Skip to main content

लेख

गावाची रचना

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी मंगळवार, 01/01/2019 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे कोणत्याही गावाला पूर्वी शीव असायची. गावातून बाहेर पडायला दरजा असायचा. गावाच्या आजूबाजूला कोट म्हणजे भिंत असायची. अथवा गावांतील घरांची रचनाच अशी असायची की घराच्या पुढच्या दारातून गावात प्रवेश व्हायचा तर मागच्या दारातून गावाबाहेर मळ्यात- खळ्यात वा प्रात:र्विधींसाठी जाता येत असे. या व्यतिरिक्‍त गावाला कुठे कुठे‍ खिंडी असत. या खिंडींमधून पांदीने शेतात बैलगाडीतून जाता येत असे. गावात येणार्‍या व्यक्‍तीला गावाच्या मुख्य दरवाजातूनच गावात प्रवेश करावा लागे. आणि गावाबाहेर जाण्यासाठी सुध्दा. गावाची शीव वेगळी आणि दरजा वेगळा.

सिंहगडाची अखेरची लढाई (भाग २)

लेखक मनो यांनी रविवार, 30/12/2018 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
१८१७ सालच्या दसऱ्यानंतर दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांविरुद्ध उघड युद्ध पुकारले. खडकी, येरवड्याच्या लढाईनंतर इंग्रजांनी पुणे घेतले, पण बाजीरावाने आपला खजिना आणि मौल्यवान वस्तू आधीच सिंहगड आणि रायगडावर हलवल्या होत्या. त्यामुळे २० फेब्रुवारी १८१८ या दिवशी साताऱ्याहून ब्रिटिश फौज सिंहगडच्या परिसरात पोचली. या फौजेने कुठे तोफा चढवल्या होत्या त्याचा एक नकाशा लढाईनंतर एका वर्षातच कर्नल व्हॅलेंटाईन ब्लॅकर याने एका पुस्तकात प्रकाशित केला.

अडनिडी मुलं-४

लेखक जेडी यांनी बुधवार, 26/12/2018 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी सकाळी ९:०० च्या दरम्यान बेल वाजली. आज कचरा घेणारी बाई लवकर आली कि काय म्हणत मी कचऱ्याच्या दोन्ही बादल्या घेवूनच दरवाजात धावले आणि दार उघडताच काळजात धस्स झाले. माझ्या घरी पूर्वी काम करणाऱ्या आणि माझ्या अडीनिडीला धावून येणाऱ्या मावशी दारात उभ्या होत्या. घरात पावूल कि दारात पावूल त्यांनी रडायला चालू केल. मलाही राहवले नाही. दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून रडू लागलो. मावशी तर धायमोकलून रडू लागल्या. मी गपा मावशी गपा एवढेच बोलत होते आणि त्या कशी गप्प बसू ओ मी म्हणून रडत होत्या. माझ्या टीनाने असा काय गुन्हा केला असेल ओ, काय म्हणून माझ्या लेकराला अशी शिक्षा म्हणून अजूनच रडू लागल्या.

प्रधान

लेखक अद्द्या यांनी बुधवार, 26/12/2018 06:08 या दिवशी प्रकाशित केले.
HR नावाचा जो काही प्रकार कोणत्याही कंपनीत असतो . त्याला डोकेदुखी सोडून दुसरं काही जमत नाही . म्हणजे , काही लोक असतात चांगले . शक्य तेवढी मदत करतात, माहिती देतात आणि पुढे काय होईल आणि काय नाही हे समजावून समोरच्याला शांत करतात. समोरचा कामगार .. (कामगार च कि . प्रोफाइल मध्ये जरी Senior Engineer असलं तरी शेवटी दिवसाच्या - आजकाल रात्र पाळीच्या रोजच्या हिशोबाने काम करणारे आम्ही कामगार ) का पेटलाय . आणि फक्त कंपनीचा फायदा न बघता त्याचाही कसा फायदा होईल हे सांगून देणारे काही दुर्मिळ प्राणी असतात काही कडे. आणि ते जिथे असतात तिथे कायम फायदाच दिसतो कंपनीचा . ..

जेवीद्वि व्रत - द्विभूक्त्स्य वजनो दास:

लेखक चामुंडराय यांनी रविवार, 23/12/2018 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
एक आटपाट नगर होते. तेथे एक मध्यवयीन, मध्यमवर्गीय सद्गृहस्थ रहात होता. खाऊन पिऊन सुखी होता, चरबी आणि ढेरी बाळगून होता परंतु शारीरिक समस्येमुळे त्रासाला होता. वाढता रक्तदाब आणि रक्तातील वाढत्या साखरेमुळे पिडला होता. प्रयत्न करूनही कमी न होता, कलेकलेने वाढणारे वजन आणि पुढे येणारी ढेरी यामुळे गांजला होता. वजन आणि ढेरी कमी करण्याचे विविध प्रयत्न करून थकला होता. वाढत्या वजनाबरोबरीने येणारे विविध आजार त्याला भीती दाखवत होते. काही विशिष्ट व्यक्ती समोर आल्यावर पोट आत ओढून ओढून दमला होता. वजन आणि ढेरी कमी करण्यासाठी अर्धबरीच्या सूचना ऐकून ऐकून कंटाळला होता.

