Skip to main content

लेख

मैत्र - ५

लेखक शाली यांनी बुधवार, 06/02/2019 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
“अगं, किती ओरडशील त्याला? जातोय डॉक्टरकडे आम्ही” बाबा कपडे घालता घालता आईला म्हणाले. पण आईचा राग काही कमी होत नव्हता. “मला हौस आहे म्हणून चिडलेय मी! ‘जरा सडा घालायचाय, शेण आणून देतो का?’ म्हटलं तर तोंड फिरवून जातो हा. मग आता कशाला गेला होता त्या बैलाची शेपटी ओढायला?” म्हणत आईने ओट्यावर भांडे आदळले. काळजीपोटी बडबडत असली तरी मला आता वैताग आला होता तिच्या बडबडीचा. “काही होत नाही, जरासं तर लागलय” असं सगळ्यांना सांगता सांगता आता हात चांगलाच दुखायला लागला होता. इन्नीने लावलेल्या चंदनानेही काही फारसा फरक पडला नव्हता.

मैत्र - ४

लेखक शाली यांनी मंगळवार, 05/02/2019 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
ऊद्यापासून ग्रेड परीक्षा असल्यामुळे तिन दिवस कॉलेजला सुट्टी होती. आम्ही सरांकडून लॅबमध्ये काम करायची परवानगी घेवून ठेवली होती, त्यामुळे कंटाळा यायचा फारसा प्रश्न नव्हता. कॉलेज सुटायच्या अगोदर दहा मिनिटे सखाराम सगळ्या वर्गांमधून सर्क्यूलर फिरवून गेला होता. ग्रेड परिक्षा झाल्यानंतर या वर्षीच्या वक्तृत्व स्पर्धा होणार होत्या. विषय होता ‘हुंडा-एक वाईट प्रथा’. त्यामुळे जोशीसर फार उत्साहात होते. विषय लक्षात घेता, मुलिंनी यात खासकरुन भाग घ्यावा अशी त्यांची ईच्छा होती. तरीसुध्दा याही वर्षी कप आमच्याच कॉलेजकडे रहावा म्हणून त्यांनी मला आणि शामला तयारी करायला घरी बोलावले होते.

क्रश (शतशब्दकथा)

लेखक किल्ली यांनी सोमवार, 04/02/2019 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वप्रकाशित असल्यामुळे स्पर्धेसाठी देता येणार नाही. म्हणून इथेच टाकत आहे, बघा जमलीये का.. सूचनांचे स्वागत आहे :) -------------------------------------------------------------------------------------------- छोट्या गावातून शहरात नोकरीला आलेल्या त्याला तिचं राहणीमान एकदम स्टॅंडर्ड वाटत असे.

ग्रीन सिग्नल

लेखक किल्ली यांनी सोमवार, 04/02/2019 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
एका वर्दळीच्या दिवशी संध्याकाळी ती तिच्या दुचाकीवरून घरी जाण्यास निघाली होती. संध्याकाळ कसली, चांगली रात्रच झाली होती. पण हल्ली तिच्या लेखी ही वेळ म्हणजे संध्याकाळच! घरी जाऊन जेवण केल्यांनतर रात्र होते असं तिने स्वतःच ठरवून टाकलं होतं. दिनक्रम, कामाच्या वेळा तशा होत्या त्याला ती तरी काय करणार. इथलं हेवी ट्रॅफिकही आता अंगवळणी पडलं होतं. विचारात मग्न असलेली ती एक एक चौक मागे टाकत रस्ता कापत घरी जाण्याचे अंतर कमी करत होती. रस्त्यावरून वाहने चालवणार्या प्रत्येकाची घरी जाण्याची घाई पावलोपावली जाणवत होती. रोजचा परिचयाचा रस्ता असला तर आपण सराईतपणे गाडी चालवू शकतो.

फेस्टिव्हल डायरीज..!! - कथा : १३

लेखक रा.म.पाटील यांनी रविवार, 03/02/2019 07:29 या दिवशी प्रकाशित केले.
फेस्टिव्हल डायरीज..!! : कथा - १३ (Decorate Your Love) प्रजासत्ताक.. प्रेमाचा हक्क.. आज प्रजासत्ताक दिन.. म्हणजे प्रजेला त्यांच्या हक्काची जाणीव करून देणारा दिवस.. हक्क जे जन्म घेतल्यावर आपल्याला आपोआप मिळून जातात.. पण खरंच ते हक्क किती वापरता येतात..? हा प्रश्नच आहे.. ती बोलतच होती कारण त्याला तसेच होते.. तिच्या बहिणीचे तिच्या मनाविरुद्ध ठरत असलेले लग्न.. आज खुप वर्षांनी सर्व मित्रमैत्रिणी एकत्र शाळेत भेटत होते.. सर्वजण आल्यावर तिच्या बहिणीच्या लग्नाचा विषय निघाला.. तिच्या बहिणीचेन लग्न ठरले होते..

