Skip to main content

लेख

आमचे अण्णा!-१

लेखक VINOD J. BEDGE यांनी शनिवार, 18/08/2018 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे अण्णा!-१ आमचे अण्णा म्हणजे माझे आजोबा एक अतरंगी व्यक्तिमत्व,एकदम दिलखुलास. सात बहिणींच्या नंतर झाले असल्याने पणजोबांनी लाडावून ठेवलेले त्यामुळे सगळे रंगढंग,मजामस्ती आणि काय काय असतील ते सगळे अनुभव गाठीला असलेले. तसं आमचं गाव कवठेमहांकाळ तालुक्यातलं आता दुष्काळी पण आजोबांच्या वेळी पाऊसपाणी चांगल असलेलं त्यामुळे हळद ,पानाच मळा, ज्वारी,असं सधन आणि चार पैसे राखून असलेले लोक, एकंदर सुखी म्हणावं असं गाव. तर असे हे एकुलते चिरंजीव आणि त्यांचे एक आप्पा नावाचे मित्र फुल धिंगाणा करायचे.

दी टायगर्स असोसिएशन - रहस्यकथा भाग ४

लेखक शब्दानुज यांनी बुधवार, 15/08/2018 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग 2 भाग 3 सावंतांनी एकदाचा निर्णय घेतला. बाबांना ते म्हणाले , " देशमुख साहेब यावेळी मी तुमच्यावर विश्वास ठेवतो. ही सगळी कागदे इथे राहू देत. मला सगळ्या गोष्टीचा विचार करायला वेळ लागेल. तोपर्यंत तुम्ही हे शहर सोडून जाऊ शकत नाही. काही वेगळी बातमी कळाली तर मला कळवत रहा. पुढे काय करावे हे समजतच नव्हते.

पहिले महायुद्ध! प्रकरण १ भाग ४

लेखक आदित्य कोरडे यांनी बुधवार, 15/08/2018 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागांची लिंक https://www.misalpav.com/node/43088 https://www.misalpav.com/node/43118 https://www.misalpav.com/node/43144 मागील प्रकरणात आपण मोरोक्को आणि बोस्नियन पेच प्रसंगांची थोडक्यात माहिती घेतली. आता पुढच्या भागात आपण युरोपला पहिल्या महायुद्धाकडे घेऊन जाणाऱ्या कटकटी ज्या बाल्कन देशात/प्रदेशात होत होत्या त्या बाल्कन देशांबद्दल आणि तुर्कस्तानच्या ओट्टोमान साम्राज्याबद्दल थोडी माहिती घेऊयात.तसेच ह्या कटकटी काय होत्या?

एका चेक इन ची चित्तारकथा

लेखक मूखदूर्बळ यांनी मंगळवार, 14/08/2018 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
एका चेक इन ची चित्तारकथा कालच गोव्यावरुन मुंबई वर हवाई प्रवास करण्याचा योग आला. येताना बरोबर ताज्या पाले भाज्या, फळ भाज्या, शेंग भाज्या, पाणशेंगा (गोव्यात ज्याला नुसत्ये असे म्हणतात आणि इथे मुंबईत मासे म्हणतात) नारळ, बिस्किट, चकली, शेव,लाडू, इत्यादी इत्यादी पदार्थ आणले. मासे बर्फ घालून व्यवस्थित पैक केले होते. विमान तळावर बैगेज स्क्रीन करण्या साठी टाकल. ऑफीसरने मत्स्य पेटी बाजूला काढली. हे गोवन लोक ( ज्यात मीही येतो) माश्यासाठी साले काहीही करतील.

मैत्र - ३

लेखक शाली यांनी मंगळवार, 14/08/2018 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी एक एक करुन सगळे शामच्या ओट्यावर हजेरी लावत. मग ‘भविष्यात काय करायचे?’ हा विषय सोडून सगळ्या विषयांवर गप्पा चालत. दोन एक तास मग आमचा ओटाकट्टा रंगे. विनोदी विषय निघाला की काकूंना फार त्रास व्हायचा आमच्या हसण्याचा आणि गंभीर विषय निघाला की इन्नीला त्रास व्हायचा. कारण मग तिला किमान दोन वेळा तरी चहा करावा लागे. त्यातही आमचे चहा कमी आणि नखरेच जास्त असत. धोंडबाला बशीच हवी असे तर दत्त्याला वाटीत जास्तीची साखर हवी असे. शाम्याला वरुन थोडी दुधाची साय लागे चहात.

