Skip to main content

लेख

मला भेटलेले रुग्ण - १३

लेखक डॉ श्रीहास यांनी मंगळवार, 27/02/2018 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/42057#new हि बाई नवऱ्यासोबत येते गेल्या ३ वर्षांपासून आणि आजही ही दोघं आले .... तब्येतीत चांगला फरक आहे म्हणून औषधं कमी करत करत आता फक्त एकच नियमीत आणि एक गरजेप्रमाणे असं प्रिस्क्रीपशन वर लिहून दिलं आणि पुढची व्हिसीट ३ महिन्यांनी सांगीतली, पण त्या पेशंटच्या चेहेऱ्यावरचा ताण जाणवत होता म्हणून परत विचारलं की सध्या अजून काही त्रास नाही ना ? झोप लागते का बरोबर ? .....

बॉलीवूडची 'चांदणी' निखळली!

लेखक अँड. हरिदास उंबरकर यांनी सोमवार, 26/02/2018 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
बॉलीवूडची 'चांदणी' निखळली! जीवनातलं अटळ वास्तव म्हणजे मृत्यू! देह धारण करणाऱ्या प्रत्येकाला या वास्तवाला कधी ना कधी सामोरं जावंच लागतं. मात्र, हे वास्तव स्वीकारताना मनात एक नीरव शांतता निर्माण होते. वयाच्या कोणत्याही टप्प्यात मृत्यू हा शब्द अंगाचा थरकाप उडवून देतो. 'मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा..'या गदिमांच्या ओळीप्रमाणे माणसाचे सर्व तर्क एकाजागी स्तंबीत होऊन जातात. मानला वेगळीच रुखरुख लागून जाते. 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' या ओळींचा अर्थ आपसूकच डोळ्यासमोर तरळू लागतो. जन्मलेल्या प्रत्येकाला मृत्यू आहेच; पण तो अवेळी आला की कुठलाही संवेदनशील माणूस काही क्षण हळहळल्याशिवाय राहत नाही.

पुरस्काचे खारमुरे

लेखक परशुराम सोंडगे यांनी सोमवार, 26/02/2018 04:24 या दिवशी प्रकाशित केले.
कथा अाणि व्यथा -------------------------अ पुरस्काराचे खारमुरे *************** अाज सकाळीची गोष्ट.मी घाईत चाललो होतो.तेवढयात अामचा मित्र विकास लांडगेनी मला आवाज दिला.ते अावाज देणं म्हणजे साक्षात बोंबलणंच होतं.लांडगे फार उत्साहात होता.त्याचा उत्साह इतका होता की तो पार धावतच माझ्या जवळ आला.त्याचं अापल्याकडे काय काम असेल किंवा असू शकेल याचा अंदाज काढणयात गर्क असतानाच ती स्वारी पार मला येऊन धडकली. हातानेच ऒढू लागला."चल घरी चहाला." "चहा? कशाला तसदी देतोस वहिनीला." "त्यात काय तसदी? च्या तर प्यावाच लागेल आज." "आज काही विशेष?" "विशेषच अाहे.पेपर नाही वाचले काआज?

पुरस्काचे खारमुरे

लेखक परशुराम सोंडगे यांनी सोमवार, 26/02/2018 04:24 या दिवशी प्रकाशित केले.
कथा अाणि व्यथा -------------------------अ पुरस्काराचे खारमुरे *************** अाज सकाळीची गोष्ट.मी घाईत चाललो होतो.तेवढयात अामचा मित्र विकास लांडगेनी मला आवाज दिला.ते अावाज देणं म्हणजे साक्षात बोंबलणंच होतं.लांडगे फार उत्साहात होता.त्याचा उत्साह इतका होता की तो पार धावतच माझ्या जवळ आला.त्याचं अापल्याकडे काय काम असेल किंवा असू शकेल याचा अंदाज काढणयात गर्क असतानाच ती स्वारी पार मला येऊन धडकली. हातानेच ऒढू लागला."चल घरी चहाला." "चहा? कशाला तसदी देतोस वहिनीला." "त्यात काय तसदी? च्या तर प्यावाच लागेल आज." "आज काही विशेष?" "विशेषच अाहे.पेपर नाही वाचले काआज?

मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग १.

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी शुक्रवार, 23/02/2018 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग १. मराठी भाषेत संस्कृत भाषेतून घेतलेले शेकडो शब्द आणि तशीच वचने दैनंदिन वापराची झाली आहेत. ती इतकी सरावाची आहेत की त्यांचा उगम बहुधा विस्मृतीत गेलेला असतो. असे काही शब्द आणि वचने खाली देऊन त्यांचे उगम शोधण्याचा प्रयत्न मी केला आहे. प्रस्तुत लिखाणात असे २० शब्द आणि वचने आहेत. पाळीपाळीने आणखी अनेक शब्द आणि वचने मी एकूण सहा भागांमधून सदस्यांपुढे ठेवणार आहे. प्रथम शब्द किंवा वचन, नंतर त्याचा स्रोत आणि अखेरीस सरल अर्थ असे ह्या लिखाणाचे स्वरूप आहे. ह्या लेखनाचे एकूण सहा भाग ह्यापूर्वी 'उपक्रम'मध्ये प्रकाशित केले होते आणि तेथे सदस्यांना ते आवडल्याचे दिसले.