बजेट ( आपलेही )

लेखक असहकार यांनी गुरुवार, 31/01/2019 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
बजेट ( आपलेही ) दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या आधी दोनेक महिन्यापासून देशभरात एका गोष्टीची चर्चा सुरू झालेली असते. ती म्हणजे यावर्षीचे बजेट काय असणार, कसे असणार? कोणत्या सवलती असतील, आयकर कितीने कमी होईल? कोणत्या वस्तूंच्या किंमती कमी होतील, कशाच्या वाढतील? बजेटचा शेअरबाजारावर काय परिणाम होईल? वर्तमानपत्रापासून ते टीवीचॅनेल्सच्या चर्चांपर्यंत सगळीकडे एकच एक शब्द ऐकू येतो. बजेट. बजेट. बजेट. तर हा बजेट शब्द नेमका आहे तरी काय याचा फार थोडे लोक मागोवा घेतात. सरकारने सादर करायचा हिशोब, नवे कर लावायची घोषणा, की जमाखर्च मांडण्याची तयारी?

मराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 30/01/2019 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, दिनांक २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाचा मराठी भाषा दिन आपण मिपावर शतशब्दकथा स्पर्धेच्या रुपात साजरा करणार आहोत. विषयाला कोणतेही बंधन नाहीये, पण स्पर्धा म्हटली की नियम आणि अटी आलेच. तर ह्या स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे आहेत. १. स्पर्धा १ फेब्रुवारी २०१९ रोजी ००.०० भाप्रवे सुरू होईल आणि २० फेब्रुवारी २०१९ रोजी २३.५९ भाप्रवे संपेल. २.

गोदाक्का

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 27/01/2019 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
मे महिन्यात सारे जमले होते राम मामा -वैशाली मामी त्यांची २ मुले -मधुकाका -वासंती काकू राधा मावशी आमरसाचा तुडुंब जेवण झालं होत राधाक्कां सार आवरा आवर केली मंडळी जमेल तशी मिळेल त्या जागेवर पडून घोरत होती गोदाक्का ने मोकळी जाग शोधली व जमिनीला पाठ टेकवली व घोरु लागली बाहेरून राम मामा आला त्यानं गोदाक्काला घोरताना पाहिलंत तिच्या भोवती डास घोंघावत होते त्याने बाजूला पडलेली नवी कोरे पांढरी चादर तिच्या अंगावर टाकली राधा मावशी बाजारात गेली होती तिने पूजेसाठी फुले हार बुक्का हळद कुंकू आणले होते आप्पा च वय ७७ आजारी असायचे गोद ला अंगावर चादर असलेली व्यक्ती बघता निराळाच संशय आला घरात मृत व्यक्

MLM (मोहाचा विळखा ३/३ )

लेखक असहकार यांनी रविवार, 27/01/2019 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
मल्टीलेवल मार्केटींग स्कॅम इन्स्टन्ट गोरेपन, इन्स्टन्ट शक्ती, इन्स्टन्ट कॉफी इत्यादीच्या इन्स्टन्ट जमान्यात कोणालाही आपले स्वप्न पूर्ण व्हावे तर ते झटपट, आताच्या आता, इन्स्टन्ट झाले तर आवडेलच. त्यात त्याला फारसे काही करायची गरज नसेल, केवळ जुजबी मिटींग्स अटेन्ड करणे, थोड्याफार लोकांना भेटणे आणि बाकी दिवस, महिने आरामात आपल्या कुटूंबासमवेत घालवणे अशी चमचमीत संधी असेल तर? कुणाला नाही आवडणार. नक्कीच आवडेल. आणि मग अशा इन्स्टन्ट सक्सेसच्या मागे लागणारा तो इन्स्टन्स्ट पैसे घालवून बसणार व मित्रनातेवाइकांशी संबंधही इन्स्टन्ट बिघडवून बसणार हेही आलेच. हे कसे होते?

मुंग्या साखरेचे दाणे फेकून का मारत नाहीत? भाग ३/३ (आकारमानाने पडणारे फरक)

लेखक पुष्कर यांनी शुक्रवार, 25/01/2019 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वपीठिका सध्या मी राहतो तिथे उन्हाळा चालू आहे. दक्षिण गोलार्धात असल्यामुळे इथले ऋतू आपल्यापेक्षा उलटे चालतात. त्यामुळे सध्या जिकडे तिकडे भसाभस मुंग्या अन्नाच्या शोधार्थ बाहेर पडत आहेत. लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत ह्या मुंग्यांची मजा बघत बसणे हा एक आवडता छंद झाला होता. घरात कुठे मुंग्या लागल्या असतील तर त्यांची रांग बघत बघत मूळ स्रोत शोधायचा प्रयत्न करणं, रांगेच्या मध्येच बोटाने पुसून त्यांची रांग अस्ताव्यस्त करणं, मुंग्यांच्या भोवती पाणी शिंपडून त्याचं वर्तुळ करणं आणि मुंग्यांना हा भवसागर पार करून जाता येतं का ते पाहणं - असले अनेक उद्योग तेव्हा केलेत!