गाईड
गाईड १९६५ चा सिनेमा ही इतकीच या सिनेमाची ओळख नाही.
गाईड हा सिनेमा आर के नारायणच्या कादंबरीवर बेतलेला सिनेमा ही पण याची ओळख होत नाही.
देव आनंदची ओळख बदलणारा सिनेमा, भारतीय सिनेमाच्या इतिहासात एक स्वतःचा ठसा उमटवणारा सिनेमा. असे बरेच काही सांगता येईल याच्या बद्दल.
मी जेंव्हा पहिल्यांदा हा सिनेमा पाहिला तेंव्हा राजू नावाचा कोणताही आगापीछा नसलेल्या एका तरुणाची कहाणी इतकेच काहीसे समजले होते. अर्थात एस डी बर्मन चे म्युझीक हा मोठाच प्लस पॉईंट होता. यात नेहमी दिसणारा तो उत्साही देवानंद दिसत नाही. सळसळत्या तारुण्याची नव्हाळी वागवणारी वहिदा रेहमान दिसत नाही. जी दिसतात ती पात्रे दिसतात.
मिसळपाव