शेवटचा उपाय...

लेखक Jayant Naik यांनी शुक्रवार, 23/02/2018 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटचा उपाय ... मनीषा घोरपडे आपल्या खास मैत्रिणीच्या घरून निघाली तेव्हा चेहऱ्यावर हसू घेऊनच. खरच सगळ्या पुरुषांना बायका म्हणजे अबला ,त्यांची काळजी घ्यायची जबाबदारी आपलीच आहे असे का वाटते? आज तिची मैत्रीण उज्वला निकम हिचा विवाह ठरला म्हणून उज्वालाने तिच्या घरी पार्टी ठेवली होती. मोजकेच लोक होते पण बहुतेक सगळे मनीषाला ओळखत होते .हा प्रकाश का असेच काही तरी नाव असलेला तरुण तिथे कोणीतरी नवीनच होता . मनीषाला तो ओळखत नव्हता. मान्य आहे की आज मनीषा खूप सुंदर दिसत होती.पावसाळ्याचे दिवस म्हणून तिने आज डार्क हिरव्या रंगाचा ड्रेस घातला होता.

मला भेटलेले रूग्ण - १२

लेखक डॉ श्रीहास यांनी गुरुवार, 22/02/2018 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/41320 ओपिडी संपत आली होती, आज फारसे पेशंट नव्हते मी रिलॅक्स मुड मध्ये होतो आणि तेवढ्यात एकजण केबिन मधे शिरला .... हातात भली मोठी पिशवी , बरेच रिपोर्ट्स असावेत असा अंदाज आला.

फेस्टिव्हल डायरीज..!! - कथा : २

लेखक रा.म.पाटील यांनी बुधवार, 21/02/2018 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
फेस्टिव्हल डायरीज..!! (Decorate Your Love..) कथा – २ व्हॅलेंटाईन.. (प्रेमाची नवी नजर..) ती- "त्या प्रसिध्द पुस्तकाच्या लेखकाने लिहिले आहे की, ' गुलाब आहेच असा सर्वाना आवडण्यासारखा.. पण प्रेमावर फक्त गुलाबाचीच मक्तेदारी का? कधी तरी मोगरा किंवा चाफ्यालाही उमेदवारी देऊन पहावी.. शेवटी सुगंधी ते पण आहेतच ना..!'" तो- "बरोबरच लिहले आहे की मग.." ती- "हो मान्य आहे ते पण मला सांगा प्रेमासाठी गुलाबाचं का निवडला असेल.. कारण पुष्पवर्गात तोच एकमेव असेल की ज्याला मिळवण्यासाठी काटेही टोचून घ्यावे लागतात.. म्हणजे प्रेम मिळवायचे असेल तर तुम्हाला अडथळे येणारच हेच सुचवले जात असेल गुलाबाकडून..

व्यावसायिक कला १) बुरुड कला

लेखक जागु यांनी मंगळवार, 20/02/2018 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
एका नवीन लेखाच्या मालिकेला सुरुवात करत आहे. आपल्या आजूबाजूला अनेक व्यावसायिक कला आहेत ज्यांचे स्थान आता कमी होत चालले आहे. त्यांची प्रत्यक्ष त्या कलाकारांकडून माहिती घेऊन ती सादर करण्याचा हा एक प्रयत्न. तर अशा कलांच्या भरभराठीसाठी शुभेच्छा देऊन आजची पहिली कला ह्या लेखाद्वारे सादर करत आहे. (फोटो क्रोम वरून दिसतील) बुरूड समाजाचा बांबूच्या विणकामाचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे सुबक कलाकुसर. टोपल्या, सुपे, डोबूल, परड्या इतर वस्तू ह्या बुरूड समाजातील व्यक्ती सराईतपणे सुंदर विणतात.

नोकरी आणि पकोडे

लेखक डॉ. एस. पी. दोरुगडे यांनी मंगळवार, 20/02/2018 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
ज्यांना तुम्ही सांगताय- नोकरी नाही, तर रोजगार करा मुद्रा योजनेतून कर्ज घ्या आणि 'पकोडे' तळा! ऐका, त्यांच्याकडे खऱ्या पदव्या आहेत त्यांना खऱ्या नोकऱ्या हव्या आहेत त्यांचे पालक त्यांच्यासाठी झिजलेत त्यांच्या कष्टातून फीचे पैसे आलेत त्यांचे स्वप्न चांगल्या नोकरीचे होते हे नाही कि त्यांनी 'पकोडे' तळावेत! त्यांच्या पदव्या हव्या तर डोळ्यांनी बघा त्या खऱ्या असल्याबद्दल खात्री करून घ्या या त्या पदव्या नाहीत की ज्यांवर कोर्टात केसेस चालू आहेत वा ज्या संशयास्पद आहेत ज्यांबद्दल माहितीच्या अधिकारातही माहिती दिली जात नाही! ज्या मुळात आहेत का नाही तेच माहित नाही! हे तेच लोक आहेत जे खऱ्या शाळेत गेलेत