Skip to main content

लेख

आईच्या बांगड्या

लेखक मूखदूर्बळ यांनी सोमवार, 05/11/2018 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
आईच्या बांगड्या मला आईच्या हातातल्या बांगड्या आठवतात सारख्या. सोन्याच्या कमी आणि काचेच्या जास्त. आई उठताना, बसताना, काम करताना, पुस्तक वाचताना, शाळेचे पेपर तपासताना किंवा आणि काही करताना त्या काचेच्या बांगड्या एकमेकांना आणि सोन्याच्या बांगड्याना घासूंन एक सुंदर आवाज येत अशे. काचेच्या बांगड्या एकमेकांना घासल्या की किण किण असा आवाज येई. काचेच्या आणि सोन्याच्या बांगड्या एकमेकांना घासल्या की खण खण असा आवाज येई आणि काचेच्या आणि सोन्याच्या बांगड्या एकमेकांना घासल्या की वेगळा आवाज येई. आई जेवण करताना एक मधुरसा सुंदर आवाज येई आणि पहाटच्या वेळी तो आवाज काकड़ आरतीच समाधान देऊन जाई.

Cold Blooded - ५

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 05/11/2018 07:39 या दिवशी प्रकाशित केले.
Cold Blooded - Final - ५ हवालदार माधोसिंग चांगलाच वैतागला होता! गेल्या दोन रात्रींपासून वसंत विहार परिसरातल्या एका बंगल्यावर नजर ठेवण्याच्या कामगिरीवर त्याची नेमणूक करण्यात आली होती. रात्री नऊ वाजल्यापासून तो या ड्यूटीवर हजर झाला होता. सुरवातीचे दोन तास त्याने फूटपाथवर चकरा मारत घालवले होते. कंटाळा आल्यावर तो गाडीत येऊन बसला होता. आदल्या दोन रात्रीही त्याने त्या बंगल्यावर पहारा ठेवलेला होता. पहिल्या दिवशी तिथे येण्यापूर्वी बंगल्यात राहणार्‍या माणसाचा फोटो कोहलींनी त्याला दाखवला होता. गेल्या दोन रात्रीत त्या माणसाव्यतिरिक्तं कोणीही आलं-गेलेलं त्याने पाहिलेलं नव्हतं.

Cold Blooded - ४

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 03/11/2018 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
Cold Blooded - Final - ४ रोहित सिमल्याला पोहोचला तेव्हा दुपारचे तीन वाजले होते. सिमल्याला पोहोचल्यावर त्याने ताबडतोब रोशनीचं कॉलेज गाठलं. जीन्स - टी-शर्ट आणि पाठीवर मोठी सॅक अशा अवतारात असलेला हा तरुण पोलीस अधिकारी असेल यावर कॉलेजच्या स्टाफचा आधी विश्वासच बसेना. रोहितने आपलं आयकार्ड त्यांच्यासमोर ठेवल्यावर अखेर त्यांची खात्री पटली! रोशनी द्विवेदीबद्दल त्याने चौकशी करताच तिचं सर्व रेकॉर्ड त्यांनी त्याच्या पुढ्यात ठेवलं. द्विवेदींच्या घरी मिळालेल्या सर्टीफिकेट्सप्रमाणे रोशनीने हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं, पण तिचं कॉलेजमधलं रेकॉर्ड काही वेगळंच सूचित करत होतं.

क्राईम डायरीज : एक शापित नातं: भाग ६

लेखक कलम यांनी शुक्रवार, 02/11/2018 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी शांभवीच्या घरातून निघून गेल्यावर मात्र एकदाही अमितनं तिला फोन केला नाही. शांभवीच्या कानात त्यानं सांगितलेला प्रत्येक शब्द घुमत होता. आयुष्यात कधी कधी जास्त विश्लेषण करत बसलं तर हातात असलेला क्षण पण आपण घालवून बसतो. शांभवीच थोडंफार तसंच झालं होतं. अथर्वनं एका रात्री जेवताना विषय काढलाच. "काय झालंय तुला शांभवी? पूर्वीसारखी बोलत नाहीस, जेवणावर लक्ष नसतं , परवा सान्वी किती रडत होती आणि तू मात्र कुठंतरी विचारात हरवलेली आणि हे काय? एकही पैंटिंग काढलेलं नाहीयेस इतक्या दिवसात. इज एव्हरीथिंग ओके?" "अह... हो. सगळं ठीक आहे अथर्व.

Cold Blooded - ३

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 01/11/2018 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
रोशनीच्या मृत्यूला आठवडा उलटला होता. अद्यापही केसचा तपास फारसा पुढे सरकत नव्हता. तिचा मित्रं रुपेश हवेत विरुन गेल्याप्रमाणे अदृष्यं झाला होता. त्याचा मोबाईल स्विच्ड ऑफच होता. रोहितच्या सूचनेप्रमाणे रेशमीने रुपेशचा फोटो त्याला पाठवला होता, परंतु त्याचाही फारसा काही उपयोग झालेला नव्हता. डॉ. भरुचांनी हैद्राबादच्या ज्या लॅबमध्ये रोशनीचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवला होता त्या लॅबमधूनही काहीही कळलेलं नव्हतं. रोहितने आपल्या एकूण एक खबर्‍यांना कामाला लावलं होतं, पण परंतु चौफेर शोध घेवूनही रोशनीची पर्स किंवा तिच्या फोनचा अद्यापही पत्ता लागला नव्हता.

