Skip to main content

लेख

लहानपणाची आठवण

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 06/08/2018 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळी ढग आकाशात होते. समोर जॉगींग ट्रॅक आणि मधले खेळाचे मैदान होते. आज कुणीच खेळत नसल्याने मोकळे होते ते. त्या शांत वातावरणात मी भरभरून मोकळा श्वास घेतला. शहरातल्या त्या जॉगींग ट्रॅकवर पावसाळ्यामुळे गर्दी बरीच कमी होती. एका कोप-यात बसलो. लहान मुलं खेळत होती. काही व्यक्ती चालत होत्या. काहीपावसाळ्यामुळे, ग्रीन जीम करत होत्या. मी पावसाळ्यात तयार झालेल्या हिरव्यागार गवताच्या काठावर बसलो होतो. समोर असणारे रानटी गवत पाहून मला माझ्या लहाणपणाचे दिवस आठवले. सहावी सातवीत असेन तेव्हा. आमच्या घराच्या पुढच्या गल्लीत तालूक्याचे न्यायालय होते. तेथे मोठे मोकळे आवार होते.

फेस्टिव्हल डायरीज..!! - कथा : ७

लेखक रा.म.पाटील यांनी सोमवार, 06/08/2018 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
फेस्टिव्हल डायरीज..!! (Decorate your love..) कथा - ७ वारी.. प्रेमाचे रिंगण.. ती बावरली होती.. तिच्यासाठी हा अनुभव नवाच होता शहरात.. पण तोच तिला तो दिसला आणि तिला बरे वाटले.. पुढे तो एकटाच चालत होता.. हा आपल्या ऑफिसमधला तर नाही ना.. ती विचार करतच होती की हाक तरी कशी मारायची.. तोच त्याने मागे वळून पाहिले.. तो तोच होता ह्याची तीला खात्री पटली.. तोही तिच्याकडे पाहून हसला.. चला कोणीतरी सोबतीला भेटले नाहीतरी एवढं अंतर चालणे तेही एकट्याने.. तिला जीवावरच आले होते..

काळी मांजर

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 05/08/2018 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

काळी मांजर

मी आता जे लिहिणार आहे ते थोडेसे खाजगी स्वरुपाचे आहे आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवावा असा माझा बिलकूल आग्रह नाही. आता मी ज्याचा पुरावा देऊ शकत नाही त्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवावा असे मी तरी कुठल्या तोंडाने म्हणणार ? आणि समजा म्हटले तर तुम्ही मला वेड्यात काढणार नाही का ? पण मी वेडा नाही आणि स्वप्नेही पाहात नाही.

पहिले महायुद्ध! प्रकरण १ भाग २

लेखक आदित्य कोरडे यांनी शनिवार, 04/08/2018 08:06 या दिवशी प्रकाशित केले.
पहिले महायुद्ध! प्रकरण १ भाग २ मागील भागात आपण बिस्मार्कच जर्मनीत उदय (म्हणजे तेव्हाचा प्रशिया) आणि त्याचे जर्मन एकीकरणाच्या दृष्टीने सुरु असलेले प्रयत्न इथपर्यंत आलो होतो.

i care for u

लेखक अनाहूत यांनी गुरुवार, 02/08/2018 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
" कसा आहेस ? " " तसाच . जशी तू सोडून गेलीस , तेव्हा होतो तसाच आहे . " " आपल्यात काही नव्हतं " " तुझ्याबाजूने . माझ्याबाजूने तर नेहमीच होत, आहे आणि राहील " " बाय द वे माझं लग्न झालं " " माहित आहे मला " " तू केलस कि नाहीस लग्न " " जिच्यावर प्रेम आहे तिचा अजून होकार आला नाही " " ओह्ह कोण आहे ती " " तू आणि कोण ? " " माझं लग्न झालय " " माहितेय मला लग्नाचं आणि डिवोर्सचही " तिला काय बोलावं हे सुचत नव्हतं " तुला काय करायचं आहे ?

