Skip to main content

आस्वाद

विश्वव्यापी 'करोना' : चित्रसफर

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 24/03/2020 या दिवशी प्रकाशित केले.
corona हा तसा एक सामान्य इंग्लीश शब्द. त्याचे मूळ लॅटिनमधले crown, अर्थात मुकुट. सध्या जगभर धुमाकूळ घालून एका महासाथीला कारण ठरलेला विषाणू त्याचा मुकुट मिरवतोय. सहज उत्सुकता म्हणून ‘करोना’ शब्दाचे अनेकविध अर्थ पाहिले आणि ते रोचक वाटले. जगात जवळपास एक डझनभर प्रकारचे करोना आहेत. ते आपल्या परिचयाच्या अनेक क्षेत्रांत आहेत. जरा त्यांची यादी तर बघा: आकाश, वनस्पती, शरीर, विद्युतक्षेत्र, वास्तुकला, धार्मिक केशभूषा, मुद्रानामे आणि अर्थात सूक्ष्मजीव . सध्याच्या जमावबंदीमुळे आपण घरांत काहीसे जखडले गेलो आहोत.

मीनाकुमारी की बेटी? भाग २

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 20/03/2020 या दिवशी प्रकाशित केले.

मीनाकुमारी की बेटी?

 1 भाग २ व्हिडीओ क्लिप पाहून अनेकांनी विचारणा केल्या की सध्या ती कुठे आहे? काय करते? चमन जीवित आहेत का? डी एन ए टेस्ट केली का? वगैरे... काहींना खरे आहे याची खात्री झाली... काहींनी सगळे ढोंग आहे असे काही नव्हते असे म्हटले … प्रत्येकाची आपापली मते… फेब्रुवारी २०२०मधे … अमीर हुसेन चमन कराचीत असतात. त्यांना त्यांच्या मुलीने अमेरिकेतून पाहून ही क्लिप लिंक दिली.

मनगंगेच्या काठावर

लेखक तर्री यांनी सोमवार, 16/03/2020 या दिवशी प्रकाशित केले.
कुमार १ यांचा
कोळी, दिग्गज आणि सुरेख अनुवाद
धाग्यातील ‘भाषांतर एक आकर्षक तरी असते, नाहीतर एकनिष्ठ तरी – दोन्ही असणे कठीण !’ ह्या पु.ल. देशपांडे ह्यांच्या विधानाशी ठेहराव झाला. वाचता वाचता असा ठहराव हा निव्वळ आनंदाचा क्षण असतो. असे क्षण मिळणे हे कोणत्याही हाडाच्या वाचकाला परिपूर्ती ची अनुभूती देतो. मनगंगेच्या काठावर हे सबिता गोस्वामी ह्यांचे आत्मकथन नुकतेच वाचले. सबिता गोस्वामी ह्या भारतामधील BBC च्या पत्रकार. आसाम आणि ईशान्य भरात जेंव्हा भयंकर दहशतवादाच्या काळातून जात होता त्याकाळात सबिता पूर्ण ईशान्य भारतातून वृत्त संकलन करीत होत्या.

स्त्रीशक्ती १: मारी क्यूरी

लेखक सुधीर कांदळकर यांनी रविवार, 08/03/2020 या दिवशी प्रकाशित केले.
जागतिक महिला दिनानिमित्त लेखमाला लिहिण्याचा मानस आहे. त्यात तेजस्वी कर्तृत्त्व असलेल्या काही महिलांबद्दल लिहिले आहे. त्यातले हे पहिले पुष्प. शालेय विद्यार्थ्या पासून वृद्धापर्यंत बहुतेकांना ज्ञात असलेले नाव मादाम क्यूरी. मूळ नाव मारिया श्क्लोदोव्स्का - Maria Sklodowska नंतर मारी क्यूरी या नावाने जगभर ख्यातकीर्त. जन्म पोलंडमधील वॉर्सॉ इथे दि. ७ नोव्हेंबर १८६७. शालेय पाठ्यपुस्तकापासून तिचे नाव रेडीयम या मूलद्रव्याशी आणि किरणोत्सर्जनाशी जोडलेले आहे. किरणोत्सर्जनाचा भौतिकी दृष्टीकोनातून अभ्यास हा तिचा संशोधनविषय.

कोळी, दिग्गज आणि सुरेख अनुवाद

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 05/03/2020 या दिवशी प्रकाशित केले.
लेखाच्या शीर्षकावरून गोंधळला असाल ना ? लगेच खुलासा करतो. एका प्रसिद्ध पुस्तकाबद्दल हा लेख आहे. मूळ इंग्लीश पुस्तक आहे ‘The old man and the sea’ आणि त्याचा मराठी अनुवाद म्हणजे ‘एका कोळीयाने’. अर्नेस्ट हेमिंग्वे यांचे हे पुस्तक १९५२मध्ये प्रकाशित झाले आणि पुढे ते जगभर गाजले. त्याचा मराठी अनुवाद पु ल देशपांडे यांनी केला आणि तो १९६५मध्ये प्रकाशित झाला. हे मराठी पुस्तक माझ्या संग्रही असून नुकतेच मी त्याचे पुनर्वाचन केले. पुस्तकाचा अनुवाद ही देखील एक साहित्यकला आहे. चांगला अनुवाद करणे हे काही येरा गबाळ्याचे काम नाही.

