स्पर्शाला पारखा... पुरुष

लेखक मराठी कथालेखक यांनी शनिवार, 23/09/2017 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
स्पर्श ही सुद्धा एक संवादाची भाषा आहे असं म्हंटलं जातं. चित्रपट, मालिका यांतली पात्र अनेकदा एकमेकांना स्पर्श करताना दाखवतात, अनेकविध नात्यातले (मैत्री) स्त्रीपुरुष हातात हात घेतात , कधी आलिंगन देतात , कधी स्नेहाने, प्रेमाने, कधी सांत्वन करण्यासाठी , तर कधी धीर देण्यासाठी..काही वेळा तर रोज 'गुड मॉर्निंग/नाईट' म्हणत 'हग करणे' ही दाखवतात. आणि यात पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी हे तर आलेच पण त्याशिवाय आई-वडील आणि मुलगा/गी, मैत्रमैत्रिणी, आजी आजोबा आणि नातवंड इतकेच काय तर कधी दीर-वहिनी वगैरे वगैरे असे अनेक नात्यात होणारा स्पर्श अगदी सहज दाखवतात. मला त्यावर अजिबात टीका करायची नाही.

संघर्ष : भाग ०४

लेखक दिपक लोखंडे यांनी शनिवार, 23/09/2017 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ०३ पासून पुढे.. १०:४० ला अनिकेतची गाडी सेंट्रल कॅफे समोर येऊन थांबली राधा कॅफेच्या दाराशीच उभी कोणाचीतरी वाट बघत असताना दिसली. अनिकेतने गडबडीने त्याची गाडी पार्क केली आणि तो राधा जवळ येऊन थांबला. त्याला समोर बघून राधा म्हणाली ‘अनिकेत तू लेट आहेस..’ ‘आज अनुला कॉलेज पर्यंत सोडावं लागलं म्हणून थोडा वेळ झाला’ अनिकेत राधाला समजावण्याचा सुरत म्हणाला.. राधा त्याच्याकडे बघत हसली आणि म्हणाली ‘अरे इट्स ओके..

पाहिले मी जेव्हा तुला ( भाग १ )

लेखक अनाहूत यांनी शनिवार, 23/09/2017 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
तिला न पाहता होणारी तगमग न समजणारी होती , काय होतंय आपल्याला ? नक्की काय होतंय ? आपण तिच्या प्रेमात , ... छे उगाच काहीतरीच काय ,.... पण मग असं का होतंय .. समोर असतो तेव्हा तिच्याशी पटत नाही आणि भांडण होतात आपली , असं वाटत कि ती नसलेली बरी, पण ती नसली कि असं का वाटतय ? कि काहीतरी चुकतंय .. नाही माहित पण असं वाटतय हे नक्की आहे ..... " ए हाय , कसा आहेस ? " " कुठं होतीस ? " " का आता काय आहे ? काय झालाय का ? हे बघ असं प्रत्येक गोष्टीसाठी मलाच जबाबदार धरू नकोस . मला तर माहितही नाही काही ....." " तू नव्हतीस तर ठीक वाटत नव्हत .

स्वयंपाकातील आयुधं

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 22/09/2017 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
खल आणि बत्ता करतात ठणाणा आम्हाला काहीतरी काम सांगाना  स्टोव्ह शेगडीला लागली घरघर ग्यास सिलेंडर आला घरोघर काड्याची पेटी हिरमसून बसली लायटरने माझी जागा पटकावली यांत्रिक युगाला झाली सुरवात जुन्या बुढयाना करुया बाद वीज नी यंत्रे रुसतात जेव्हा जुने ते सोने म्हणतात तेव्हा लहानपणीच हे बडबड गीत म्हणताना मजा यायची. तरीही त्यावेळच्या त्या स्वयंपाक घरातल्या आयुधांचे अनन्यसाधारण महत्व मान्य होतेच. मला अजूनही आठवत खास पाहुणे आले की माझी आई खास कॉफी करायची. त्यासाठी खल-बत्यातून मस्त वेलची कुटायची आणि खिसणीवर जायफळ खिसून ते त्या कॉफीच्या पाण्यात टाकायची. आमच्या लहानपणी सर्रास चहा-कॉफी मिळत नसे.