भारांच्या जगात... २

लेखक अजिंक्य विश्वास यांनी बुधवार, 01/08/2018 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
भटांच्या वाड्यातील भुतावळ- भा. रा. भागवत भटांच्या वाड्यातील भुतावळ भूत म्हणले की, आजपण आपले कान टवकारले जातात. ह्या भुतावळीचे नाव वाचल्यावर माझे देखील तसेच झाले होते.

पहिले मी जेव्हा तुला ( भाग ६ )

लेखक अनाहूत यांनी बुधवार, 01/08/2018 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
" I m sorry " तिला त्याच्या डोळ्यात दिसणारं सॉरी त्याच्या ओठातूनही बाहेर पडलं होत ."असू दे रे किती मनाला लावून घेतोस . " " नाही मी तुला असं अडवायला नको होत . " त्याच्या बोलण्यात तो दुखावल्याचे जाणवत होत . " Its ok " " नाही पण ... " " पुरे यार किती तेच ते दुसरं काही तरी बोल ना मला कंटाळा आलाय तुझ्या sorry चा " " माझा नाही ना आला कंटाळा ? " " काहीही काय " " हो तस असेल तर सांग " " मी जाऊ का , म्हणजे तुला असच बोलायचं असेल तर जाते मी " ती वळून निघाली . " कायमची निघालीस ? मला सोडून ? " त्याच्या डोळ्यात पाणी होत आणि तो याच्यामुळे खूप हर्ट झाला होता . " नाही रे असं काही नाही .

प्रवाहीत ती भाषा...

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 01/08/2018 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे मराठी भाषा म्हणजे शेतीप्रधान ग्रामीण पायाभूत शब्दांची आणि बारा बलुतेदारांची सहज पारंपरिक मौखिक संपदा, जी काही शतकांपासून ग्रांथिक आणि प्रमाणभाषा झाली. मराठी भाषेचा हा पट्टा म्हणजे शेतवाडी आणि शेतीसाठी लागणार्‍या वस्तूंच्या उपयोजनाची भाषा. शेतीबाडीची आणि ग्रामीण राहणी साहणीची भाषा जेव्हा समजण्यापलीकडे जाईल तेव्हा कृषी प्रधान मूळ लोकसंस्कृती आणि पर्यायाने मराठी भाषेचा प्रवाह नवे वळण घेऊ लागेल. विशिष्ट परिसरात बोलली जाणारी भाषा एकच असते. ती विशिष्ट नावाने ओळखली जाते. जशी मराठी.

‘मास लीडर’ सुधीर मुनगंटीवार...प्रभावी, उत्तम आणि अफाट जनसंपर्क व कुशल प्रशासन, उत्तम नियोजन, आदर्श व्यवस्थापन...

लेखक मुकेश चौधरी मेळघाट यांनी मंगळवार, 31/07/2018 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
‘मास लीडर’ सुधीर मुनगंटीवार प्रभावी, उत्तम आणि अफाट जनसंपर्क व कुशल प्रशासन, उत्तम नियोजन, आदर्श व्यवस्थापन... राजकारण हा प्रांतच स्पर्धेचा, दगदगीचा आणि सतत कार्यरत ठेवणारा आहे. अनेक जण वेगवेगळ्या अपेक्षांनी नेत्याकडे पाहत असतात. त्या अपेक्षा पूर्ण करण्याची आणि त्याचबरोबर कोणालाही नाराज न करण्याची खुप मोठी कसरत करावी लागते. हि कसरत पूर्ण करत असताना राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकीय पटलावर आपली अमिट छाप पाडणारे, एक सर्वसामान्य कार्यकर्ता, भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि आता अर्थमंत्री-वनमंत्री हा सुधीरभाउंचा प्रवास थक्क करणारा आणि प्रेरक आहे, रोमांचक, थरारक आहे.

भारांच्या जगात... १

लेखक अजिंक्य विश्वास यांनी मंगळवार, 31/07/2018 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
सूर्यावर स्वारी? - भा रा भागवत. . माझा प्रिय मित्र सागर ह्याने माझ्या डोक्यात काही वर्षांपूर्वी भागवतांच्या संक्षेपाचे मूळ रूप शोधायचे खूळ डोक्यात घातले, त्याबद्दल त्याचे मानावे तेवढे आभार आणि उपकार कमीच आहेत!