Skip to main content

लेख

दोसतार-१३

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 30/06/2018 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा https://www.misalpav.com/node/42845
विनू अरे हात पाय धूवून घे की. आणि हे दप्तर का असे फेकले आहेस? त्या स्लीपर अगोदर नीट कोपर्‍यात काढून ठेव. आई आतून बोलावत होती. तुला रात्री जेवायला ताम्दळाची खीर चालेल ना? कुई कुई.......... काय? कुई कुई काय . काय म्हणतो आहेस नीट सांग. कुई. परत तेच. मी त्या काळी कुत्रीच्या पिललांचा विचार करत होतो आणि त्या नादात आईला होय म्हणायच्या ऐवजी कुई कुई म्हणत होतो. आज बहुतेक ती पिल्ले स्वप्नातही येणार.
पुस्तके नसल्यामुळे शाळेचा अभ्यास वगैरे अजून काही सुरू झालेले नव्हते.

दी टायगर्स असोसिएशन - रहस्यकथा भाग २

लेखक शब्दानुज यांनी बुधवार, 27/06/2018 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
लेखमाला अर्धवट सोडण्याचे पाप माझ्या माथी लागले आहेच. त्याबद्दल सर्वांची क्षमा मागतो. या मालिकेतील पुढचे लेख ३-४ दिवसांचे अंतर ठेवून प्रकाशित करेन जेणेकरून इतर लेखांवर अन्याय होणार नाही. भाग.1 https://www.misalpav.com/node/४२५८४ ------------------ आमचा नूकताच डिप्लोमा करुन झालेला होता. एकीकडे मित्रांच्या ताटातूटीमुळे होणारा त्रास आणि दुसरीकडे खूणावणारी कॉलेज लाईफ असे ते सोनेरी दिवस.

सुखाचं मृगजळ

लेखक अबोलघेवडा यांनी बुधवार, 27/06/2018 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी एका मित्राची भेट झाली. थोडासा दुःखी वाटत होता. मी विचारलं काय झालं? तर म्हणाला बायकोशी पटत नाही. मी परत विचारलं, अरे हे काय अचानक? तर म्हणाला अचानक वगैरे काही नाही. तसं लग्न झाल्यापासूनच आमचं बऱ्याच गोष्टींवर पटत नाहीये. पण आता जरा त्याची फ्रिक्वेन्सी वाढली आहे. त्याला म्हटलं अरे एकदा का कळलं ज्या गोष्टींवर पटत नाही की मग त्या गोष्टी उगाळा कशाला? ज्या गोष्टींवर तुमचं पटतं तेच बोलत जा ना तिच्याशी. तर मला म्हणाला ‘अरे तुला काय माहित आमचं कुठल्या गोष्टींवर पटतं ते.

आठवणी

लेखक चंद्रकांत यांनी मंगळवार, 26/06/2018 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
‘आठवणी’ एक लहानसाच, पण अर्थाचे अनेक आयाम असणारा शब्द. आनंदाच्या पाकळ्या घेऊन उमलत राहणारा, कधी वेदनांच्या व्यथा घेऊन कोमेजणारा. आठवणी समुद्रासारख्या अथांग. आभाळासारख्या अफाट. क्षितिजासारख्या अमर्याद. आयुष्याच्या वाटेवरून प्रवास घडताना इच्छा असो, नसो स्मृतींची सोबत घडत राहते. कुणासाठी त्या आनंदाचं अभिधान असतात, तर कुणासाठी वेदनांचे वेद. आठवणींचं पाथेय घेऊन निघालेली माणसे सुखांचे कवडसे हाती लागताना हरकतात. पदरी पडणाऱ्या वंचनेच्या वेदनांनी विकल होतात. त्यांचं असणं, नसणं जेवढं कालसापेक्ष तेवढंच परिस्थितीसापेक्ष. आठवणींच्या ओलाव्याने मनाचं आभाळ भरून येतं.

....कार्यकर्ता 2

लेखक Patil 00 यांनी मंगळवार, 26/06/2018 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
एके दिवशी साहेबांनी सत्तूला बोलावले. म्हणाले, "आपलेच दात आणि आपलेच ओठ. चिरंजीव ऐकायला तयार नाहीत. पण मला चिरंजीवा पेक्षा सत्तू कार्यकर्ता जवळचा आहे. ज्यानं माझ्यासाठी उभी हयात घालवली, त्यांना आम्ही विसरणार नाही. पण चिरंजीव ऐकत नाहीत. आम्ही काय करावं? तू म्हणशील तस करू." साहेबांची अवस्था बघून सत्तूला भरून आलं. सत्तूनं साहेबाना ठामपणे सांगितलं, "धाकल्या साहेबांचा अर्ज भरा. घरातच फाटाफूट नको. आम्ही पक्षासाठी एवढे दिवस राबलो. आता साहेबांच्या घराण्यासाठी राबु........" सत्तूला उदास वाटत होतं. हयात राजकारणात घालवली. घरात बापाच्या जागी साहेबांचा फोटो लावला. बागा पण गेल्या. शेती संपली.

.....कार्यकर्ता.....

लेखक Patil 00 यांनी सोमवार, 25/06/2018 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
गरीबांचा बुलंद आवाज..... साहेबांना प्रचंड बहुमताने विजयी करा......... नाद नाय करायचा वाघाचा... येऊन येऊन येणार कोण??" घोषणांनी सत्तुचा आवाज पार बसला होता. दिवसभर पायाला भिंगरी. एका दिवसाला पाच- सहा गावं. मतदान जवळ आलेलं. गावागावात बूथ. मतदार याद्या. पोलिंग एजेंट. स्लिपा वाटायच्या. मतदानाच्या आदल्या दिवशी जेवणावळी. इतर गोष्टी. सगळी कामं सत्तूला करावी लागायची. साहेबांचा सत्तूवर खूप विश्वास. भरोशाचा कार्यकर्ता.... पक्षाचं काम करताना सत्तूचं कामावरलं लक्ष उडालं. पण त्याला वाटायचं साहेबांचा आशीर्वाद आहे. साहेब आहेत तोपर्यंत काहीच कमी नाही..... मतमोजणी झाली. साहेब निवडून आले. गुलालाची उधळण.

साखळी Break the chain

लेखक aanandinee यांनी सोमवार, 25/06/2018 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी माझा मूड अगदी छान होता. काही विशेष कारण होतं असं नाही पण कधी कधी उगीचच छान वाटत असतं ना, तसा. आणि मग अचानक कुणाशीतरी बोलताना त्यांनी काहीतरी शेरा मारला, दुखावणारा, अगदीच अनावश्यक, झालं .... माझ्या छान मूडच्या फुग्याची सारी हवा गेली. त्यानंतर कामानिमित्त (professionally) मी ज्या कोणाला भेटले त्यांच्याबरोबर मी वेळ मारून नेली. पण घरी आल्यावर मात्र माझ्या मुलाच्या लहानश्या चुकीवर मी उखडले. इतर दिवशी कदाचित त्या लहानश्या गोष्टीवरून मी एवढी ओरडले नसते. मग त्या दिवशी का ओरडले? मी स्वतःशी विचार केला, माझी सबब तयार होती, “मी रागावले कारण दुसर्या कोणीतरी आधीच मला चिडवून ठेवलं होतं.