कप्पा मनातला

लेखक गणेश.१० यांनी शुक्रवार, 22/09/2017 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
कपडे ही जिव्हाळ्याच्या माणसांसारखी पण अगदी चिकटून असणारी गोष्ट. त्यामुळेच की काय घरातल्या कपाटापेक्षा मनातल्या आठवणींच्या कपाटात कपड्यांनी थोडी जास्तच जागा व्यापलेली असते. त्यातला हा थोडासा अस्ताव्यस्त पण गंमतीचा कप्पा. माझ्या सर्वात जुन्या आठवणीतले कपडे मला स्पष्टपणे आठवतात.. (ओरिजिनली) हाफ शर्ट आणि हाफ पँट -- पूर्वाश्रमीच्या फुल पँटची आमच्या शेजारच्या टेलरच्या दुकानातून निघालेली दुसरी आवृत्ती. त्यानंतरची आठवण म्हणजे दिवाळसणाला गावी जमलेल्या सर्व भावंडांना एका रांगेत उभे करून घातलेले, टेलरने त्याच्या टेलिपॅथीने अंदाज घेऊन शिवलेले, नवीन कपडे. साम्यवादाचं अगदी छोटं घरगुती उदाहरण.

खिडकी

लेखक जागु यांनी गुरुवार, 21/09/2017 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
चार कोनांची, सुरक्षेसाठी बाहेरून लोखंडी ग्रिल लावलेली आणि पारदर्शकतेसाठी काचेची स्लायडींग असलेली, हवा आत बाहेर खेळवणारी अशी खिडकी आपल्या घराचा एका अर्थाने श्वासच असतो. अर्थात प्रत्येक घराच्या खिडक्या वेगवेगळ्या आकाराच्या, काचेच्या, लाकडाच्या, ग्रिलच्या असतात. हॉल बेडरूम च्या खिडक्यांवर आकर्षक पडद्यांची सजावट करून खिडकीला आकर्षक पोषाख दिला जातो त्याने खिडकीच्या सौंदर्य अधिक खुलून दिसते. हल्ली ग्रिलमध्ये झाडे लावूनही खिडकीला बगिच्याच रूप दिल जात. मग हळू हळू ही खिडकी बाहेरील निसर्गातील जीवांनाही आपल्या कवेत घेऊन त्यांना आसरा देते.

उरले जगणे, मरणासाठी !

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 20/09/2017 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
परवा एसटीच्या मुंबई सेंट्रल ऑफिसात एका मित्राला भेटायला गेलो होतो. खूप गप्पा मारल्या, आणि निघालो. बाहेर पॅसेजमध्ये लवाटे भेटले. तोच उत्साह, तीच घाई, तोच, काहीतरी शोधणारा चेहरा आणि तीच भिरभिरती नजर... मला समोर पाहून दिलखुलास हसले. आणि पिशवीत हात घातला. एक कागदाचं भेंडोळं समोर धरलं. हा नवा पत्रव्यवहार... ते उत्साहानं म्हणाले, आणि मला, दोन वर्षांपूर्वी भेटलेले लवाटे आठवले. तेव्हा माझ्या ऑफिसात त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर खूप अस्वस्थता आली होती. मग एक लेखच तयार झाला, आणि त्यावर अक्षरशः प्रतिक्रियांचा पाऊस पडला. परवाच्या भेटीमुळे तो लेख पुन्हा आठवला उरले जगणे, मरणासाठी... ‘‘नमस्कार. मी लवाटे.

माझे जिम चे प्रयोग ... जिम मधली गाणी

लेखक अमर विश्वास यांनी बुधवार, 20/09/2017 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी जिम मध्ये एक जबरदस्त गाणे ऐकले ... अर्थात जिम मध्ये कुठली गाणी व का लावतात हा एक वेगळा संशोधनाचा मुद्दा आहे ... बहुदा सकाळी लवकर अर्धवट झोपेत व्यायामासाठी येणाऱ्यांना जागे ठेवणे या एकाच शुद्ध हेतूने हा गाण्यांचा उपक्रम चालत असावा ... तर आज कुल डाऊन करत असताना ते मंजुळ सूर कानावर पडले (आदळले??? )... काय अर्थपूर्ण शब्द होते .. He is most wanted मुंडा ... आधी तर मला मुंडा च्या ऐवजी गुंडा असेच ऐकू आले ... अर्थात त्याने फारसा फरक पडला नसता .. तर हे असे अर्थपूर्ण शब्द त्यालाच साजेशी चाल .. आणि मागे वाजणारा (गडगडणारा?) वाद्यवृंद ... इतका चपखल कि शब्द पण नीट ऐकू येऊ नयेत ... (तसही मुंडा ..