Skip to main content

लेख

पहिल्या महायुद्धातील कोल्हे

लेखक अमित खोजे यांनी बुधवार, 10/01/2018 02:11 या दिवशी प्रकाशित केले.
कोल्हा हा कुत्र्याच्या जातीतील एक अत्यंत हुशार, कळपात राहणारा, आणि अत्यंत निष्ठुर प्राणी आहे. पहिल्या महायुद्धाच्या काळात १९१६-१९१७ मध्ये कडाक्याच्या हिवाळ्यात विल्नीयस आणि मिन्स्कच्या भागात जर्मन आणि रशियन सेना एकमेकांशी लढत होत्या. बर्फात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लढताना दोन्हीकडच्या सैन्याची अगदी दैन्यावस्था झाली होती. तेथील बर्फाळ भागात राहणाऱ्या कोल्ह्यांनाही युद्धात मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांची चांगली मेजवानी मिळत होती. जिवंत माणसाच्या गरम रक्ताची चटक त्यांना लागत चालली होती. थोडा धीर दाखवून ते एकट्या दुकट्या सैनिकांवर देखील हल्ला करू लागले.

अनवट वाट २

लेखक अनाहूत यांनी सोमवार, 08/01/2018 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
सुरेखा , तिचं नाव येताच मनात कालवा कालव झाली . ती मनात होतीच कायमची पण फक्त माझ्या समोर, पण आज असं दुसऱ्यांकडून ऐकताना बरंच वेगळं वाटलं . खरंच मी थोडं धाडस करायला हवं होत का ? या समाजाला , घाबरून कि इतर काही . कि ते नेहमीचंच लोक काय म्हणतील या विचाराने ? त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती आणि आता परिस्थिती वेगळी आहे . तेव्हा सगळे नातेवाईक, भावकी या सगळ्याच्या विरुद्ध होती . आणि त्यांचा मान कि मन राखण्यासाठी कि आणखी कश्यासाठी आज आम्ही सोबत नाही . पण हे सगळे तरी कुठायत आता आमच्या सोबत आता प्रत्येकजण आपापल्या कामात , परिवारात व्यस्त आहे आणि मी मात्र त्यावेळी .... " अहो कधी येणार आहेत साहेब ?

'आप' तो ऐसे ना थे..!

लेखक अँड. हरिदास उंबरकर यांनी शुक्रवार, 05/01/2018 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
'आप' तो ऐसे ना थे..! सत्ता नावाची गोष्टच अशी असते कि ती भल्याभल्याना कळसूत्री बाहुल्याप्रमाणे नाचवत राहते. सत्तेचा उपयोग नीती आणि विवेकाने केला तर तिच्यामुळे माणसातले माणूसपण फुलते. मात्र, हीच सत्ता डोक्यात शिरली कि ती माणसाच्या नैतिक अधःपतनालाही कारणीभूत ठरू शकते. कुणी सत्तेचा वापर जनहितासाठी करतो.. तर कुणी या सत्तेच्या भरवश्यावर आपला स्वार्थ साधून घेतो. सत्ता माणसाला घडवतेही आणि बिघडवतेही. हातात सत्ता असताना नीती नियम आणि तत्तवांचे पालन करून घडलेल्या व्यक्तीची इतिहास नोंद घेतो. तर सत्तेसाठी तत्व सोडून स्वार्थ जपणाऱ्या व्यक्तीला इतिहासही माफ करत नाही, हा सुद्धा एक इतिहास आहे.

स्टोरीज ऑफ युअर लाईफ अँड अदर्स-पुस्तक परिचय

लेखक पिशी अबोली यांनी शुक्रवार, 05/01/2018 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या वर्षात अनेक पुस्तकं अर्धवट वाचून सोडून दिली, काही तीच तीच पुन्हा पुन्हा वाचली, अगदी मोजकी पूर्ण केली. त्या पूर्ण केलेल्यातलं एक 'स्टोरीज ऑफ युअर लाईफ अँड अदर्स'. हे पुस्तक वाचायला निमित्त झालं ते याच्याही आधीच्या वर्षात आलेल्या 'अरायव्हल' चित्रपटाचं. या पुस्तकातील एका लघुकथेवर आधारलेला हा चित्रपट बराच नावाजला गेला. पण हे निमित्ताचं अवांतर आवरून नेहमीसारखं आवडलेलं नोंदवण्यापुरतं पुस्तकाबद्दल लिहिलेलं हे थोडंसं. टेड चियांग या लेखकाच्या ठिकठिकाणी प्रकाशित झालेल्या आठ वेगवेगळ्या लघुकथांचा हा संग्रह आहे.