चित्रपट सृष्टीत एकाच कलाकाराचे , एकाच नावाचे दोन चित्रपट....

लेखक srahul यांनी गुरुवार, 20/12/2018 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट सृष्टीत ब्रेक मिळणे , त्यानंतर यश मिळणे , त्यानंतर दीर्घ काळ टिकणे यासाठी नशिबाची साथ लागतेच , पण त्याच बरोबर परिश्रमाची तयारी , बदलाला सामोरे जाण्याची तयारी हे गुण लागतात. अशा प्रकारे काही कलाकारांची प्रदीर्घ कारकीर्द झाली त्यात एक योगायोग असा झाला त्यांनी एकाच नावाचे दोन सिनेमे केले. मला सापडलेली हि यादी आणी काही नवीन असेल तर ऍड करा. १)नास्तिक (१९५४) अजीत , नलिनी जयवंत नास्तिक (१९८३)अमिताभ बच्चन , प्राण , हेमा मालिनी , नलिनी जयवंत २)अफसाना (१९५१) अशोक कुमार (दुहेरी भूमिका),वीणा, कुलदीप कौर अफसाना (१९६६) अशोक कुमार , प्रदीप कुमार , पद्मिनी ३)हिफाजत (१९७३)विनोद मेहरा , आशा सचदेव , अ

अडनिडी मुलं-३

लेखक जेडी यांनी सोमवार, 17/12/2018 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
दहावी होऊन मुलांना चांगले मार्क्सही मिळाले पुढे ११ वी साठी मुलांनी मिळेल तिथे ऍडमिशन घेतले . सीबीएस्सची कॉलेजेस जास्त नाहीत आणि स्टेट वाल्याना आदी प्रेफरेन्स म्हणून आणखीच गोंधळ . शिवाय त्यांची स्टेट बोर्डच्या सिलॅबस मुळे तिकडे मन असे रमतच नाही. लेकीला आर्ट्स विथ मॅथ्स घ्यायचे होते , पुण्यासारख्या शहरात ५ कॉलेज फक्त . एसपी , फर्ग्युसन ला मिळाले तरच आर्टस् ला घ्यायचे नाहीतर सायन्स असे ठरले . पण ते मिळाले नाही. एकाच कॉलेजला सायन्स आणि आर्ट्ससाठी नंबर लागला . मग सायन्स ला घेतले ऍडमिशन .

अतृप्त आत्मा 13

लेखक प्रमोद पानसे यांनी सोमवार, 17/12/2018 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
एरवी आमच्याशी प्रेमाचे धड चार शब्दही न बोलणारी आमची बायडी आज आमच्या विरहाने एवढी व्याकुळ झालेली बघुन आम्हालाही गलबलुन आलं. थोड्या वेळात सावरलेली बायडी अचानक सावध होत तिथुन उठली.आणी आलेच असं म्हणत स्वयंपाकघरात गेली.तीच्या एकंदर हलचाली संशयास्पद वाटल्याने आम्हीही तरंगत तीच्या मागे गेलो.आत सर्व सन्नाटाच होता .भराभरा तांदुळाचं पिंप उघडत तीने आतुन रुमालाचं एक छोटंस गठुडं बाहेर काढलं. अॉ !

लक्ष्मी येण्याची वेळ

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शनिवार, 15/12/2018 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे संध्याकाळी बाहेर ओट्यावर उभा होतो. घराच्या आजूबाजूला मी खूप झाडी लावून ठेवल्यामुळे संध्याकाळी बाहेर डास असतात. हे डास- मच्‍छर संध्याकाळी जास्त प्रमाणात दिसून येतात. दारं खिडक्या उघड्या दिसल्या की ते घरात प्रवेश करतात आणि रात्रभर आपल्याला डंख मारत राहतात. बाहेर ओट्यावर येताच डास घरात येऊ नयेत म्हणून मी बाहेरून घराचं दार घट्टपणे लावून घेतलं. आत डास जाण्यासाठी थोडीही फट राहू नये अशी काळजी घेत मी बाहेरून दाराची कडी लावली. आणि अचानक मला बालपण आठवलं. गावात लहानपणी संध्याकाळी माझ्याकडून चुकून दार लावलं गेलं तर आई म्हणायची, ‘लक्षमी येवानी येळ जयी, दार कसाले लावस रे भाऊ?