गावातली चावडी

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 01/11/2018 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे गाव तिथं चावडी असायचीच. चावडीवर गावातले अनेक प्रश्न सोडवले जात. वार्षिक भाडे मिळवण्यासाठी सार्वजनिक मालमत्तेचे काही लिलावही चावडीवर होत असत. चावडीवर पंचायत भरायची. पंचायत बोलवणे म्हणजे गावातल्या लोकांची बैठक. आजच्या भाषेत मिटींग. गावात दवंडी देऊन चावडीवर लोक बोलवले जात. गावाच्या भल्यासाठी एखादा निर्णय घ्यायचा झाला तर गावातल्या चावडीवर लोक जमत. चावडीत उलट सुलट चर्चा होऊन योग्य तो निर्णय घेतला जाई. गावगाड्याचा सर्व प्रकारचा कारभार चावडीत होत असे. चौ – वाडी म्हणजे चारचौघेजण जमण्याचे ठिकाण ते चावडी. चव्हाटी- चावडी.

मी अतिरेकी...

लेखक कलम यांनी गुरुवार, 01/11/2018 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग पहिला: वय वर्षे ८: मी तिसरी चौथीत असेन त्यावेळी. पाचव्या दिवशी घरच्या गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर अनंतचतुर्दशीपर्यंतच्या कुठल्यातरी एका रविवारी आई बाबा मला आणि माझ्या भावाला सांगलीला फिरायला आणि देखावे बघायला घेऊन जात. सांगलीत पोहोचल्यावर दुपारी चार वाजता बाबा आम्हाला मसाला डोसा खायला घालत आणि त्यानंतर गणपती मंदिरात जाऊन नंतर सगळीकडचे देखावे बघायला सुरुवात होई. त्या वर्षी पण देखावे बघायला सुरु केल्यावर थोड्या वेळांनंतर मला भूक लागली म्हणून बाबांनी एक किलो पापडी मला आणि भावाला खाण्यासाठी घेऊन दिली. एक किलोचा पूडा हातात आल्यावर आम्हा दोघांची अविरत चरंती सुरु झाली.

Cold Blooded - २

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 30/10/2018 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
Cold Blooded - Final - २ "हॅलो, वरळी पोलीस स्टेशन, सब् इन्स्पे. महाडीक बोलतोय..." "गुड मॉर्निंग ऑफीसर! मी डॉ. सदानंद देशपांडे बोलतो आहे. इथे वरळी सी फेसवर एका मुलीची डेडबॉडी पडलेली आहे. तुम्ही ताबडतोब इथे या!" "ठीक आहे डॉक्टरसाहेब! आम्ही लगेच येतो आहोत. फक्तं आम्ही तिथे येईपर्यंत कोणालाही बॉडीला हात लावू देवू नका, आणि तुम्ही तिथेच थांबा!" "ओके ऑफीसर!" भल्या सकाळी सहाच्या सुमाराला आपल्यासमोर अशी काही भानगड येईल याची महाडीकांना अजिबात अपेक्षा नव्हती, त्यामुळे त्यांची तारांबळच उडाली.

सूतक

लेखक कलम यांनी मंगळवार, 30/10/2018 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
वासुदेवरावांचा मृतदेह वाडयाच्या अंगणात ठेवला होता. भेटायला बाहेर सगळं गाव लोटलं होतं. चैतन्य सर्वांशी बोलण्यात आणि बाकीची व्यवस्था बघण्यात गुंतला होता. वासुदेवरावांचे जेष्ठ बंधू बाळासाहेब पण बैठकीत बसून त्याच्या समवयस्कांशी काहीतरी बोलत बसले होते. शेजारीच काही आप्तेष्ट तिरडीचे सामान तपासून पुढचं कसं काय करायचं ह्याची चर्चा करत होते. आत माजघरात स्त्रियांची गर्दी होती. कुणी हुंदके देत होतं, कुणी सांत्वन करत होतं तर कुणी स्वयंपाकघरात आवराआवर करत होतं. विमलाबाईंच्या भोवती बायकांचा घोळका जमला होता.

नखरेल नयना आणि तिचा प्रताप ..

लेखक Jayant Naik यांनी सोमवार, 29/10/2018 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
नखरेल नयना आणि तिचा प्रताप .. नखरेल नयना ...उद्यम वाडीतील झोपडपट्टी मधल्या आपल्या घरातून नेहमीसारखी झोकात बाहेर पडली. आज तिने गुलाबी लहान लहान रंगाची फुले असलेला top घातला होता ...आपली बरीचशी पाठ उघडी राहील असा top तिने मुद्दाम शिवून घेतला होता ,आणि त्या खाली आज तिने निळसर रंगाची घट्ट जीन घातली होती . खांद्यापर्यंत नीट कापलेले केस तिने आज मोकळेच सोडले होते. कपाळावर गुलाबी रंगाची मोठी टिकली आणि ओठावर हलकेसे पण भडक रंगाचे लिपस्टिक. आपली कंबर एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे अशी हलवत ती बाहेरच्या कच्च्या रस्त्यावर आली. आपल्याकडे कोणी बघतंय कि नाही याचा तिने जरा अंदाज घेतला.