शेजाऱ्याचा डामाडुमा- मालदीवमध्ये 'बिधेयसी' सत्ता आणि इस्लामची वाटचाल - मालदीव भाग ५

लेखक अनिंद्य यांनी गुरुवार, 04/01/2018 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
मालदीव मालिकेतील या आधीचे 4 भाग अनुक्रमणिका वापरून वाचता येतील. चौथा भाग इथे आहे :- http://www.misalpav.com/node/41679  मालदीवच्या इतिहासाची नाळ भारताप्रमाणेच श्रीलंकेशीही जोडलेली आहे. इतिहासात श्रीलंकेत घडणाऱ्या घटना, तेथील राज्यकर्ते आणि व्यापारी इत्यादींची मालदीवच्या स्थानिक बाबींमध्ये बरीच दखल असावी असे आढळते.

तू कसला भिक्या? तू तर श्रीमंत्या!

लेखक Jayant Naik यांनी मंगळवार, 02/01/2018 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
तू कसला भिक्या? तू तर श्रीमंत्या! नदीच्या च्या काठी ,घाटावर नेहमी वर्दळ असे. घाटाच्या थोडे पुढे एक दत्ताचे पुरातन देऊळ होते. सकाळ संध्याकाळ आरतीचे आणि घंटेचे आवाज आसमंतात भरून जात असत. देवळात गेले कि मोठे प्रसन्न वाटे. देवळाच्या शेजारीच एक उंबराचे झाड होते. ते सुद्धा त्या मंदिरासारखेच पुरातन होते. कदाचित मंदिरापेक्षा जास्त पुरातन असावे. त्या झाडाभोवती बसण्यासाठी एक पार कुणीतरी बांधला होता. तो मात्र नुकताच कुणी तरी बांधला असावा. आज त्या पारावर एक साधू महाराज बसले होते. त्यांच्या समोर त्यांचे सात आठ भक्त गण बसलेले होते. स्वामीजी मोठ्या गोड आवाजात भगवत गीतेवर काही भाष्य करत होते.

सांस्कृतिक भारत (संक्षिप्त)

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 01/01/2018 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे भारत देशाची राजधानी दिल्ली असून भारताचे सर्वात मोठे शहर मुंबई हे आहे. भारताची आर्थिक राजधानी सुध्दा मुंबईच आहे. देशाचे भौगोलिक क्षेत्रफळ 3,287,263 चौरस किमी इतके आहे. 2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 1,210,854,977 इतकी आहे. (आजची-2017 ची लोकसंख्या 1,293,057,000 इतकी असावी.) भारताची साक्षरता 86.43 टक्के असून राष्ट्रीय अधिकृत भाषा हिंदी आणि इंग्रजी या असल्या तरी देशात त्या त्या राज्यात त्या त्या प्रांतीय भाषा अधिकृत मान्यताप्राप्त आहेत.

पाथेय

लेखक चंद्रकांत यांनी रविवार, 31/12/2017 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
पाथेय शुभेच्छा... एक लहानसा शब्द. म्हटलं तर खूप मोठा आणि नाहीच मानलं, तर अगदी बिंदूएवढा. आस्थेने पाहिलं तर आभाळाएवढा; नाहीच असं बघता आलं तर अगदीच नगण्य, नजरेत न भरण्याएवढा. तरीही या शब्दाच्या असण्या-नसण्याला मर्यादांचे तीर धरून वाहणाऱ्या आयुष्यात अनेक आयाम असतात. ते असावेत की नाही, याबाबत कोणास काय वाटते माहीत नाही. पण कोणी कुणाला शुभेच्छा दिल्यात म्हणून प्रगतीची शिखरे एखाद्याला सत्वर संपादित करता येतात असं नाही. आणि नाही दिल्यात, म्हणून दैनंदिन जगण्याच्या प्रवाहात फार काही क्रांतिकारक बदल घडतात असंही काही नसतं.

अनवट वाट

लेखक अनाहूत यांनी शनिवार, 30/12/2017 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
" बापू " कुणी हाक मारली ? वळून पाहिलं , ' अरे हि इथे कशी आणि कशाला हाक मारतेय आपल्याला , ' चवचाल ' आणि कायकाय शब्द ऐकलेत हिच्याबद्दल . उगाच कुणी पाहिलं आपल्याला इथं तिच्या सोबत तर काय बोलतील ? पण आता समोरून न बोलता जाऊ तरी कस ? शेवटी पर्याय नसल्यामुळे तिला समोर जाण्याशिवाय पर्याय नव्हता . "अरे बापू इकड कूठ ? " .... ती " नाही जरा काम निघालं होत म्हणून आलो होतो , पण तू इकडे इतक्या लांब कशीकाय ? "... मी " काय सांगू आणि काय नाही ? चल तिथं चहा घेऊ मग बोलूया कि . "... ती " नाही नको म्हणजे ...

रोहनची परीक्षा .

लेखक Jayant Naik यांनी शुक्रवार, 29/12/2017 07:35 या दिवशी प्रकाशित केले.
एका बाल मनाची घालमेल!रोहन परीक्षेत पास झाला पण त्याचे आई बाबा कोणत्या परीक्षेत नापास झाले?.