भारांच्या जगात... ४

लेखक अजिंक्य विश्वास यांनी सोमवार, 13/08/2018 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
भारांच्या जगात... ४ उडती छबकडी- भा. रा. भागवत उडती छबकडी- भा. रा. भागवत उडती छबकडी हा भारांचा विज्ञान(वेड)कथा संग्रह! ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे ह्या नुसत्याच विज्ञानकथा नसून वेडकथा देखील आहेत. एक एक कल्पना नुसती धुमाकूळ घालणारी आहे आणि विज्ञानाला धरून देखील आहे. त्या काळी प्रचलित असलेल्या विज्ञान संकल्पना हाती धरून एक सुंदर पार्श्वभूमी निर्माण करण्यात भारांचा हातखंडा होता.

पहिले महायुद्ध! प्रकरण १ भाग३

लेखक आदित्य कोरडे यांनी गुरुवार, 09/08/2018 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागांची लिंक https://www.misalpav.com/node/43088 https://www.misalpav.com/node/43118 मागील प्रकरणात आपण बिस्मार्क, जर्मनीचे एकीकरण, जर्मन राष्ट्र उभारणी, कैसर विल्हेल्म दुसरा ह्याचे जर्मनीच्या राजकीय क्षितिजावर आगमन एवढा भाग पाहिला. इथून पुढे घडत जाणाऱ्या घटना ह्या युरोपियन राष्ट्र आणि सत्ताधार्यांची मानसिकता कशी होती आणि ती कशी बनत/ बदलत गेली त्यावर प्रकाश टाकतात ....

भारांच्या जगात... ३

लेखक अजिंक्य विश्वास यांनी गुरुवार, 09/08/2018 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
भारांच्या जगात... ३ मुक्काम शेंडेनक्षत्र- भा. रा. भागवत मुक्काम शेंडेनक्षत्र ज्यूल्स व्हर्नच्या ' ऑफ ऑन अ कॉमेट' (Off on a comet) या कादंबरीचा हा दुसरा रोमांचकारी भाग!.

कथा पाचवी - बहादुर शाह ज़फ़र व नानासहेब पेशवे

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 07/08/2018 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire कथा पहिली - "कुलसूम ज़मानी बेगम...." दुसरी कथा - गुलबानो कथा तिसरी - शहजादी चवथी कथा - नर्गिस नजर

बहादुर शाह ज़फ़र व नानासाहेब पेशवे

माझ्या स्वर्गवासी आईन

सांगा निबंध कुणी हा पाहिला

लेखक मूखदूर्बळ यांनी सोमवार, 06/08/2018 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
सांगा निबंध कुणी हा पाहिला आज दंतवैद्या कड़े बसलो होतो. साधारण दोन तासांची निश्चिन्ती. दंतवैद्याचा मुलगा साधारण सातवीत असावा.शाळा आय सी इस सी . मास्तरानी गृहपाठ दिलेय होता. चार विषयावर निबंध लिहायचे होते. आमच्या पीढ़ित निबंध लिहीताना ठराविक सुरुवात असायची. आणि शेवटी नेहमी प्रमाणे "अशे हे मामा मला खुप खुप आवडतात" किंवा निबंध गांडूळ वर असेल तर " असे है गांडूळ मला खुप खुप आवडते" किंवा अशे है गाढव मला खुप खुप आवडत असा संपक असायचा. मध्ये मध्ये वरणावर तूप सोडतात तशी सुवचने सोडायची किंवा मोदकात सारण पेरायच तस प्रसिद्ध लेखकांची नावे पेरायची. मधे काहीही लिहील तरी चालायचे. मार्क 10 पैकी 5 मिळत.