ये दिल हे की मानता नही !

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 03/03/2020 या दिवशी प्रकाशित केले.
ये दिल हे की मानता नही ! काय करणार माणसाच्या मनाचं असतच अस कितीही केल तरी ते ऐकतच नाही . मन हे तर न उलगडणार कोडच आहे माझ्यासाठी, ते मेंदू आणि हृदय नक्की कशात असत मुळी कळतच नाही . एरवी असा प्रश्न नाही पडत माला सगळ्याच गोष्टी मना प्रमाणे होतातच अस नाही . विचार सुचण किवा करण हे मनाच काम मग त्यावर प्रक्रिया करणे हे मेंदू किवा हृदयाच काम मग घडते ती कृती . असो .......

चला चला करबल्याला जाऊ... हुसैन (रह.)की मजार डोळा पाहू…

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 25/02/2020 या दिवशी प्रकाशित केले.

चला चला करबल्याला जाऊ ... हुसैन (रह.)की मजार डोळा पाहू…

अहो इथे अडीचशे किमी अंतरावर पाक पट्टनच्या बाबा फरीद (रह.) मजारला जायला जमेना आता करबल्याला कुठे जाताय? मियां बिबीतील संभाषणाने नकारसूर लावला. "आमा मियां, जायचं कोण म्हणतं फक्त तिथं जाणाऱ्या भाविकांच्या गमती, कष्ट, धावाधाव, परदेशचा परवाना कटकट, पैशाचा चुराडा वगैरे वाचलं ते सांगू म्हणून म्हटलं तेरी अजमेर शरीफ़ दर्ग्याची ख्वाहिश पूरी करेंगे. इंडिया में च जाएंगे!

ट्रम्प व्हिझिट पुणे

लेखक महासंग्राम यांनी सोमवार, 24/02/2020 या दिवशी प्रकाशित केले.
माननीय श्री डोनाल्ड ट्रम्प तात्या यांच्या TrumpIndiaVisit दरम्यान पुणे दौऱ्यातील मधील कार्यक्रम. सकाळच्या 5.30 ला येणाऱ्या महाराष्ट्र एक्सस्प्रेस ने ७ वाजता पुणे रेल्वे स्टेशन वर आगमन मका यांच्याकडून हे सुरांनो चंद्र व्हा हे फ्युजन ऐकवून स्वागत रिक्षा चालका सोबत भाड्यावरून वाद.

बहिणीला जपणारी मारग्रेट

लेखक महामाया यांनी बुधवार, 12/02/2020 या दिवशी प्रकाशित केले.
Music For Millions ---------------------- गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघताेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी चित्रपटांमधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो... आठवणीतला हॉलीवुड रवींद्र दत्तात्रय तेलंग अकल्पितपणे घडून आलेल्या योगाची लज्जत न्यारीच असते. सारखं कथानक असलेले दोन चित्रपट बारा तासांच्या आत बघण्याचा योग असाच एकदा मिळाला-एक हॉलीवुडचा, एक बॉलीवुडचा.

गावाकडच्या गोष्टी 1

लेखक प्रमोद पानसे यांनी मंगळवार, 11/02/2020 या दिवशी प्रकाशित केले.
गावाकडल्या गोष्टी 1 लहानपणी म्हणजे तिसरी चौथीत असताना पतंग नव्हती उडवता येत.पण कटलेल्या पतंगी पकडण्याचा आणी मांजा गोळा करण्याचा भयंकर सोस होता. एखादी पतंग पकडली की मी तीचा मांजा वितावर आठ्या घालुन घरी आणायचा .आणी काकाच्या आसारीला तो गुंडाळायचा.माझ्या काकाला पतंग उडवायचा नाद होता.पण त्याच्या आसारीला असलेला सगळा मांजा मीच आणलेला असायचा.त्याबदल्यात निलकमल थिएटरात बच्चनचे सिनेमे बघायला मिळायाचे.काकाची वट होती तीथे.दर शुक्रवारी मला न्यायचा . एकदा घराच्या वर्हंड्यावर असलेल्या पत्र्यावर उतरुन जांभळात अडकलेली पतंग सोडायच्या प्रयत्नात गंजलेला पत्रा फाटुन दहा फुटावरुन वर्हांड्यात ढुंगणावर आपटलेलं आठव