Skip to main content

लेख

राजा विक्रमादित्य

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 04/06/2019 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
० उज्जैनचे प्रसिद्ध राजा विक्रमादित्य यांच्या भावाचे नाव राजा भर्तृहरी होते. एकेकाळी राजा भर्तृहरी यांना अत्यंत विद्वान, ज्ञानी राजा म्हणून ओळखले जायचे. परंतु दोन पत्नी असूनही ते पिंगला नावाच्या अतिसुंदर राजकन्येवर मोहित झाले. राजाने पिंगलाला तिसरी पत्नी बनवले. पिंगलाच्या रूपरंगावर आसक्त झालेला राजा विलासी झाला. राजा पिंगलाच्या तालावर नाचू लागला होता. याच गोष्टीचा फायदा घेत पिंगला व्यभिचारिणी(चारित्र्यहीन स्त्री) झाली. . ती घोडे सांभाळणार्‍या सेवकाच्या प्रेमात पडली.

चाची ४२०

लेखक nishapari यांनी गुरुवार, 30/05/2019 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
चाची ४२० तसा जुना चित्रपट आहे , टीव्हीवर अनेकदा लागून गेला आहे ... बहुतेक लोकांनी किमान एकदातरी पाहिला असेल असं वाटतं ... मीही बऱ्याच वर्षांपूर्वी टीव्हीवर पाहिला होता आवडलाही होता पण 1 - 2 आठवड्यांपूर्वी युट्यूब वर पाहिला आणि त्यांनतर मधले मधले सीन असे काही वेळा पाहिले गेल्या 1 - 2 आठवड्यात ... आजच तो ज्या तामिळ चित्रपटाचा रिमेक आहे तो अव्वाई शानमुगी पाहिला . दोन्ही चित्रपट मिसेस डाऊटफायर या इंग्रजी चित्रपटावर आधारीत आहेत . मिसेस डाऊटफायर मागेच कधीतरी पाहिला होता . पण चाची ४२० ची सर अव्वाई शानमुगीला नाही आणि मिसेस डाऊटफायरला तर नाहीच नाही .

माझा निबंध

लेखक सर टोबी यांनी शुक्रवार, 24/05/2019 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: जी. ए. कुलकर्णी यांची एक गोष्ट, बहुदा माझीही मोट असे काही तरी नाव असावे. एक शहरात राहणाऱ्या, स्वतंत्र विचारसरणीच्या मुलाला शाळेत निबंध लिहावा लागतो तोही त्याने न अनुभवलेल्या जीवनासंबंधी. दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या आसपास एक गोष्ट हमखास पाहायला मिळते ती म्हणजे गहिवराचे कढ आणून लिहिलेल्या सुट्ट्यांच्या आठवणी. या वर्णनांमध्ये मामाच्या गावाला जरा विशेष स्थान असते.

राधाची कैद

लेखक Jayant Naik यांनी गुरुवार, 23/05/2019 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
राधाची कैद. एखाद्या कथेची सुरुवात कशी होईल हे बऱ्याच लेखकांना सांगता येत नाही . आणि त्याचा शेवट तर जवळजवळ त्या कथेतील पात्रांच्याच हातात असतो .म्हणजे जन्म आपल्या हातात नाही . मरण आपल्या हातात नाही ...फक्त या दोन्ही मधील जगणे आपल्या हातात असते.तसेच काहीतरी .. कथा आपोआप सुरु झालेली असते . लेखकाने कथेचा मध्य तेवढा लिहायचा . आणि पात्रांनी कथेचा शेवट केला की तो लिहून लेखकाने आपले नाव तेवढे खाली जोडायचे . विक्रम राजे.( अर्थात हे माझे खरे नाव नाही . या कथेतील गावाचे आणि पात्रांची नावे पण खरी नाहीत .प्रसंग मात्र खरे आहेत . ) मी टीवी वरच्या मालिकांच्या कथा लिहितो .

श्री. अतिश तसीर यांच्या लेखावर प्रतिसाद

लेखक गामा पैलवान यांनी रविवार, 19/05/2019 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. अतिश तसीर यांनी २० मे २०१९ च्या टाईम नियतकालिकात मोदींना उद्देशून एक प्रदीर्घ लेख लिहिला आहे. भारतीय जनता आजून पाच वर्षं मोदी शासन सहन करेल काय, असं शीर्षक आहे. उपरोक्त लेखावर प्रतिसाद व काही प्रमाणावर प्रतिवाद म्हणून सदर लेख लिहला आहे.

आंबा नावाचे झाड

लेखक शब्दानुज यांनी रविवार, 19/05/2019 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
पातेल्यातले आंबे आईने माझ्याकडे सरकवले आणि " घे काढून .." असा आदेश दिला. हातातले काम सोडले आणि एक एक आंबा पिळून काढू लागलो. दुध, वेलदोडे टाकून झाले आणि शेवटी साखर टाकायची म्हणून ती शोधायला लागलो. आईला विचारावे तर तिचे उत्तर असणार "तिथे आहे. " "तिथे कुठे? " असा प्रतिप्रश्न केला तर "तिथे स्टिलच्या गोल डब्यात " असे उत्तर मिळणार. शेवटी समोरच्या अगणित डब्यातून मलाच पाहिजे ते शोधावे लागते. तो अनुभव पाठीशी असल्याने मी एकटाच साखर शोधू लागलो. त्यावेळी मात्र आईच्या कामात लुडबूड होऊ लागली. माझ्याकडे एक तिरपी नजर टाकली आणि बोलली ," साखर हवीए? अरे एवढा गोड आंबा आणि त्यात अजून साखर? जाड होशील की अजून !

आणि बुद्ध हसला !

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 18/05/2019 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
१८ मे १९७४ ची सकाळ आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावर सुरू असलेल्या चित्रपट गीतांचा कार्यक्रम अचानक थांबवण्यात आला आणि एक उद्घोषणा केली गेली. कृपया एक महत्त्वपूर्ण प्रसारण की प्रतीक्षा करें।. "आज सुबह 8.05 पर पश्चिमी भारत के एक अज्ञात स्थान पर शांतिपूर्ण कार्यों के लिये भारत ने एक भूमिगत परमाणु परीक्षण किया है।" ७ सप्टेंबर १९७२ ला पंतप्रधान इंदिरा गांधींनी भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटरला भेट दिली, त्या भेटींत गांधींनी पिसफूल न्यूक्लियर डिव्हाईस म्हणजेच PNE तयार करण्यासाठी परवानगी दिली आणि हसऱ्या बुद्धाचा प्रवास सुरु झाला. पण हे अगदी अलीकडचं नक्कीच नव्हतं.

शतजन्म शोधितांना....

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 17/05/2019 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
'झाडाच्या फांद्यांना जमिनीला आलिंगन देता येत नाही. म्हणून ती बेहद्द असोशीने वाढत जातात ….आणि मुळांना निरोप पोहचतो, मग मुळे खोल खोल पसरत जातात. मुळे खोल खोल जातात, फांद्या बहारदार होत जातात. मुळांचा निरोप फांद्यांना, फांद्यांचा निरोप मुळांना मिळत जातो. जमिनीतली ओल फांद्यांपर्यंत,आणि हवेतला गंध मुळांपर्यंत पोहचत राहतो. त्यांच्यातले हितगुज अत्तर होते. एके दिवशी, फांदीवर कळी उमलते. त्यासरशी सगळ्या फांद्या मोहरतात. मग, कळीचे फूल होते. वाऱ्यावर डुलते. आपल्या रंगरूपाने आसमंत भारून टाकते. फांद्या जमिनीकडे पहात राहतात. किती असोशी! फांद्यांना वाटते, आता तरी आपण जमिनीला स्पर्श करू.

लोकशाही ‘शाई’ पुरती!

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 15/05/2019 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे भारताचे तमाम लोक हे नागरिक नाहीत. फक्त मतदार आहेत. भारताचे लोक स्वत:ला ‘जागरूक नागरिक’ समजतात. आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे असं समजून मतदान करतात. वीस- पंचवीस उमेदवारांपैकी मतदारांना एकही पसंत नसतो, पण निवड न करता कसं चालेल, म्हणून तो कोणाला तरी मतदान करतो. NOTA पर्यायही स्वीकारतो. (नोटा पर्याय निवडणं म्हणजे बोटाला शाई लावण्यापुरतं मतदान करणं.) इतक्यांपैकी नागरिकांना एकही उमेदवार योग्य वाटू नये, हे खरं तर उमेदवारांनाच लज्जास्पद वाटलं पाहिजे. दिवसेंदिवस नोटावरचं मतदान वाढतंय, याचं चिंतन मतदारांनी नव्हे, तर उमेदवारांनी- पक्षांनी केलं पाहिजे.

नन्दिनीची डायरी - निर्णय

लेखक aanandinee यांनी मंगळवार, 14/05/2019 05:17 या दिवशी प्रकाशित केले.
नन्दिनीची डायरी - निर्णय वेटिंग रूममध्ये ती एकटीच बसली होती. "एला" मी हलक्या आवाजात हाक मारली. तिने मान वर करून माझ्याकडे पाहिलं. पंचविशीच्या आसपास, अतिशय रेखीव चेहरा, पिंगट डोळे, केस मात्र कोरडे, फिस्कारलेले, काळजी न घेतले गेल्यासारखे. आणि चेहर्यावर मलूल असा भाव. मला पाहून कसनुसं हसू तिच्या चेहर्यावर उमटलं पण ते वरवरचं होतं. माझ्या मागोमाग ती आत आली. समोरच्या सोफ्यावर बसली. नजर जमिनीवर लावून ठेवलेली. सुरुवातीच्या औपचारिक गप्पा चालू झाल्या. एला तिच्या पार्टनरसोबत राहत होती. हा देश आता लिव्ह इन रिलेशनशिप बरोबर की चूक या वादाच्या पुष्कळ पुढे गेला आहे.